प्रत्येकालाच जीवनात यशस्वी व्हायचं असतं. त्यासाठी आपण आपले तास, दिवस, वर्ष कशात घालवतो हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळ फुकट घालवणार्या गोष्टी करणं बंद केलं पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून पुढच्या आठ गोष्टी करू.
सोशल मीडियामध्ये गुंतून पडू नका : सोशल मीडियावर अपडेट राहणं, फेसबुकवर नोटिफिकेशन्स पाहत बसणं, इंस्टाग्रामवर वॉल स्क्रोल करत राहणं, ट्विटरवर सतत अॅक्टिव्ह असणं आणि हे जे काही हल्ली चाललं आहे; यासाठी किती वेळ घालवायचा हे जर तुम्ही ठरवले नसेल तर कधी मिनिटांचे तास आणि तासांचे दिवस होऊन जातील कळणारही नाही.
म्हणून एक तर वेळेची मर्यादा पाळा किंवा तुम्हाला ज्या वेळी सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडायचे असेल त्या वेळेचा गजर लावून ठेवा. सोशल मीडियाला एक देणगी समजा, त्याच्या आहारी जाऊ नका.
कोणताच दिवस नियोजनाविना सुरू करू नका :यशस्वी माणसांचे प्रत्येक दिवसाचे एक उद्दिष्ट ठरलेले असते जे त्यांना त्यांच्या नितळ ध्येयापर्यंत पोहोचवते. दिवसाची To-Do-List लिहून दोन-तीन महत्त्वाच्या कामांवर फोकस करा. महत्त्वाची कामं लिहून त्यांना छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. मग आपोआपच तुमची कामे होत जाऊन तुमची To-Do-List संपेल.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)नकारात्मक भावनांमध्ये अडकून राहू नका : जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य सकारात्मक गोष्टी, भावनांनी भरून टाका. यशस्वी माणसे नकारात्मक विचारांमध्ये अडकून वेळ फुकट घालवत नाहीत. कोणतेही काम हाती घेताना त्याचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होणार आहे ना याचा विचार करा.
जर तसे नसेल तर नाही म्हणायचा विचार करा. तसेच, नाही म्हणताना संकोच करू नका, कारण कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्हाला हो किंवा नाही असाचा प्रश्न विचारलेला असतो. हो म्हणण्याआधी विचार करा आणि नाही म्हणताना परिस्थितीचे भान असू द्या.
हातात नसलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका : यशस्वी लोकांना माहीत असतं की, कुठल्याही गोष्टीची नुसती चिंता करत बसण्याने काहीच गती येत नाही, विशेषत: ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे तुमचे विचार कृतींकडे फिरवा आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा.
नकारात्मक लोकांची संगत सोडा : असे म्हणतात की, ज्या पाच लोकांसोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता, त्यांच्या स्वभावांची सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो. त्यामुळे तुम्हाला सर्वोकृष्ट व्हायचे असेल तर कायम सर्वोत्तम माणसांमध्ये वावरा, नकारात्मक विचार, माणसे, तसेच नकारात्मक कामांपासून तुम्ही दूर आहात ना याची सतत खात्री करा. तुम्हाला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय खेचणार्या गोष्टींपासून सावध राहा.
भूतकाळातील चुकांसाठी रडत बसू नका : यशस्वी व्यक्तीसुद्धा अनेक चुका करतात. प्रत्येक जणच चुका करत असतो. यशस्वी होणे म्हणजे चुकांची पुनरावृत्ती न करणे, चुकांमधून घडत जाणे आणि प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणं. म्हणून, जेव्हा तुम्ही चुकाल, तेव्हा त्या विचारांतून बाहेर पडा, कारण भूतकाळात तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि आताही रडत बसू शकत नाही. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. तुमच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करा.
इतर लोकं काय करतात याचा विचार करून ध्येयापासून विचलित होऊ नका : इतरांच्या अनुभवावरून शिकणे उत्तमच आहे; परंतु जेव्हा तुम्ही पदोपदी एखाद्याशी तुमची तुलना करू लागता, तेव्हा आपोआप तुमच्या यशाला उतरती कळा लागते. ही तुमचे विचार बदलण्याची वेळ. इतरांकडून प्रेरित व्हा; परंतु तुलना फक्त सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीशी करा, तुम्ही स्वत:.
स्वत:ला प्राधान्य द्या : आपण सर्व जण अशा प्रसंगांतून गेलो आहोत जेव्हा कामाच्या व्यापामुळे आपल्याला पुरेशी झोप आणि व्यायाम मिळत नाही; परंतु दीर्घकालीन यशासाठी तुम्ही स्वत:ला प्राधान्यक्रमात सर्वोच्च स्थान द्यायला हवे. काही सोप्या मार्गांनी हे सहज शक्य आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या आवडीची गोष्ट करून करा.
कदाचित व्यायाम, ध्यान, वाचन वगैरेमधील काहीही. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींनी दिवसाची सुरुवात करता तेव्हा संपूर्ण दिवस तुम्ही आनंदी, उत्साहित आणि सुदृढ राहता.या यादीत तुमचा वेळ घालविणार्या गोष्टी आहेत का? जर असतील तर त्यांना तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा आणि तुमच्या आयुष्याचा तुम्ही स्वत: ताबा घ्या.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.