सुख समाधान, आर्थिक स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन, चांगले राहणीमान आणि जीवनशैली एकाचवेळी मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यवसाय करणे.
व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी अपार मेहनत आणि त्याग करावा लागतो आणि व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी, अपयश याचा सामना करत अनुभवाच्या शिक्षणाने तावून सुलाखून निघावे लागते; तेव्हा कुठे व्यवसायात म्हणावे तसे यश येते, हे अनुभवी व्यावसायिक आपल्याला वेळोवेळी सांगतात.
एक उद्योजक म्हणून आपल्याला नेहमीच आपल्या स्वतःच्या त्रुटी आणि परीक्षांतून शिकावे लागते. व्यवसायात यशस्वी होऊन इतरांनी आदर्श घ्यावा इथपर्यंत स्वतःला एक उंचीवर नेणे हे कठीण असते. त्याऐवजी व्यवसाय सुरू करणे शक्य असते आणि तुलनेनं सोपेही असते.
आपण काही टिप्स पाहू जेणेकरून आपल्याला व्यवसायात यश मिळवण्यासाठी मदत करतील.
१. प्री – वर्किंग : सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची प्री-वर्किंग. आपल्या ग्राहकाला काय हवंय. त्यांची मागणी आणि त्या गोष्टीतील रस समजून घेण्यासाठी सर्व्हे म्हणजेच सर्वेक्षण करा. त्याची चाचणी करा. ग्राहकाची मागणी आणि त्यासाठी आवश्यक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून आपला पायलट प्रोजेक्ट तयार करा.
सॅम्पल प्रॉडक्ट तयार करून ते लोकांना वाटा. लोकांच्या सूचना आणि मते घेऊन आवश्यक तो बदल करा. शेवटी आपले प्रोडक्ट बाजारात उतरावा.
२. योग्य मार्गाने एक परिपूर्ण उत्पादन तयार करण्याचा विचार करत आहात. फक्त प्रारंभ करा आणि विक्री करा.
३. आपल्या विद्यमान प्रेक्षकांना आणि ग्राहकांना अधिक चांगले सेवा देण्यासाठी मार्ग शोधा. पैशाने नक्कीच व्यवसायाला गती मिळते. पण इतरही अनेक गोष्टी व्यवसायवाढीसाठी आवश्यक असतात आणि तो व्यवसाय यशस्वी करण्यात हातभार लावतात. आपली चांगली परिपूर्ण वेबसाईट बनवा. त्यामुळे विक्रीसाठी याचा चांगला फायदा होईल.
आपल्या ग्राहकांची यादी तयार करा. त्याना जे हवे ते द्या. पुढच्या वेळी अधिक सुधारणा करत राहा. आपले प्रॉडक्ट, सेवा जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी कार्यरत राहा. आपल्या व्यवसायाच्या बाजारपेठेला काय हवे ते शोधा. मग ते त्यासाठी तयार करा.
४. ग्राहकांकडून अभिप्राय घ्या. त्यातून सुधारणा करा. आपण कोणीही परिपूर्ण नसतो. वेळोवेळी ग्राहकांचा अभिप्राय घेऊन आपणच आपल्याला जागरुक ठेवायला हवे. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यात आपण नेहमी आग्रही आणि अग्रभागी असू.
५. सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुकसारख्या माध्यमांच्याद्वारे आपल्या ग्राहकांचे गट बनवा. लोकांच्या सूचना, चांगल्या गोष्टी यांचे आपल्याला फायदा होतो. विक्रीसही मदत होते. ब्रॅण्ड तयार करा. आपल्या टार्गेट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी ब्रॅण्ड मदत करतो. शिवाय ब्रॅण्ड हा विश्वासार्हतेचा पहिला टप्पा आहे.
ब्रॅण्डमुळे आपण आपल्या ग्राहकांना विश्वास देतो. आपल्या व्यवसायाची अथवा आपली गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.