Advertisement
उद्योगोपयोगी

हो, आता ‘मुद्रा’ मिळवणे होणार आणखी सोपे!

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त १२५ मध्ये!

Book Here: https://imjo.in/YSMSQK

केंद्र सरकारने लहानातील लहान उद्योजकाला दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळावे यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ २०१५ साली लागू केली होती. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीची मुख्य जबाबदारी ही देशातील सर्व बॅंका व अन्य वित्तसंस्थांकडे देण्यात आली होती. एनपीएच्या भूताने झपाटलेल्या बॅंका आणि त्यातच त्यांचा लाल फितीत चालणारा भोंगळ कारभार यामुळे या बँकाची नीती ही सहजासहजी कर्ज न देण्याचीच राहिली. यामुळे नुकसान झाले ते सामान्यातील सामान्य उद्योजकाचे. सरकारने त्याच्यासाठी योजना तयार करूनही त्याला त्या योजनेचा लाभ म्हणावा तसा झालाच नाही.

तीन वर्षांनंतर ‘मुद्रा’ योजनेबाबत या वास्तवाचे भान केंद्र सरकारला आल्यामुळे त्यांनी या योजनेची सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी देशातील ४० खाजगी फायनान्स कंपन्या व आघाडीच्या स्टार्टअप्सना हाताशी घेतले आहे. या ४० कंपन्याही आता मुद्रा योजनेअंतर्गत लघुउद्योजकांना वित्तपुरवठा करणार आहेत. दि. २३ मे रोजी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात या योजनेचे नव्याने उद्घाटन करण्यात आले.

या ४० कंपन्यांमध्ये अमूल, पतंजली, अमॅझॉन, फ्लिपकार्ट, टाटा मोटर्स फायनान्स, जावेद हबीब सलून, मेक माय ट्रिप, स्विगी, उबर, ओयो, हिरो फायनान्स, बजाज फायनान्स, गोआयबिबो डॉट कॉम, एल एण्ड टी फायनान्स, मुथूट फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, सीओए, ग्रॅब, मेरू, डबावाला फाउंडेशन, कार्स ऑन रेंट, डेलिव्हेरी, लावा, एक्स्प्रेस स, हिंदुजा लेयलॅंड फायनान्स, लोडशेअर, महिंद्रा फायनान्स, कोटक महिंद्रा प्राईम, झोमॅटो, एडेलवाइस, बिग बास्केट, यात्रा डॉट कॉम, ओला इत्यादींचा समावेश आहे.

‘मुद्रा’ आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.

अधिक वाचा : समजून घ्या ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ नेमकी काय आहे?


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: