व्यवसायासाठी उपयुक्त ‘5-S’ ही जपानी कार्यपद्धती


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


‘5-S’ ही एक जपानी तज्ज्ञांनी विकसित केलेली कार्यपद्धती असून कंपनीमध्ये ऑफिस, वर्कशॉप सुव्यवस्थित ठेवण्यात त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

ही प्रणाली आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात मित्र व नातेवाईक यांच्या संदर्भात लागू केली तर आपण आपले वैयक्तिक आयुष्य व्यावहारिक पातळीवर समृद्ध करू शकतो. खरं तर बऱ्याच गोष्टी आपण अशाच पद्धतीने करत असतो हे आपल्याला लेख वाचताना लक्षात येईल.

5S मध्ये तज्ज्ञांनी ज्या पायर्‍या सांगितलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे [5S in Marathi] –

  1. निवड- आवश्यक/अनावश्यक (Sort out)
  2. प्रत्येक वस्तूसाठी जागा आणि जागेवर वस्तू (Arrange)
  3. उजाळा (Shine It) – संगोपन
  4. विशिष्ट मानांकन (Standardize)
  5. दैनंदिन शिस्त (Discipline)

तसे पाहिले तर आपले आयुष्य हे ढोबळमानाने चार प्रकारच्या घटकांनी व्यापलेले असते. नातेवाईक, मित्र, सहकारी आणि समाज हेच ते मुख्य घटक. यातील समाज ही अदृश्य अशी बाब असली तरी आपण पहिले तीन घटक किती व्यवस्थितपणे हाताळतो यावर ते अवलंबून असते. 5S मध्ये सांगितलेल्या स्टेप्सनुसार आपण ते कसे करायचे ते पाहू या.

1. निवड

आवश्यक / अनावश्यक (Sort out) इंग्रजीत म्हण आहे. “Relatives come by birth, Thank God I Can Choose Friends” हे जरी खरे असले तरी आपण नातेवाईक व मित्र हे दोन्ही घटक क्रमवारीत बसवू शकतो.

(A) ICAE (In case of all Emergencies) हे म्हणजे अतिशय जिवाभावाचे नातेवाईक वा मित्र. अर्ध्या रात्री फोन करावा आणि कुठलाही प्रश्नo न विचारता किंवा कारण न देता ताबडतोब हजर होणारे या वर्गात येतात. बोटावर मोजता येतील एवढेच असलेले खंडीभरापेक्षा जास्त चांगले.

आपल्या मोबाइलवरदेखील सेव्ह करताना त्यांच्या नावापुढे ICAE असा उल्लेख करावा म्हणजे आपण संकटात असताना व फोन करू शकत नसलेल्या परिस्थितीत अनोळखी देखील प्रथम त्यांना संपर्क करेल.

(B) IBNC (Important but not close) महत्त्वाचे पण जिवाभावाचे नसलेले. दुसरा वर्ग तयार करा जे नातेवाईक व मित्र, श्रीमंत उद्योगपती किंवा राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. थोडक्यात मी वजनदार लोकांबद्दल बोलतोय. अशा लोकांशी जरूरी पुरते संबंध ठेवावे. कारण इथे फायदा होईल याची टक्केवारी तुलनेत खूपच कमी असते. अतिशय अडलेल्या स्थितीमध्ये थोडा हातभार लागावा इतपत पुरे.

(C) VRF (Virtual Relative or Friends) आभासी मित्र वा नातेवाईक. आजच्या इंटरनेटच्या युगात आभासी मित्र हजारोंनी होत आहेत आणि आपल्या वैयक्तिक जीवनात ते अतिक्रमण इतके भयानक आहे की सख्खेदेखील पारखे व्हायची वेळ आली आहे.

फेसबुक, ट्विटर आणि तत्सम सोशल मीडिया यात आपण इतके खोल गर्तेत जात आहोत की आपल्या गोष्टींना ‘लाइक्स’ मिळाली नाही तर आपला दिवस बेचैनीत जातो. वेळीच सावरलो नाही तर ह्या आभासी गोष्टींमुळे खरे नातेसंबंध हरवून जातील.

2) विशिष्ट जागा (Set in Order)

तुकाराम महाराज म्हणतात, ‘जर तुम्हाला स्वत:मध्ये खरोखर सुधारणा हवी असेल तर निंदकाचे घर असावे शेजारी’. म्हणजे आपल्या आयुष्यात प्रत्येकाचे स्थान कुठे असायला हवे हे संत सांगतात. त्यामुळे आपण खालीलप्रमाणे करणे योग्य राहील.

