श्रीमंत होण्याचे नियम शिकवणारे पुस्तक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


Poor people don’t buy anything, rich people buy assets and middle class people buy liabilities and think that they’re assets.

(पूअर पीपल डोंट बाय एनिथिंग, रिच पीपल बाय अॅसेट्स अँड मिडल क्लास पीपल बाय लायबिलिटिज अँड थिंक दॅट दे आर असेट्स.)

हे वाक्य रॉबर्ट कियोस्की आपल्या ‘रिच डॅड पूअर डॅड’ या पुस्तकात प्रभावीपणे सांगतात….

१ एप्रिल २००० ला प्रकाशित झालेले ‘रिच डॅड पूअर डॅड’ हे पुस्तक फायनान्शिअल लिटरसी अर्थात आर्थिक ज्ञान याचे आजच्या काळातील महत्त्व सांगते. आपल्याकडे पैसे येतील तेव्हा मोठी गाडी घेऊ, आपले स्वतःचे घर घ्यायला हवे म्हणजे एक मोठी इन्व्हेस्टमेंट होईल, असे बर्यााच जणांना वाटले.

रॉबर्ट यांच्या मते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे पैसे नसते तर आपले बुद्धिकौशल्य असते. त्यामुळे आपले पैसे नेमके कुठे गुंतविले पाहिजेत ज्याने ते वाढत जातील हे रॉबर्ट या पुस्तकात सांगतात.

आपल्यातल्या बऱ्याच जणांना असेही वाटते की, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला येतो यावर आपण गरीब किंवा श्रीमंत मानले जातो. इतर बाबतीत हे खोटेही असेल; परंतु जेव्हा पैशांच्या बाबतीत बोलले जाते तेव्हा काही अंशी हे खरेच आहे, कारण श्रीमंत वडील आपल्या मुलांना जे शिकवतात ते गरीब वडिलांना माहीतच नसते; त्यामुळे ते आपल्या मुलांना त्यांना जितकं माहीत आहे तितकंच शिकवू शकतात.

श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत कसे होत जातात आणि गरीब लोक अधिकाधिक गरीब कसे होत जातात, हे आपल्याला या पुस्तकातून समजते, कारण श्रीमंतीचे आणि गरिबीचे मूळ कारण ते म्हणजे ‘पैसे’ हे श्रीमंत लोक कसे वापरतात आणि गरीब लोक कसे वापरतात हे रॉबर्ट यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे.

पुस्तकाच्या शेवटी रॉबर्ट काही पर्याय आपल्याला सांगतात ज्याद्वारे आपण आतापासूनच श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतो. मूळ इंग्रजी भाषेतील हे पुस्तक जगातील विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहे. सर्व पुस्तकांच्या दुकानात तसेच ऑनलाईनसुद्धा उपलब्ध होऊ शकते.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?