लघु आणि मध्यम उद्योग : उन्नतीचा मार्ग


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


जर लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रश्‍न विचारला की, तुम्हाला प्रगती करायची आहे का? तर उत्तर नक्कीच ‘हो’ असे मिळेल. पण प्रगती करण्यासाठी बर्‍याच गोष्टींचा ताळमेळ आवश्यक असतो.

अनेक छोट्या उद्योजकांसोबत काम करताना मी बर्‍याचशा वैविध्यपूर्ण उद्योजकांच्या संपर्कात आलो. त्यांचे मूल्यमापन करू शकलो. त्यांचे बिझनेस मॉडेल्स, वाढीची क्षमता, विद्यमान नेत्तृत्त्व क्षमता इत्यादी सर्व बाबी त्यांच्या वृद्धीच्या दृष्टीने पूरक ठरू शकतात का?

या सगळ्यांचा विविध पैलूंनी अभ्यास केला. पुरवठा यंत्रणा, खानपान सेवा, सहाय्यक सेवा, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन इत्यादी अनेक प्रकारचे उद्योग अभ्यासले. प्रत्येक उद्योजकाला प्रगती करायची असते पण त्यासाठी निवडला जाणारा मार्ग स्पष्ट नसतो.

‘मार्ग शोधतोय’, ‘विचार करतोय’, ‘ठाम नाही’ अशाच काहीशा दुविधांमध्ये ८०% उद्योजक अडकलेले असतात. त्यापैकी १५% लोकांना नेमकी कशी प्रगती करायची आहे हे माहिती असते पण त्याबद्दल खात्री नसते. केवळ ५% लोक खात्रीशीरपणे मार्गक्रमण करत असतात.

कसली प्रगती करावी?

उद्योग प्रगती म्हणजे नेमके काय? विक्री वृद्धी, उत्पादन वाढ, नफा वाढ, बाजारांची उपलब्धता, नवनवीन बाजारात स्थान मिळविण्याची स्पर्धा पुरवठादारांच्या संख्येत वाढ, नवनवीन उद्योगांत गुंतवणूक, नवनवीन ग्राहकांत वृद्धी, हाच एक मोठा महत्त्वाचा प्रश्‍न असतो. ज्याचे उत्तर तुमची गुंतवणूक क्षमता आणि तुमची नवनवीन बदलांना सामोरे जाण्याची क्षमता यावर अवलंबून असते.

अंत: सर्व उद्योजकांच्या वृद्धीची किल्ली ही ग्राहकवाढ व त्या अनुषंगाने विक्रीवृद्धी हीच असते. ज्यामुळे तुमच्या उद्योगाचा नावलौकिक होवून दिर्घकाळ तगण्याची क्षमता तयार होते. बाकी सर्व तसेच ठेवून विक्री साखळीत वाढ करणे हे नवीन बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी अतिशय पसंतीचे ठरते.

डिजिटल क्रांतीच्या युगात डिजिटल मार्केटिंगने अतिशय तुटपुंज्या खर्चाने मोठमोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळवता येतो आणि त्यामुळे उद्योजकालाही कमीत कमी वेळेत मोठ्या बाजारपेठेत पोहोचता येते.

प्रगतीचे महत्त्वाचे दुवे

प्रगतीमुळे होणार्‍या बदलांना सामोरे जाण्यासाठी उद्योगाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक साधन अथवा व्यक्तीची तयारी असावी लागते. त्यांचा तसा निश्‍चय असावा लागतो. प्रत्येक दृष्टीने मूल्यमापन जसे गुंतवणूक, गुंतवणूकीवरील परतावा, संभावित धोके, धोक्यांची जबाबदारी, वक्तशीरपणा, मार्गक्रमर आणि आवश्यकता भासल्यास पुनर्गमन इत्यादी होणे आवश्यक ठरते.