ICAE- अशी मित्र आणि नाती सदैव आपल्या हृदयाच्या जवळ.
IBNC – कामापुरता संबंध ठेवणे चांगले.
VRF – आभासी जगाशी कमीत कमी संबंध ठेवणे.

3) उजाळा (Shine)

तुम्ही नात्याचे ओव्हर व्हाऊलिंग किंवा मेंटेनन्स हा शब्द ऐकला आहे का?

आपण आपल्या रोजच्या वापरातील वस्तू जसे कार, दुचाकी, ए.सी. वगैरे गोष्टी व्यवस्थित चालाव्यात म्हणून त्यांना तेलपाणी करून घेत असतो, तसेच आपल्या जीवनात मित्र व नातेसंबंधाचे नियमित मेंटेनन्स करणे आवश्यक असते. म्हणजे या संबंधांना उजाळा देणे जरुरी असते.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण पळत आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे एकच सबब आहे- वेळच नाही. केवळ या एका सबबीपायी अनेक वेळा संबंध दुरावण्याची वेळ येते.

खरं तर वेळ नाही हे धादांत खोटे विधान आहे. आपण जर रोज करत असलेल्या गोष्टीचे मूल्यवर्धित (Value Added) व विनामूल्यवर्धित (Non Value Added) असे वर्गीकरण करायला घेतले तर असे लक्षात येईल की, आपण आपला बहुतांश वेळ हा non value added गोष्टीवर खर्च करण्यात घालवत असतो.

(प्रत्येक वक्तीने हा प्रयोग करून बघायला पाहिजे. मी इंडस्ट्रीत काम करत असल्याने बर्याेच वेळा केला आहे म्हणून हे विधान करत आहे.) लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की, आम्ही बारा तास काम करत असतो; पण value added काम फक्त सहा तासच होते.

बाकी वेळ निरर्थक गोष्टी करण्यात जातो. नातेसंबंध, मैत्री जर अधिक घट्ट बळकट करायची असेल तर पैसे लागत नाहीत किंवा आणखी काही लागत नाही. तुम्ही फक्त वेळ दिला पाहिजे, तोही जेव्हा गरज असते तेव्हा.

नात्यांचे संगोपन
आपलं माणूस कोण?
आपली माणसं कशी निर्माण करायची?
आणि आपली माणसं कशी सांभाळायची?

या प्रश्नााचं शोधलेलं उत्तर

अडचणीत ज्या व्यक्तीची आठवण येते तो व्यक्ती आपला असतो. आपण त्यांना ICE (in case of emergency) ह्या नावाने मोबाइलमध्ये save करतो.

आपल्या घरातील काडीपेटीचे उदाहरण पाहू. आपल्या घरात कुठे तरी काडीपेटी असते. ती कुठे आहे हे आपणाला माहीतपण असतं, ती जागेवर आहे इतकंच आपण पाहतो आणि परत आपल्या कामाला लागतो किंवा आपली कामं करतो. आपलं रुटीन सुरू आहे, काडीपेटी तिच्या जागी आहे. तुम्ही तुमच्या जागी आहात.

तुमच्या रोजच्या जीवनात त्या काडीपेटीचं फक्त अस्तित्व आहे. काम कधी कधी पडते, पण अस्तित्व मात्र आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. कधी कधी काही वस्तू साफसूफ करताना आपण काडीपेटीलाही साफ करतो आणि परत जागेवर ठेवतो.

आपल्या ध्यानीमनी नसताना कोणे एके रात्री अचानक लाइट जाते आणि डोळ्यासमोर गुडूप अंधार होतो. आपल्याकडे डोळे आहेत. ते उघडेही आहेत, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपण पटकन डोळे बंद करतो आणि घरात आपण जिथे आहोत तिथून डोळे झाकून काडीपेटीच्या दिशेने पावलं टाकतो. हात पुढे करतो.

आपल्या हातात काडीपेटी येते, कारण ती कुठे आहे हे आपणास माहिती असते. आपण त्यातील एक काडी पेटवतो आणि घरात प्रकाश करतो आणि मेणबत्ती शोधतो आणि ती पेटवून चहूकडे कायमस्वरूपी प्रकाश करतो. आपण आता घटनेचे विश्लेतषण करू या.

