उद्योगोपयोगी

व्यवसायाची जाहिरात करण्याच्या ७ पद्धती

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

आपल्या व्यवसायाची जाहिरात किती प्रमाणात करावी, त्यात किती भांडवल गुंतवावे, असे अनेक प्रश्न प्रत्येक उद्योजकाला पडत असतात. या वेळी एक तर जाहिरातीवर जास्त खर्च होऊन त्यातून प्रत्यक्ष फायदा काहीच होत नाही किंवा कमी होतो. नाही तर जाहिरातीकडे दुर्लक्ष केले जाऊन आपला उद्योग लोकांपर्यंत हवा तितका पोहोचतच नाही. दोन्हींमध्ये नुकसान आपलेच होते.

उद्योगाच्या जगतात असे म्हटले जाते,


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


“Business without advertising is winking at a girl in the darkness.”

त्यामुळे आपल्या जाहिरातींचे बजेट कसे ठरवायचे आणि जाहिरात तयार करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, हे आज आपण पाहू. जाहिरात किती करावी म्हणजेच आपल्या जाहिरातीचे बजेट किती ठेवावे हे ठरवण्याच्या सात मुख्य पद्धती आहेत. त्यात आपल्या उद्योगाला साजेशी पद्धत आपण निवडावी.

१. परवडणारी पद्धत (affordable Method)

जेव्हा एखादा उद्योग त्याच्या पहिल्या एक-दोन वर्षांत असतो, तेव्हा त्यात पैशांची प्रचंड कमतरता असते. त्यामुळे जर माझा नफाच ४,००० आहे आणि मी त्यातले ३,००० जाहिरातींवर खर्च करायचे ठरवले आणि इतर मुख्य खर्चांसाठी माझ्याकडे पैसेच उरले नाहीत तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे बरेच स्टार्टअप्स सुरुवातीला आपल्याला परवडणारी रक्कम जाहिरातीसाठी बाजूला काढून ठेवतात.

ही पद्धत वापरताना एक लक्षात ठेवले पाहिजे की, सुरुवातीच्या थोड्या काळातच आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. नाही तर बर्‍याचदा उद्योग मोठा होऊ लागल्यावरसुद्धा ही पद्धत वापरली तर उद्योगाची वाढ खुंटते. त्यामुळे कोणत्या वेळी ही पद्धत सोडून नवीन, मोठा विचार करणारी पद्धत स्वीकारावी हे ज्या त्या उद्योजकाने ठरवावे.

२. ध्येयांनुसार ठरणारी पद्धत (Objectives Task Method)

जेव्हा एखाद्या उद्योगाला कमी काळात मोठे ध्येय गाठायचे असते तेव्हा त्या ध्येयानुसार जाहिरातीचे बजेट ठरवले जाते. जसे की, एखाद्या मोबाइल विक्रेत्याला या सहा महिन्यांत ५०० मोबाइल्स विकायचे असतील तर तो त्या तुलनेत जाहिरात करेल ज्याने जास्तीत जास्त मोबाइल घेऊ इच्छिणारे लोक त्याकडे आकर्षित होतील. तेच जर एखाद्याला विक्री थोडी कमी झाली तरी चालेल पण आपलं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असं वाटत असेल तर तो त्याप्रमाणे जाहिरात करेल.

३. स्पर्धात्मक पद्धत (Competitive Parity Method)

जेव्हा एखादा उद्योग सतत स्पर्धा अनुभवत असतो तेव्हा तो आपल्या जाहिरातीचे बजेट हे त्या स्पर्धेनुसार निवडतो. जसे एखाद्याने जर त्याच्या ध्येयांनुसार जाहिरातीचे बजेट ठरवले आणि त्याच्या स्पर्धकांचे बजेट त्याहून कैक प्रमाणात जास्त असेल तर त्याला त्याच्या बजेटचा पुनर्विचार करणे भाग ठरते.

४. मार्केट शेअर पद्धत

मार्केट शेअर म्हणजे आपल्या क्षेत्रातील एकूण उलढालीपैकी आपला वाटा. अगदी सोपा विचार करता जर आपल्या क्षेत्रातील उलढालींपैकी सर्वात मोठा हिस्सा जर आपला असेल आणि आपले स्पर्धक अजून त्या प्रमाणात मोठे नसतील तर आपण त्याप्रमाणे आपले बजेट ठरवू शकतो. याउलट जर आपला हिस्सा एकदम छोटा असेल तर आपण तो कसा वाढवता येईल यानुसार बजेट ठरवू.

५. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (ROI) पद्धत

रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा ROI म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत ठरावीक रक्कम गुंतवल्यावर आपल्याला त्यातून किती रक्कम परत मिळेल आणि त्यावर किती नफा मिळेल. जाहिरातीच्या संदर्भात पहायला गेलो तर आपण एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी दहा हजार रुपये गुंतवले आणि त्यातून आपल्याला एक हजार रुपयांचे रिटर्न (प्रत्यक्ष विक्री, ब्रँडिंग, इ.) मिळाले तर ते निगेटिव्ह ROI म्हणजेच तोटा ठरते. जर आपल्याला आपल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले तर तो पॉझिटिव्ह ROI म्हणजेच नफा ठरतो.

६. विक्रीच्या तुलनेतील पद्धत (Percentage Sales Method)

जाहिरातीचे बजेट ठरवण्याची ही आणखी एक सोपी पद्धत आहे. आपल्याला जितकी विक्री हवी आहे त्याच्या प्रमाणात जाहिरातीची रक्कम ठरवणे. उदा. आपल्याला एक लाख रुपयांची विक्री अपेक्षित आहे. आपल्या उद्योगाच्या ध्येयांनुसार विक्रीवर ३०% जाहिरात करायची असे ठरले आहे, तर आपण त्या एक लाख रुपयांपैकी तीस टक्के म्हणजेच तीस हजार रुपये जाहिरातीसाठी वापरू. यात एक लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे त्या एक लाख रुपयांत आपला नफा वीस हजार रुपयेच आहे आणि आपण तीस हजार रुपयांची जाहिरात केली तर तो सरळ सरळ तोटा ठरेल.

७. प्रति उत्पादन किंमत पद्धत (Cost per unit Method)

काही उद्योजक आपल्या जाहिरातीचे बजेट हे एका उत्पादनाच्या खर्चावरूनसुद्धा ठरवतात. जसे एखादे उत्पादन तयार करायला दहा रुपये खर्च येतो, त्यात आपला नफा जोडल्यावर त्याची किंमत बारा रुपये होते. त्यात जर जाहिरातीचा खर्च तीन रुपये धरला तर त्याची किंमत पंधरा रुपये होते जी आपल्या क्षेत्रातील इतरांच्या किमतीप्रमाणे योग्य आहे. अशीच आपल्याला जर दहा हजार उत्पादने तयार करून विकायची असतील तर त्याचं जाहिरातीचं बजेट ३ x १०,००० म्हणजेच तीस हजार रुपये होईल.

(जाहिरातीचे बजेट= प्रत्येक उत्पादनामागील जाहिरातीचा खर्च x एकूण उत्पादने)

या सर्व पद्धतींपैकी आपल्या उद्योगासाठी योग्य अशी पद्धत प्रत्येक उद्योजकाने निवडावी.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!