Advertisement
व्यक्तिमत्त्व विकास

तुमच्या यशाचे शिल्पकार 3-D

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक मोठ्या यशाची रहस्ये, ही त्याच्या सूत्रात दडलेली असतात. मोठ्या यशाला गवसणी घालणार्‍या व्यक्तींना स्वतःला घडवताना खालील तीन शिल्पकारांची गरज असते. हे तीन शिल्पकार म्हणजे :

D=Discipline / शिस्त
D=Dedication / समर्पण, वाहून घेणे
D=Determination / ध्यास

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

D=Discipline / शिस्त : तुम्ही ठरवलेल्या एखाद्या गोष्टीत यशस्वी करणारा पहिला शिल्पकार म्हणजे शिस्त. तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करताना शिस्तीचा मोठा वाटा असतो. इथे मला ‘स्वयंशिस्त’ अपेक्षित आहे आणि अशी शिस्तच आपल्याला उद्यासाठी घडवत असते. मोठं, देदीप्यमान यश प्राप्त केलेल्या व्यक्ती ह्या आपल्या आयुष्यात स्वयंशिस्तीला फार महत्त्व देत आलेल्या आहेत. यशाच्या पायरीवर चढण्यासाठी तुमच्या आयुष्यातही शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व अवश्य द्या.

D=Dedication / समर्पण, वाहून घेणे : तुम्ही ठरवलेल्या एखाद्या गोष्टीत तुम्हाला यशस्वी करणारा दुसरा शिल्पकार म्हणजे, त्या कार्यासाठी स्वतःला संपूर्ण वाहून घेणे. १०० टक्के विनाशर्त समर्पण, तरच मोठं यश शक्य आहे. म्हणजे मी जर ठरवलं की, मला माझ्या व्यवसायात पुढील सहा महिन्यांत साठ लाख रुपये कमवायचे आहेत, तर मला त्या साठ लाखांसाठी रात्रंदिवस झटलं पाहिजे.

ते साठ लाख रुपये तुम्हाला सकाळी दात घासताना दिसले पाहिजेत, जेवतानाही दिसले पाहिजेत, एखाद्या गिर्‍हाईकाला भेटताना दिसले पाहिजेत. एवढंच काय, तर रात्री झोपतानाही तुम्हाला साठ लाखच दिसले पाहिजेत, तरच साठ लाख प्रत्यक्षात कमवाल. याला म्हणतात संपूर्ण समर्पण. हे एक प्रतीकात्मक उदा. आपण पाहिलं. हेच तत्त्व तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता.

D=Determination / ध्यास-जिद्द : तुम्ही ठरवलेल्या एखाद्या गोष्टीत यशस्वी करणारा तिसरा शिल्पकार म्हणजे ध्यास-जिद्द आणि जिद्दीशिवाय / ध्यासाशिवाय तुमच्या यशासाठी पळणार्‍या पायांना गती आणि बळ येत नाही. तेव्हा मी मला हव्या असणार्‍या यशासाठी जिद्दी आहे, त्याचा मला ध्यास आहे, हे इतरांना तुमच्या प्रत्येक कृतीतून दिसू द्या. मी यश मिळवणारच. त्यासाठी मी जिद्दी आहे. मी हट्टाला पेटलो आहे आणि मी ते करणारच, असं तुम्ही स्वतःला व इतरांना वारंवार सांगा.

आयुष्यात प्रचंड यश प्राप्त केलेल्या व्यक्तींनी वरील तीनही गोष्टी चांगल्या प्रकारे आत्मसात करून त्यावर अभ्यास केलेला आहे. तुम्हीही तुमच्या आयुष्यात वरील तीनही शिल्पकारांचा (3-D) निश्‍चितच उपयोग करा व मोठं यश प्राप्त करा. ध्येयाविषयीची जिद्दच तुम्हाला सतत पळतं ठेवते.

हे होऊ शकतं!

 • अशाने तुम्ही तुमच्याविषयी व तुमच्या भविष्याविषयी स्पष्ट असता.
 • तुमची पैशाची, कष्टाची आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेची बचत होते.
 • समर्पणामुळे तुम्ही ठरवलेल्या गोष्टींबाबत जास्त एकाग्र राहता येते.
 • तुम्हाला तुमच्या यशाविषयी असलेल्या ध्यासामुळेही, त्या वाटेतील अडथळेही तुम्हाला वाट करून देतात.
 • ध्येयाविषयीची जिद्द तुम्हाला सतत मार्ग दाखवत राहते.
 • महत्त्वाचं म्हणजे शिस्त तुम्हाला नुसतं विजयी करत नाही, तर तो कसा टिकवायचा हेसुद्धा शिकवते.
 • शिस्त तुम्हाला एका दगडातून सुंदर अप्रतिम शिल्पाचं रूप देत असते.
 • समर्पण तुम्हाला तुमच्यातील १०० टक्के योग्यता वापरायला शिकवते.
 • विनाशर्त समर्पण तुमच्या आयुष्यात अनेक कलाटणींना जन्म देऊ शकते.

हे करून तर बघा!

 • स्वयंशिस्ती व्हा. स्वयंशिस्तच तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाला कारणीभूत ठरू शकते.
 • तुम्ही प्राप्त करू इच्छित असणार्‍या यशासाठी स्वतःला झोकून द्या.
 • अशा वेळी तुम्हाला त्या गोष्टीशिवाय दुसरं काहीही सुचता कामा नये.
 • जग याचं साक्षीदार आहे की, ध्यासाशिवाय मोठं काहीच घडू शकत नाही.
 • इतरांना अचंबित करणारं यश प्राप्त करण्यासाठी जिद्दच तुम्हाला मदत करू शकते.
 • तेव्हा मोठ्या यशासाठी जिद्दी व्हा.
 • समर्पण हे विनाशर्तच असावं.
 • ध्यासाने अनेक विजेत्यांना जन्म दिलेला आहे.
 • मोठ्या यशाचा ध्यास धरा.

– विश्वास वाडे

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!