प्रगतीचे मूल्यमापन कसे करावे हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. जे अगोदरच ठरवावे आणि आर्थिकदृष्ट्या मोजले जावे. यामुळे प्रगतीपथावर किती आणि कुठवर जावे हे स्पष्ट होते आणि अपेक्षित यशाची शक्यता अधिक बळकट होते. एक स्पष्ट योजना आणि व्यवसायावर पूर्ण विश्वास याबाबी प्रगती पथावर मार्गक्रमण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

सुरुवात कशी करावी?

ठरलेल्या योजनेचे नियोजन करण्यासाठी आणि ती योजना कार्यान्वित करण्यासाठी एक पूर्णपणे समर्पित सहाय्यक आवश्यक ठरतो. जो योजनेतील तरतूदींचा आणि विविध बाबींचा ताळमेळ घालून योजना कार्यन्वित करेल. बदलांचे नियोजन आणि विविध बाबींचा समन्वय जसे संबंधित व्यक्ती, पद्धती, निष्कर्ष अतिशय महत्त्वाचे ठरते.

ठराविक काळानांतर सतत प्रगतीचे मूल्यमापन आवश्यक असते. नित्याने होणार्‍या बैठका, मासिक मूल्यमापन इत्यादी गोष्टी अखंडीत चालू ठेवाव्यात.

महत्त्वाचे मुद्दे

अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की, प्रगतीचा टप्पा हा मार्गक्रमण सुरू केल्यापासून ९० दिवसांत (३ महिन्यांत) दृष्टीपथात पडण्यास सुरुवात होते. महत्त्वाच्या बाबी जसे विक्री, उत्पन्न आदी दर तीन महिन्यांनी मोजल्या जाण्यात, पण त्यांची स्थिती आणि गतीचे मूल्यमापन प्रत्येक महिन्यात करावे. त्यानंतरच पुढील महिन्यातील गुंतवणूकीचा विचार करावा.

जवळपास ६०% उद्योजक हे प्रगतीपथावर मार्गक्रमण केल्यापासून ९० दिवसांत त्यांचा कल आणि त्यांची आवड बदलतात. ज्यामुळे त्यांना इच्छित फलप्राप्ती होत नाही. याची महत्त्वाची कारणे.

  • मुख्य गुंतवणूकदार किंवा मुख्य लाभग्राही व्यक्ती बदलांसाठी तयार होत नाहीत.
  • उद्योग बदलांना सामोरे जाण्यास अकार्यक्षम ठरतात.
  • मुख्य गुंतवणूकदारांसाठी गरजा बदलतात.
  • उद्योगांकडून वेळेचे पालन होत नाही.
  • उद्योगातील काही गोष्टी किंवा व्यक्ती नेहमी वेगळ्या पर्यायांचा विचार करत असतात. ज्यामुळे ते ठरलेल्या योजनेवीर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

जवळपास ३०% उद्योजकांचा धीर केवळ सहा महिनेच टिकतो. उर्वरित १०% उद्योजक प्रत्येक बदलाला सामोरे जाऊन ठरलेल्या योजनेनुसार मार्गक्रमण करतात आणि त्यांना जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर यश मिळण्यास सुरुवात होते आणि ते स्वत:ची यशोगाथा लिहितात.

लघु आणि मध्यम उद्योग हे एखाद दोन व्यक्ती त्यांची इच्छा शक्ती त्यांची क्षमता, पात्रता, धोका पत्करण्याची तयारी, त्यांचा दृष्टीकोन, उद्योगाला पुढे नेण्याची कळकळ आणि मेहनत करण्याची तयारी, प्रतिकूल परिस्थितीला आणि अनेक बदलांना सामोरे जाण्याची तयारी इत्यादी बाबींनुसार प्रगतीपथ ठरवितात आणि त्यावर मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात आर्थिक बाबी अडथळा निर्माण करत नाहीत तर त्यांची क्षमता, धैर्य आणि सातत्याचा अभाव अडथळा निर्माण करतात.

– शिरीष कुलकर्णी
९६५७७१०१८८

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?