व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त असे पाच मॅनॅजमेन्टचे सिद्धांत

उद्योजकाला अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असते. जगभरात अशा अनेक मॅनेजमेंट थिअरी तयार केल्या आहेत, ज्या प्रत्येक उद्योजकासाठी लाभदायक ठरू शकतील.

हे व्यवस्थापकीय सिद्धांत तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे व्यवस्थापकीय नियोजन, मार्केटिंग स्ट्रॅटेजी तसेच नवे सर्जनशील प्रयोग करण्यासाठी उपयुक्त ठरतील. या दृष्टीने प्रत्येक उद्योजकाने या सिद्धांतांचा अभ्यास करून त्यांची आपल्या व्यवसायात अंमलबजावणी केली पाहिजे.

१. लीन स्टार्टअप मेथडॉलॉजी

तुम्हाला स्टार्टअप सुरू करून तो सुस्थापित करण्याची एक नवोदित पद्धत एरिक रीस यांनी आपल्या ‘लीन स्टार्टअप’ या सिद्धांतात मांडली आहे. स्टार्टअपच्या जगात गतीला सर्वाधिक महत्त्व आहे. तुमच्या डोक्यातली कल्पना अतिजलद गतीने बाजारात उतरले तरच त्याला महत्त्व मिळणार आहे, नाही तर दुसरे कोणी तीच कल्पना घेऊन तुम्हाला मागे टाकून पुढे निघून गेलेले असेल.

त्यामुळे ‘लीन स्टार्टअप’मध्ये भराभर प्रयोग करणे, त्यातून आलेल्या सिद्धांतांची नोंद करणे आणि जलद गतीने आपल्या स्टार्टअपमध्ये ते कार्यान्वित करणे यावर भर दिलेला आहे. भारतीय उद्योजक ‘लीन स्टार्टअप’मध्ये दिलेल्या सिद्धांतांचा आधार घेऊन जगाच्या स्टार्टअप विश्‍वात आपली नवी ओळख निर्माण करू शकतात.

२. डिझाईन थिंकिंग

‘डिझाईन थिंकिंग’ ही प्रणाली नवनवील प्रयोगामध्ये वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेण्याला प्राधान्य देते. वापरकर्त्यांशी योग्य प्रकारे संवाद साधून त्याची समस्या जाणून घेऊन, त्यावर आधारीत उपायांची कल्पना करून, त्या कल्पनांचे प्रोटोटाइप तयार करून एक प्रॉडक्ट विकसित करण्यापर्यंत नेणे यामध्ये अंतर्भूत आहे.

३. ब्लू ओशन स्ट्रॅटेजी

जिथे आजपर्यंत कोणीही हात लावलेला नाही, जी बाजारपेठेला अद्याप कोणी स्पर्श केलेला नाही, त्या बाजारपेठेला आपले लक्ष्य करून त्यांच्यासाठी नवीन, इनोव्हेटिव्ह असे प्रॉडक्ट किंवा सेवा बाजारात आणणे आणि स्वत:ची अशी एक नवी बाजारपेठ निर्माण करणे हे डब्ल्यू.

blue ocean strategy

चॅन किम आणि रेनी माउबोर्गने यांनी विकसित केलेली ‘ब्लू ओशन स्ट्रॅटेजी’ सांगते. यामध्ये तुमची कोणाशीच स्पर्धा नाही, कारण तुम्हीच प्रथम आहात. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट मुव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळते.

४. थिअरी ऑफ डिस्ट्रप्टिव्ह इनोव्हेशन

नवीन तंत्रज्ञान किंवा बिझनेस मॉडेल जे जुन्या तंत्रज्ञानाची किंवा बिझनेस मॉडेलची जागा घेऊन कशा प्रकारे नवीन उद्योगांना जन्माला घालेल या थिअरीची मांडणी केली आहे क्लेटन क्रिस्टेनसेनने. उदाहरण पाहायचे झाले तर स्मार्टफोन विकसित झाल्यामुळे कॅल्क्युलेटरसारख्या किती तरी छोट्या उपकरणांचा वापर कमी झाला.

फ्लॉपी, सीडी, डीव्हीडीसारख्या गोष्टी कालबाह्य झाल्या. डिजिटल कॅमेराने रील कॅमेराला बाजारातून हद्दपार केले. भारतात बरेच प्रश्‍न आहेत. त्यांची उत्तरे नव्याने शोधावी लागतील. अनेक जुन्या गोष्टी कालबाह्य ठरवून नवनवील बिझनेस मॉडेल जन्माला घालावी लागतील. यामध्ये तुम्हाला क्रिस्टेनसेनचा हा सिद्धांत उपयोगी ठरू शकतो.

५. पोर्टर्स फाइव्ह फोर्सेस

स्पर्धा मग ती विद्यमान स्पर्धकाशी असोत, नवीन बाजारात येणार्‍या स्पर्धकाशी असोत की तुम्हाला पर्याय होऊ शकेल अशा स्पर्धकाशी असेल; या स्पर्धेला तोंड कसे द्याल याचे मार्गदर्शन तुम्हाला मायकेल पोर्टरने विकसित केलेल्या ‘पोर्टर्स फाइव्ह फोर्सेस’ या सिद्धांतात मिळू शकते. उद्योजकाला व्यवसायातील प्रत्येक स्पर्धेचे आकलन करून धोरण ठरवण्यात हा सिद्धांत उपयुक्त ठरतो.

आपले ग्राहक व पुरवठादार यांच्याशी वाटाघाटी करण्यातही पोर्टरच्या या सिद्धांताचा उपयोग होतो. या लोकप्रिय सिद्धांतांचा, थिअरीजचा तुमच्या गरजेनुसार उपयोग केल्याने तुम्हाला बाजारपेठेतील गुंतागुंत, जोखीम कमी करण्यात आणि नाविन्यपूर्ण संधींचा शोध घेण्यात फायदा होईल.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?