आपल्या मुलांना उद्याचे उद्योजक घडवण्यासाठीच्या दहा पायर्‍या


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


१. ध्येयनिश्‍चिती : आपल्या मुलांना आयुष्यात ध्येय निश्‍चित करण्यासाठी मदत करा. ध्येय कसे निश्‍चित करावे व ते पूर्णत्वास नेण्यासाठी काय करावे हे मुलांना समजावून देण्यास एक वेगळीच मजा असते. 80 टक्के लिखित स्वरूपातील ध्येय साध्य करण्यास सोपी जातात.

मुलांना त्यांच्या पसंतीची पहिली दहा ध्येये ठरवून लिहून काढायला सांगा. त्यापैकी सर्वांत सकारात्मक स्वरूपाच्या ध्येयाला प्राधान्य द्या. ते त्याचे मुख्य ध्येय असावे. त्यापुढील पायरी ठरवून त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करावी.

२. संधी ओळखायला शिकवा : अनेक लोकांना त्यांच्यातील क्षमतेची जाणीव नसते, कारण त्यांना योग्य संधी ओळखताच आलेली नसते. मुलांना अशा संधी ओळखायला शिकवा आणि त्यांच्याकडून कृती आराखडा तयार करून घ्या. याचा भविष्यातील त्यांच्या यशस्वितेत खारीचा वाटा असेल.

हे कसे शिकवाल? : मुलांना छोट्या छोट्या समस्यांवर काम करायला शिकवा. त्यांना येणार्‍या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समस्येचा सर्वांगीण विचार करायला शिकवा, ज्यामुळे मुले केवळ समस्येत न अडकता त्यांना यातून सकारात्मक तोडगा काढण्याची सवय लागेल. यातूनच भविष्यात उद्योग करण्यासाठी चांगल्या कल्पना लढवण्याची वृत्ती त्यांच्यात तयार होईल.

३. आर्थिक साक्षरता रुजवा : मुलांना लहान वयातच पैशांविषयी शिक्षण दिल्याने त्यांचा आर्थिक पाया भक्कम होतो, जे शिकवण्यात शाळा नेहमी कमी पडतात.

हे कसे शिकवाल? : मुलांना स्वत:चे पैसे मिळविण्याची संधी द्या. स्वत:चा छोटा व्यवसाय किंवा तुमचा व्यवसाय या माध्यमातून पैसे मिळविण्याची संधी द्या. गुंतवणूक करणं आणि उपलब्ध असलेल्या पैशातून जास्तीत जास्त पैसे कसे तयार करता येतील याचे ज्ञान द्या.

लहान वयातच बँकेत खाते उघडणे आणि स्वत:च्या कमाईचे नियोजन करणे अशा चांगल्या सवयी लावा. त्यांच्या हातात एक गल्ला देऊन मिळवलेले पैसे त्यात साठवायला सांगा. बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून प्रत्यक्ष करून घ्या.

४. कल्पनाशक्तीला वाव देऊन विपणनाची (मार्केटिंग) कौशल्ये विकसित करा : मुलांना विपणनासाठी तयार करून ग्राहकांना आकर्षित करण्यास तयार करा. भविष्यात उद्योग करताना याचा त्यांना फायदा होईल. आपल्याला माहीतच आहे, ग्राहकाशिवाय कोणताही व्यवसाय हा अयशस्वी ठरतो, त्यामुळे लहान वयातच हे कौशल्य विकसित केल्यास फायद्याचे ठरते.

हे कसे शिकवाल? : मुलांना निरीक्षण करण्यास प्रोत्साहित करा. विविध प्रकारची मार्केटिंगची साधना उदा. बिलबोर्ड, बॅनर्स, छापील जाहिराती तसेच टेलीव्हिजन, रेडिओ यावरील कमर्शिअल जाहिराती यांचे सतत निरीक्षण करण्यास प्रोत्साहन द्या. यातून ते काय शिकले याविषयी प्रश्‍न, कोडी यातून ओळखण्यास सांगा. यातूनच भविष्यात त्यांना करायच्या व्यवसायासाठी मार्केटिंग मटेरिअल तयार करायला सांगा.

५. अपयशातून धडे घ्यायला शिकवा : आपल्याला शाळेत असताना अपयश हे वाईट असते असेच शिकवले जाते, परंतु व्यवसायात अपयश म्हणजे सकारात्मक विचार करण्यासाठी मिळालेला धडा असतो. मुलांना वेगवेगळे मार्ग शोधून आपले ध्येय साध्य करण्यास प्रोत्साहित करा. चुका करतील, अपयशी होतील; परंतु त्यातून शिकतील याची काळजी घ्या, त्यामुळे मुले आत्मविश्‍वासी बनतील.

