नवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपले उत्पादन लोकांना उपयोगी किंवा आकर्षक वाटले की ते आपले ग्राहक होतात, असे सर्वसामान्य पणे म्हटले जाते, परंतु एलियास सेंट एलमो लेविस यांनी एखादी व्यक्ती आपली ग्राहक होण्याच्या सूक्ष्म पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यानुसार आपले उत्पादन घडवले, तर त्याचा नक्कीच फायदा दिसून येईल.

आयडा (AIDA) मॉडेल :

A : Attention – लक्ष वेधणे
I : Interest – कुतूहल
D : Desire – इच्छा
A : Action – कृती

लक्ष वेधणे (Attention)

लोकांचे लक्ष वेधून घेणे हे एखाद्या उत्पादनाचे पाहिले काम असते. जर आपले उत्पादन इतरांपेक्षा थोडेफार वेगळे किंवा आकर्षक असेल तर ते सर्वांमधे नक्कीच उठून दिसते. आपल्या उत्पादनाचा आकार बदलणे, त्याला आकर्षक टॅगलाईन देणे, पॅकेजिंगमध्ये आकर्षकता आणणे अशा अनेकविध पर्यायांनी आपण लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. जसे आपण जेव्हा एखाद्या सुपरमार्केटमध्ये जातो तेव्हा सगळ्या वस्तूंमध्ये फार कमी अशा वस्तू असतात ज्यांकडे आपले पटकन लक्ष जाते.

कुतूहल (Interest)

आपल्या उत्पादनाने लोकांचे नुसते लक्ष वेधून घेणे पुरेसे नाही तर लोकांना त्यात रस वाटला पाहिजे. आपल्या उत्पादनाचे प्राथमिक रूप लोकांनी पाहिल्यावर त्यांना त्यात आणखी उत्सुकता वाटली पाहिजे जेणेकरून लोक त्या उत्पादनाची आणखी माहिती करून घेतील.

जसे आपण एखादा मोबाईल विकत घ्यायला जातो. आपल्या बजेटमध्ये बसणारे अनेक मोबाईल आपल्या समोर असतात. त्यातून आपण आपल्या वापरानुसार आणि आवडीनुसार काही मोबाईल बाजूला काढतो आणि त्याबद्दल आणखी सविस्तर माहिती दुकानदाराला विचारतो. म्हणजेच अनेक उत्पादनांतून काही उत्पादनांतच आपल्याला रस निर्माण होतो.

इच्छा (Desire)

एखाद्या उत्पादनाची सविस्तर माहिती काढल्यानंतर लोक त्यांच्या गरजा त्या उत्पादनासोबत जोडणे सुरू करतात. ते उत्पादन आपल्याला कसे फायद्याचे आहे आणि त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल हा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो व त्यांना ते उत्पादन घ्यावेसे वाटते.

जसे, बाजूला काढून ठेवलेल्या मोबाईल्स पैकी एक मोबाईल असा असतो जो आपल्याला अचानक आवडून जातो. त्याच्या फीचर्समुळे असेल किंवा त्याच्या ब्रँडमुळे, पण आपल्याला तोच मोबाईल घ्यावासा वाटतो आणि इतरांच्या तुलनेत आपण त्याची निवड करतो.

कृती (Action)

एखाद्या व्यक्तीला आपले उत्पादन आकर्षक वाटेल, ते घ्यायची त्याला इच्छा सुद्धा असेल पण जर ते घेण्याइतके पैसेच त्याच्याकडे नसतील तर आधीच्या सगळ्या कृतीचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्या ग्राहकाला जाणून घेताना त्याची कृती जाणून घेणे हे सर्वात महत्वाचे असते.

बऱ्याच लोकांच्या मते कृती ही एखाद्या उत्पादनाच्या यशाची शेवटची पायरी मानली जाते. वरील मोबाईलचे उदाहरण पाहिले तर बरेच जण दिवसभरात दुकानात येऊन मोबाईल्स पाहून जात असतील परंतु त्या लोकांमधील नक्की किती आणि कोणते लोक प्रत्यक्ष मोबाईल विकत घेतात याचा अभ्यास करणे त्या कंपनीला नक्कीच फायद्याचे ठरते.

काही काळानंतर AIDA मॉडेलमध्ये आणखी एक गोष्ट सामील करण्यात आली आणि ती म्हणजे समाधान :

समाधान (Satisfaction)

एखाद्या खरेदी प्रक्रियेची शेवटची पायरी म्हणजे समाधान. आपले उत्पादन वापरून लोकांना किती समाधान मिळाले हेसुद्धा एका उद्योजकासाठी खूप महत्वाचे असते. विविध सर्व्हे, फीडबॅक्स मार्फत आपल्या ग्राहकांच्या बदलणाऱ्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेणे हा उत्तम पर्याय ठरेल.

उदा., एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचा मोबाईल विकत घेतला आणि त्याला तो मोबाईल, विक्रीपश्चात सेवा, अश्या जवळपास सर्वच गोष्टी आवडल्या तर ती व्यक्ती पुढचा फोनसुद्धा त्याच कंपनीचा घेण्याची शक्यता वाढते. आपला चांगला अनुभव ती व्यक्ती इतरांना सांगून नकळत आपले प्रमोशन करेल ती तर वेगळीच गोष्ट!

या पायऱ्यांचा आपल्या उद्योगानुसार विचार केला आणि त्याप्रमाणे जर आपले उत्पादन घडवले तर Attention पासून Satisfaction पर्यंत आपले उत्पादन उत्तमोत्तम होऊन आपली प्रत्यक्ष विक्री वाढत जाईल.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?