जाहिरातीमधील 5-M


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपल्या उद्योगासाठी जाहिरातीची योग्य अशी पद्धत निवडताना खालील घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. याला फाइव्ह एम (5-Ms) असेही म्हणतात.

१. मिशन : आपण जाहिरात नक्की कोणत्या कारणासाठी करत आहोत आणि त्यातून आपल्याला नेमके काय अपेक्षित आहे. उदा. विक्री वाढवणे, लोकांना आकर्षित करणे, कार्यक्रमाचे प्रमोशन, इ.

२. मनी : मनी अर्थात पैसे. आपण किती रक्कम गुंतवू शकतो, त्यातून आपल्याला किती नफा अपेक्षित आहे, वगैरे.

३. मेसेज : आपल्याला आपल्या जाहिरातीतून लोकांपर्यंत नेमका कोणता संदेश पोहोचवायचा आहे हे यात येते. जसे आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, उपयोगिता वगैरे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे किंवा आपल्या कंपनीबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे, इ.

४. मीडिया : मीडिया म्हणजे आपण आणि आपले ग्राहक यांना जोडणारा दुवा. अर्थात आपण कोणती साधने वापरून आपला मेसेज (जाहिरात) लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. उदा. टी.व्ही., रेडिओ, सोशल मीडिया, इ.

५. मेजर : मेजर म्हणजे आपल्या जाहिरातीचे आणि तिच्या परिणामांचे मोजमाप. आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीला नफा म्हणू, किती विक्री झाली की तो तोटा ठरेल अशा अनेक गोष्टी मेजर म्हणजेच मोजमापात येतात.

एखाद्या उद्योगाची जाहिरात ही त्या उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कारण ती एक जाहिरात बघूनच लोक आपली कंपनी, उत्पादने, आपली सेवा वगैरे कसे असेल याचा अंदाज बांधत असतात.

वरवर सोपे वाटणारे हे जाहिरातीचे काम एखाद्या उद्योजकाला अमाप नफा मिळवून देऊ शकते आणि त्याचसोबत अचानक खालीसुद्धा खेचू शकते. त्यामुळे आपल्या ग्राहकांचा व्यवस्थित अभ्यास करून आणि जाहिरातीतले बारकावे समजून आपल्या उद्योगाची जर जाहिरात केली तर ती नक्कीच एखाद्या नफ्याकडे जाणारी वाट ठरू शकते.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?