Advertisement
उद्योगसंधी

कमीतकमी गुंतवणुकीत करू शकाल अशा ५१ व्यवसायांची यादी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आज आपल्यापैकी अनेकांना यशस्वी उद्योगधंदा करायचा आहे. काही जण तर सुरुवातही करतात, पण तो उद्योगधंदा पुढे मात्र घेऊन जाता येत नाही आणि त्यांचही तेच होत जे आज भारतातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्टअपच होत. अपयश. असो माझा या लेखाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून तुम्हाला आरसा दाखवणे हा मात्र आहे.

तुम्ही तो बघायचा का डोळे झाकायचे हे तुम्हीच ठरवा. माणसाला नेहमी गोड बोलणारी, (खोटी) स्तुती करणारी, आपली वाह वा करणारी अशी माणसं जास्त आवडतात आणि नकळत आपण अशा माणसांच्या गराड्यात अडकत जातो. अशाने आपल्या उद्योजकीय वाटचालीत येणाऱ्या अनेक गोष्टींना नजरअंदाज करतो व पुढे मोठ्या खड्यात पडतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

सांगायचा मुद्दा असा की, त्यातही खासकरून नवउद्योजकांना मला सांगावस वाटतं की, कोणताही उद्योग हा एका आयडीयाने-कल्पनेने जन्माला येतो, पण त्या कल्पनेने तो मोठा होत नाही. तर तो मोठा करण्याचे काही नियम आहेत, त्यांचा उपयोग केला तर तुम्हालाही तुमच्या यशाची गाथा लिहिता येते. असो आज माझा इथला विषय आहे, कमी भांडवलात करता येणारे उद्योगधंदे.

मी खाली ५१ असे उद्योग दिलेले आहेत, जे की तुम्ही अगदी कमी भांडवलात सुरू करू शकता. यातले काही तर अगदी १०,००० रुपयांपेक्षाही कमी भांडवल लागते. मी म्हणेन की स्वतःच्या व्यवसायात भांडवल लावा, कारण पैसा गुंतवला तरच तुम्हाला त्याची किंमत राहते. (या धंद्याची संख्या अजून खूप जास्त आहे.)

उद्योगधंद्यांचे काही प्रकार :

अ) सेवा (Services)
आ) अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing)
इ) उत्पादन (Manufacturing)
ई) व्यापार (Trading)

अ) सेवा (Services)

 1. योग प्रशिक्षण
 2. गायन, नृत्य, कराटे, मिमिक्री, चित्रकला, इत्यादी कला शिकवणे
 3. समुपदेशन
 4. विमा एजेंट
 5. प्रोपर्टी ब्रोकर
 6. लोन करून देणे
 7. संभाषण कला शिकवणे
 8. इंग्रजी व इतर भाषा शिकवणे
 9. पाककृती शिकवणे
 10. लहान उद्योगांना सोशल मीडिया सर्विसेस देणे
 11. डीटीपी, लोगो, टॅगलाईन, सोशल मीडिया ग्राफिक बनवणे
 12. युट्युब व्हिडिओ तसेच प्रोमोशनल व्हिडिओ तयार करून देणे
 13. लहान उद्योजकांना बिजनेस – लिडस मिळवून देणे
 14. सायकल रिपेरींग सर्विस
 15. घरी ब्युटी पार्लर चालवणे
 16. मोबाईल रिपेरिंग सेवा देणे
 17. पेस्ट कंट्रोल सेवा देणे
 18. HR सेवा पुरवणे
 19. शाळेच्या ट्युशन घेणे
 20. उन्हाळ्यात ताक, लिंबु सरबत विकणे
 21. प्रुफ रिडींग करून देणे
 22. कन्टेन्ट राईटींग करणे
 23. फायनान्शील प्लॅनिंग करून देणे
 24. फोटोग्राफी क्लासेस घेणे
 25. फोटोग्राफी करणे
 26. गणपतीच्या मुर्त्या (फक्त) विकणे
 27. गाड्या धुणे
 28. बिडींग्स आणि मोठ्या ऑफीसेसला साफसफाई सेवा पुरवणे
 29. कपडे धुऊन देणे
 30. शुज धुऊन देणे
 31. पाळणाघर चालवणे
 32. ग्राफोलॉजी सेवा आणि त्याचे क्लासेस
 33. वास्तु शास्त्र, अंकशास्त्र आणि जोतिषशास्त्र
 34. प्राणिक हिलींग
 35. लहान-लहान कॉन्ट्रक्टींगची कामं घेणे
 36. शेणाच्या गौऱ्या, राख, शेळ्याच्या लेंड्या ऑनलाईन विकणे. (थोडा अभ्यास करुन)

आ) अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing)

 1. मसाले, लोणचे, पापड व इतर पारंपारीक पदार्थ इत्यादी करून विकणे
 2. डिंकाचे लाडू, चिक्की, चकली, फरसान इत्यादी करून विकणे
 3. मुग, मटकी व इतर ताजे कडधान्ये भिजवुन विकणे
 4. जेवनाचा डबा बनवून देणे
 5. नास्ता बनवुन विकने, जसे की – पोहे, उपमा, पोळी भाजी, इटली, वडा, सॅन्डवीच इत्यादी
 6. लहान समारंभ, बर्थडे पार्टी व इतर लहान समारंभाच्या जेवनाच्या ऑडर्स घेणे
 7. भेळ बनवुन विकणे
 8. फ्रुट ज्युसेस, फ्रुट सलाट विकणे
 9. चांगला चहा, कॉफी बनवुन विकणे
 10. स्पेशल बिर्यानी किंवा तशी डिश बनवुन विकणे
 11. मसाले बनवुन स्वतःच्या ब्रॅण्डने विकणे

इ) उत्पादन (Manufacturing)

 1. लहान मुलांचे लाकडी खेळनी बनवुन विकणे
 2. गणपतीच्या मुर्त्या बनवणे

ई) व्यापार (Trading)

 1. एका ठिकाणाहुन कमी किमतीत वस्तु घेऊन त्या ग्राहकांना काही नफा ठेवून विकणे
 2. एखाद्या चांगल्या प्रोडक्टसची पण कमी गुंतवणुकीची डिलरशीप घेणे

वरीलपैकी किंवा कोणताही उद्योगधंदा सुरू करताना खालील खबरदारी घेतल्यास त्याचा फायदा होईल. उद्योगधंदा सुरू करण्याअगोदर त्याचा थोडातरी अभ्यास करा. तुमची आवड-निवड तपासा. तिथल्या भौगोलीक परिस्थितीचा अभ्यास करा.

जिथे उद्योग करायचाय तिथल्या लोकांची कोणती समस्या तुम्ही तुमच्या सेवा किंवा वस्तुच्या माध्यमातुन सोडवाल हे ठरवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या उद्योगधंद्याबद्दलची चार चांगली पुस्तके वाचा. शक्य असल्यास तज्ज्ञाची मदत घ्या. नवीन पद्धतीने उद्योग करण्याचा प्रयत्न करा.

– विश्वास वाडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!