1) काडीपेटीची आवश्यकता नव्हती त्या काळात- सुद्धा तिची काळजी घेतली. आवश्यक तेथे सुरक्षित ठेवली तशीच आपल्या अवतीभोवती असणारे आपले मित्र, आपले नातेवाईक, शेजारी यांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा आणि परत रिलेशन अपडेट ठेवा. हीच माणसं संकटसमयी आपल्याला मदत करतात.

2) अंधार पडला तेव्हा तुमच्याकडे डोळे होते, पण तरीही त्यांचा काहीही उपयोग होत नव्हता. तसंच कधी कधी होतं. संकट किंवा समस्या आल्यानंतर तुमच्याकडे असणार्याम क्षमता चालत नाहीत किंवा कमी पडतात. तेव्हा हीच मंडळी मदतीचा हात पुढे करून आधार देतात.

3) अंधार पडल्यानंतर आणि आपल्या क्षमतांचा उपयोग होत नाही म्हटल्यावर आपण डोळे बंद करून काडीपेटी- पर्यंत पोहोचलो. इतका पक्का विश्वास आपणास असतो की, आपण हात पुढे केला आहे आणि भरलेली काडीपेटी तुमच्या हातात येते. आपण काडी पेटवतो आणि मग डोळे उघडतो.

इतका विश्वास त्या काडीपेटीचा आपणाला असतो. तसंच आपण जोडलेली माणसं जर मनापासून जपलेली असतील तर अजिबात धोका होत नाही, कारण आपण ती काळजी रोज घेतलेली असते त्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो.

4) विशिष्ट मानांकन (Standardize)

Standardize म्हणजे काय?

आपल्याला लहानपणी वडीलधारे सांगत, ‘चांगल्या, हुशार मुलांशी मैत्री ठेव’ म्हणजे ‘चांगले-हुशार’ हे झाले standardization. प्रत्येक पिढीत हे काळ, वेळ, स्थळ, सेवाभाव, सांपत्तिक स्थिती अशा अनेक गोष्टींचे संदर्भ घेऊन हे मानांकन केले आणि पाळले जाते.

आजही आपण आपल्या मुलीसाठी वर शोधताना ‘अनुरूप’ असा मुलगा शोधत असतो. ह्या अनुरूपमध्ये सुप्त standardization दडलेले असते.

घरी कोण कोण आहे? माणसे कशी आहेत? खानदानी आहेत? शिकलेली, सुसंस्कृत आहेत? नातेवाईक व मित्रपरिवार कसा आहे? आर्थिक परिस्थिती कशी काय आहे? शेकडो वर्षे झाली तरी हे मानांकन सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. आपणही नवीन मित्र किंवा नातेसंबंध करताना हे नकळत करतच असतो आणि केलेही पाहिजे.

5) शिस्त (Discipline)

इथे शिस्त किंवा discipline हा शब्द commitment – बांधिलकी अशा अर्थाने वापरला आहे. म्हणजे दिलेला शब्द पाळा – परिस्थिती कुठलीही असू द्या, नातेसंबंधाचा आदर राखा. आता पाहू या आपली माणसं कशी जपायची.

अ) रोज चालताना नमस्कार करण्यात कंजुषी करू नका.
ब) लोकांशी नेहमी संवाद ठेवा. ऐकीव माहितीवर जाऊ नका. स्वत: बोलून गैरसमज दूर करून घ्या.
क) लोकांना छोट्या-मोठ्या कामांत मदत करायला मागेपुढे पाहू नका.
ड) लोकांच्या आनंदात सहभागी व्हा – याचा शर्ट माझ्यापेक्षा पांढरा कसा? अशी मानसिकता नको. दु:खात तुमचा खांदा पुढे करा.
इ) आणि दिलेल्या शब्दाला पाळा किंवा जागा.
ई) काही अडचण आल्यास बिनधास्त फोन करा आणि त्यांच्या अडचणीमध्ये त्यांचा फोन घ्यायला मागेपुढे पाहू नका.

Making Relation or Friends is easy but almost care is to be taken to maintain it

तर जपानी तज्ज्ञांनी विकसित केलेली ही प्रणाली आपल्या वैयक्तिक आयुष्यातदेखील लागू होते हे आपल्याला पटले असेल किंवा कळत नकळत आपण ह्या पद्धतीनेच वागतो हे लक्षात आले असेल.

– एस. पी. नागठाणे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?