उद्योगारंभ

रतन टाटांनी गुंतवणूक केलेले दहा स्टार्टअप्स

प्रत्येक यशस्वी व्यवसायमागे एक उत्तम कल्पना, कष्टाळू उद्योजक आणि विश्वास ठेऊन पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार असतो. रतन टाटा ह्यांनी आजवर आपल्या खिशातील पैशांतून एकूण तीस स्टार्टअप्समधे गुंतवणूक केली आहे. ह्यांतील बहुतांश स्टार्टअप्स हे तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तसेच हे स्टार्टअप्स त्यांच्या कुवतीनुसार भरभरून यश मिळविणारे आहेत. ते आणखी मोठे व्हावे यासाठी रतन टाटांनी त्या स्टार्टअप्स ची निवड केली. GadgetNow च्या एका अहवालानुसार पुढील दहा स्टार्टअप्स हे त्यांतील मुख्य आहेत :

१. पेटीएम :

पेटीएम, भारतातील सर्वात मोठी मोबाईल वॉलेट सेवा पुरविणारी कंपनी व जी आता पेयमेंट बॅंकसुद्धा आहे ती आज सर्वोत्तम मोबाईल अप्लिकेशन्समध्ये मोजली जाते, तिची निवड रतन टाटा यांनी केली. पेटीएमकडे नोव्हेंबर, २०१६ च्या नोटाबंदीमुळे एक भव्य संधी चालून आली. कारण पेटीएमद्वारे आपण एकही नोट न वापरता पैशांची कोड स्कॅन करून देवाणघेवाण करू शकतो. पेटीएमचे कष्टांतून उभे राहणारे उज्वल भविष्य ओळखून रतन टाटांनी त्यांत गुंतवणूक केली.

२. ओला कॅब

भाविष अगरवाल याने चालू केलेली ओला ही कंपनी भारतातील लोकांना एक बटन दाबताच टॅक्सी उपलब्ध करून देते. टॅक्सी चालकांकडून काही प्रमाणात कमिशन घेऊन ओला आपला नफा कमावते. नुसतीच टॅक्सी नाही तर रिक्षापासून लक्झरी गाड्यांपर्यंत आणि ५ मिनिटांच्या प्रवासापासून काही दिवसांच्या सहलींपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा ओला पुरवते.

३. झिओमी

आपल्यापैकी बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल, परंतु झिओमी या कंपनीमध्ये गुंतवणूक करणारे रतन टाटा हे पहिलेच व्यक्ती! तसेच चीनचधील या कंपनीत रतन टाटांनी नक्की किती गुंतवणूक केली हे अजून कुणालाच ठाऊक नाही. झिओमी ही बीजिंगमधील एक टेक कंपनी आहे जी तिच्या स्वस्तातील मोबाईल्ससाठी प्रसिद्ध आहे. भारतात या कंपनीचे पाहिले उत्पादन हे २०१४ साली आले. आता ही कंपनी अनेक घड्याळांपासून स्मार्ट-बँडपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने भारतात विकते.

४. स्नॅपडील

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या टेक स्टार्टअपपैकी स्नॅपडील हा पहिला स्टार्टअप आहे. स्नॅपडील, ज्याला अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या मोठमोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते, त्यात रतन टाटा यांनी २०१४ मध्ये गुंतवणूक केली. तेव्हा त्यांची गुंतवणूक ही पाच करोडपेक्षाही लहान होती. टाटा ह्यांनी एकूण कंपनीच्या आवाक्यातील ०.१७% भाग घेतला होता असे म्हटले जाते.

Smart Udyojak Subscription

५. झिवामे

झिवामे डॉट कॉम हा आणखी असा एक स्टार्टअप आहे ज्याला रतन टाटांच्या गुंतवणुकीचे पाठबळ मिळाले. २०११ मध्ये रीचा कर आणि कपिल कारेकर यांनी सुरुकेलेला हा स्टार्टअप काही विशिष्ट प्रकारचे कपडे विकणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. विविध युक्त्या लढवून केलेल्या कॅम्पेन्स मुळे हा स्टार्टअप प्रसिद्ध झाला आहे.

६. अर्बन लॅडर

रतन टाटा ह्यांनी अर्बन लॅडर या बंगळुरूमधील फर्निचर विकणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्येसुद्धा गुंतवणूक केली आहे. अर्बन लॅडर या कंपनीची ऍप आज भारतातील बारा शहरांत आपली उत्पादने विकते. टाटांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये अर्बन लॅडरमध्ये गुंतवणूक केली असे सांगितले जाते.

७. कॅश करो

कॅशबॅक आणि कुपन्स ह्यांना भारतात अचानक प्रसिद्धी मिळू लागली. ह्यालाच आपली संधी मानून स्वाती आणि रोहन भार्गव यांनी गुरगावमधून २०१३ साली कॅश करो सुरू केले. रतन टाटा ह्यांनी जानेवारी २०१६ मध्ये या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली तरी नक्की किती रक्कम गुंतवली हे कुणाला ठाऊक नाही.

८. अर्बन क्लॅप

डिसेंबर २०१५ मध्ये रतन टाटा ह्यांनी अर्बन क्लॅप या घरांतील सुविधा पुरविणाऱ्या ऍप मध्ये गुंतवणूक केली. या ऍपचा वापर ग्राहक घरी लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा जसे रंगकाम, सुतारकाम, प्लंबिंग, वगैरे बुक करण्यासाठी करतात.

९. लेन्सकार्ट

चष्मे, गॉगल्स, लेन्सेस अश्या वेगवेगळ्या डोळ्यांसंबंधीत उत्पादने बनविणाऱ्या लेन्सकार्ट डॉट कॉम या स्टार्टअपमध्येसुद्धा रतन टाटा ह्यांनी एप्रिल २०१६ मध्ये गुंतवणूक केली आहे.

१०. कारदेखो

कारदेखो हा एक गाड्यांचा ऑनलाईन बाजार असून त्यावरुन लोक नवीन तसेच वापरलेल्या गाड्यांची खरेदी- विक्री करु शकतात. रतन टाटा ह्यांनी जयपूरमधील गिरनार सॉफ्ट या कंपनीत गुंतवणूक केली आहे ज्यात कारदेखो डॉट कॉम, बाईक देखो डॉट कॉम आणि प्राईस देखो डॉट कॉम यांचा समावेश होतो.

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: