Depressed वाटतंय? या पाच गोष्टी करून पाहा हलके वाटेल!

१. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारा

जेव्हा आपण उदासीन असतो व आपल्याला हवे तसे घडत नसते, तेव्हा करण्यासारखी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वात जवळ जी व्यक्ती आहे, तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. यात आपला मित्र-मैत्रीण असेल, भावंड असतील, आई-वडील असतील किंवा अगदी आपली लहान मुलंसुद्धा.

या गप्पांमध्ये कामाचा विषय असायलाच हवा असे नाही. या मनमोकळ्या गप्पांमुळे आपले साचलेले विचार मोकळे होतील व त्याच परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळेल.

२. आपण यशस्वी झाल्यावर कसे असाल याचा विचार करा

बऱ्याचदा यशाचा पल्ला खूप लांब असतो व आपण कितीही काम केले तरी यश मिळायला अजून खूप वेळ आहे या विचाराने आपण खचून जातो. अशावेळी ते यश आपल्याला मिळाल्यावर आपण किती आनंदी असू, आपल्यासमोर कोणत्याच समस्या नसतील, आपण प्रचंड आनंदी व खूश असू.. हे डोळ्यासमोर आणा.

काही काळ ते सर्व चित्र डोळ्यासमोर आणून त्यात जगा; थोड्या वेळाने आपण आपोआप प्रेरित व्हाल. हे सर्व आपल्याला मिळवायचे आहे हे स्पष्ट डोळ्यासमोर दिसू लागले की त्याकडे जाण्याचा मार्गही आपण आनंदाने पार कराल.

३. छोटी-छोटी ध्येये ठरवा

जेव्हा आपण प्रेरित नसतो तेव्हा आपण आपल्या कुवतीच्या केवळ २०-३० टक्केच काम करू शकतो. अशावेळी जर आपण मोठ-मोठी ध्येये ठेवली तर त्यात अपयश येण्याचेचीच लक्षणं जास्त असतात. त्यामुळे अशावेळी छोटी-छोटी, थोड्या काळासाठी आखलेली ध्येये समोर ठेऊन त्यावर काम करावे. या काळात लॉंग टर्म ध्येये ठरविणे टाळा. कारण आपल्या कुवतीच्या कितीतरी पट कमी ध्येय या काळात आपल्याकडून ठरवले जाते.

४. ध्यान करा

ध्यान करा हे ऐकताच काहीतरी कंटाळवाणं डोळ्यासमोर येईल, परंतु दिवसातली केवळ पंधरा मिनिटं डोळे बंद करून शांत बसून श्वसनाकडे लक्ष दिले तरी याचा खूप फायदा होऊ शकतो. यामुळे एकाग्रता वाढतेच शिवाय एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला मिळतात.

एखाद्याचा फोन हँग झाल्यावर त्यावर आपण त्याला सहज सांगतो की रिस्टार्ट करून बघ; तसेच आपले अडकलेले विचार, अडकलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यान हे रिस्टार्ट फिचरचे काम करते.

५. बाहेर फिरून येणे

आपल्याला जेव्हा उदासीन वाटत असते तेव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला खोलीत कोंडून घेतो किंवा घरच्याघरीच किंवा ऑफिसमध्ये विचार करत बसतो. त्याच त्या वातावरणात राहून तेच ते विचार केल्याने आणखी कंटाळवाणे होतो. यावर एक साधा सोपा उपाय म्हणजे चपला घालून बाहेर पडणे.

बाहेर पडून आपण जॉगिंग करू शकता, एखाद्या बागेत जाऊ शकता किंवा नुसता वॉक घेऊ शकता. यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलते, आपण कळत-नकळत इतर लोकांचे, त्यांच्या वागणुकीचे, रहाणीमानाचे निरीक्षण करता. यामुळे आपल्या समस्येचा सर्वांगाने विचार करण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?