प्रायोजित

कैवल्य फार्म्स :: तुमचं सेकंड होम…

मित्रांनो, रोजच्या धकाधकीतून निवांतपणासाठी अगदी दीड-दोन दिवसांचा शॉर्ट ब्रेक हवाय? तोही मुंबई व पुण्यापासून दोन ते तीन तासांच्या अंतरावर? तर चला मग, भरा कपडे आणि या निसर्गरम्य कोकणात, अलिबागला! अलिबागपासून फक्त दहा किलोमीटर, नागांवच्या समुद्रकिनार्‍यावर.

स्वच्छ व सुरक्षित अशा नागांव समुद्रकिनार्‍यावर Water Sports activities व विविध ठिकाणची सुंदर देवळं तसंच भर समुद्रातील किल्ले (मुरूड जंजिरा व कुलाबा) तुमच्या चढाईची वाट पहाताहेत. अलिबाग ते नागांव अशा पसरलेल्या मोठ्या खाडीसमोर वसलेल्या ‘कैवल्य फार्मस्’मध्ये तुमचे स्वागतच आहे.

‘कैवल्य फार्मस्’ म्हणजे हॉटेल किंवा रिसॉर्ट नाही हं! हे आहे तुमच्याच एखाद्या नातेवाईकाचं, प्रशस्त दीड एकरात पसरलेलं सुंदर टुमदार घर! दीड एकर जागेमध्ये जवळपास ४० हापूसची कलमं, शेकडो फुलझाडं व घरच्या भाज्यांची लागवड आणि मधोमध दोन सुसज्ज बंगले. प्रशस्त डायनिंग हॉल व स्वयंपाकघर, गणेश मंदिर, भरपूर पार्किंगची सोय. यासाठी चोवीस तासांचे प्रत्येक माणशी १५०० ते १८०० ची पॅकेजेस् उपलब्ध.

चविष्ट व्हेज/नॉनव्हेज घरगुती जेवण, न्याहारी, चहा/कॉफीसह राहाण्याची उत्तम सोय. मासे सोडून, सब कुछ अनलिमिटेड. मासे मिळणार, मात्र लिमिटेड! सर्व जेवण राइसब्रान तेलात केलेले व जेवणात सोडा, रंग वा प्रिझरवेटिव्हजचा वापर नाही. जास्त तेलकट किंवा मसालेदार नाही. मांसाहारी लोकांनाही शाकाहारी पदार्थांची चव चाखता येणारं एकमेव घर!

तुमच्या करमणुकीसाठी प्रशस्त टीव्ही रूम, पुस्तकं व मासिकांची लायब्ररी, म्युझिक सिस्टीम, कॅरम बोर्ड, बॅडमिंटन, बुद्धिबळ, क्रिकेट इत्यादी खेळांची उत्तम व्यवस्था. लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी व डुंबायला छानसा tiling केलेला हौद. संपूर्ण फार्मला झाडांवर छान लायटिंग केलेले आहे आणि लोकेशन म्हणाल तर, समुद्रकिनार्‍यापासून फक्त साडेतीन कि.मी. म्हणजे दहा मिनिटांचा ड्राइव्ह.

….. पण पण पण… खाडीला टच असल्याचे फायदे काय? तर भरतीच्या वेळेस प्रचंड हवा व डास अजिबात नाहीत. गडबड/गजबज नाही. शांत व निवांत परिसर. आवाज म्हणजे फक्त झाडांची सळसळ व पक्ष्यांचे गोड गाणे!
मग? चला मंडळी, वाट कसली पाहाताय? करा बुकिंग, भरा ट्रंका आणि या कोकणात कैवल्य फार्मस्मध्ये!

घ्या अनुभव उमा व विजय जोशींच्या प्रेमळ व अगत्यशील पाहुणचाराचा!

आत्तापर्यंत येऊन गेलेल्या पाहुण्यांचे अभिप्राय वाचण्यासाठी व आणखी काही फोटोज् पाहण्यासाठी, तसेच इथे पोहोचण्याचे विविध पर्याय (Maps and More) जाणून घेण्यासाठी पाहा.

www.kaivalyafarms.in

बुकिंगसाठी संपर्क :
उमा जोशी ९३२३१९२१५८
विजय जोशी ९३२२२२५५२६
पत्ता – कैवल्य फार्मस् पाल्हे, पाल्हे बायपास रोड,
नागांव हटाळे, ता. अलिबाग, जि. रायगड.


Smart Udyojak | e-Magazines | All Issues

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: