लोकल जाहिरात करण्यासाठी १५ उत्तम पर्याय

1. आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटून आपल्या उत्पादनाचे मोफत सॅम्पल देणे व त्यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया testimonial रूपात लोकांसमोर आणणे. आपल्या कार्यालयाचे, दुकानाचे ठिकाण गुगल मॅपवर My Business Place म्हणून नोंदवणे.

2. आपल्या उद्योगाचे लिंक्डइनवरून प्रमोशन करणे.

3. पत्रकांमार्फत जाहिरात.

4. सिनेमागृहात जाहिरात करणे. (बजेट कमी असल्यास नवीन सिनेमागृहात जाहिरात करणे शक्य होऊ शकेल.)

5. एस.टी. किंवा बसवर जाहिरात करणे.

6. SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन : आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर स्पष्ट आणि पूर्ण माहिती भरणे ज्याने गुगल सर्चमधे आपले नाव वर येईल.

7.  उद्योजक सूची मध्ये आपली नोंद करणे.

8. आपल्या क्षेत्राशी संबंधित वृत्तपत्र किंवा मासिकांत जाहिरात देणे.

9. विविध स्पर्धांत प्रायोजकत्व स्वीकारणे.

10. गोविंदा पथकं, ढोल-ताशा पथकं, आदींचे प्रायोजक होणे.

11. आपल्या उद्योगाचा लोगो छापलेल्या वस्तू जसे पेनं, कप वगैरे ग्राहकांना किंवा आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक यांना भेट देणे.

12. विविध प्रदर्शनांमध्ये आपले उत्पादन विकणे किंवा आपण ज्या सेवा पुरवतो त्याची माहिती लोकांना देणे.

13. वर्ड ऑफ माऊथ प्रमोशन : अनोळखी लोकांना भेटून आपल्या उत्पादनांबद्दल माहिती देणे. ‎आपले कर्मचारी, मित्रपरिवार, नातेवाईक इत्यादींना आपल्या व्यवसायाबद्दल इतरांना माहिती देण्यास सांगणे.

14. आपली उत्पादने किंवा सेवा ऑनलाईन विकणे.

15. स्थानिकांचा WhatsApp ग्रुप तयार करा आणि त्यावर तुमची जाहिरात करा.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?