हे कसे कराल? : मुलांना अपयश आल्यास त्यांना शिक्षा न करता, हे का झाले? याची कारणे काय? याविषयी चर्चा करून भविष्यात असे घडणार नाही याची हमी घ्या. मुलांना एकच शिकवा, ते म्हणजे कधीही हार मानू नका.

६. सुसंवादी करा : आजची मुले केवळ सोशल मीडिया आणि टेक्स्ट मेसेज यातच जास्त गुंतलेली असतात, त्यामुळे बर्‍याच मुलांमध्ये समोरासमोर बोलण्यास किंवा टेलिफोनवर बोलण्यास न्यूनगंड आढळून येतो. यशस्वी उद्योजक होण्यास एकमेकांशी सुसंवाद करता येणे महत्त्वाचे असते. योग्य सुसंवाद करण्यास शिकवल्यास भविष्यातील व्यावसायिक नाती आणि वर्तमानातील वैयक्तिक नाती सांभाळण्यास मुलांनाच फायदा होईल.

हे कसे कराल? : मुलांना शांतपणे आणि आदराने बोलायला शिकवा. महत्त्वाचे म्हणजे थेट नजरेला नजर भिडवून बोलायला शिकवा. टेलिफोनवर बोलताना स्पष्ट आणि शांतपणे बोलायला शिकवा. ई-मेलद्वारेसुद्धा संवादाची सवय लावा. संवादासाठी संगणक, भ्रमणध्वनी यासह पारंपरिक पत्रलेखनाची सवय लावा. शुद्धलेखन व अचूक वाक्यरचना करण्यावर भर द्या.

७. स्वातंत्र्यातून निर्माण होतो आत्मविश्‍वास : तुम्हाला मुलांना स्वतंत्र आणि यशस्वी झालेले पाहायला आवडेल ना? नक्कीच! मुलांमध्ये उद्योजकीय मानसिकता तयार होण्यास त्यांनी स्वत: मिळवलेले यश कारणीभूत ठरतं. यातूनच भविष्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तसेच उद्योजक तयार होतात.

हे कसे कराल? : तुमच्या मुलांनी त्यांच्या आवडीचे खेळणे घेण्यास पैसे मागितले तर या संधीचा वापर करून त्यांच्याशी चर्चा करा. व्यावसायिक संधीतून पैसा तयार करता येईल का अशा पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करा, यातून कल्पकता रुजेल.

८. नेतृत्व विकसित करा : मुलांना शाळेत प्रवाहासोबत जाण्यास शिकवत असतात. शाळांमध्ये स्वतंत्र वैचारिक मानसिकता तयार होण्यास अडथळे येतात. उद्योजकता मुलांना चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला शिकवते. यातूनच मुले विविध प्रकारचे तोडगे काढू शकतात. लहान मुलांमध्ये नेतृत्व क्षमता रुजते.

हे कसे कराल? : मुलांना मित्रांमध्ये खेळताना नेतृत्व करण्याची संधी द्या. घरगुती कार्यक्रमात त्यांना छोटे भाषण करू देऊन लोकांसमोर बोलण्यास प्रोत्साहित करा.

९. जीवनाचा अविभाज्य भाग : विक्री हे कौशल्य आयुष्यभर आपल्या सोबत प्रत्येक टप्प्यावर तयार होत असते. कुठल्याही व्यवसायात विक्री कौशल्य महत्त्वाचे असते.

विक्री कौशल्य कसे विकसित कराल? : लहान वयापासूनच मुलांना विक्री करण्यास प्रोत्साहित करा. त्यांची जुनी खेळणी, हस्तकलेतून बनवलेल्या वस्तू विकण्यास प्रोत्साहित करा. त्यांनाच त्यांच्या उत्पादनाच्या किमती ठरवून ग्राहकांना विकू द्या.

१०. मदतीतून मिळणारा आनंद : चांगल्या कामासाठी मदतच करता येत नसेल तर, उद्योजक होण्याचा फायदा काय? मुलांमध्ये इतरांना मदत करण्याचा गुण तयार होणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यात खूप यशस्वी झाल्यावरसुद्धा मुलांचे पाय जमिनीवर राहण्यास याची मदत होते. आपले यश इतरांसोबत वाटून घेतल्याने त्यांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यास मदत होते.

हे कसे कराल? : व्यावसायिक कल्पनांवर चर्चा करताना मुलांना दान, सहकार्य, काही महत्त्वाच्या गोष्टींना हातभार लावणे, त्यासाठी आपल्या कमाईतील काही कमाई इतरांना देण्याविषयी पटवून द्या. त्यासाठी मोठ्या व्यावसायिकांचे व त्यांचे समाजातील योगदान याची माहिती द्या. यातून त्यांची घडण होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top