उद्योगवार्ता

व्यापार विकास आणि प्रोत्साहन परिषदेची चौथी बैठक संपन्न

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि कार्यक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा, सेवा आणि सेंद्रीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देत जागतिक मूल्य आणि पुरवठा श्रृंखलेचा उपयोग करण्यासाठी सर्व शक्य मार्गाचा शोध घ्यावा असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. व्यापार विकास आणि प्रोत्साहन परिषदेच्या चौथ्या बैठकीत ते आज नवी दिल्लीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वृद्धी होऊन रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी राज्य आणि उत्पादन विशिष्ट निर्यात धोरण आखावे आणि आपल्या प्रदेशातल्या लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधात अधिक सुधारणा करावी असे त्यांनी सांगितले.

Advertisement

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशाची कृषी निर्यात ६० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी चालना देणाऱ्या आराखड्यावर लक्ष केंद्रीत करणारे कृषी निर्यात धोरण प्रथमच आखले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे जागतिक मूल्य साखळीशी भारतीय शेतकरी आणि भारताची उच्च दर्जाची कृषी उत्पादनं जोडली जाणार असून जागतिक कृषी निर्यातीत भारताचा वाटा दुप्पट होणार आहे.

Help-Desk
%d bloggers like this: