कायम आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहेत या ८ गोष्टी

१. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट शोधा : आपल्या सर्वांसाठी एक उद्दिष्ट ठरलेले आहे. आपण काहीही काम करीत असलो तरी प्रत्येकाने एका महत्त्वाच्या उद्दिष्टासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे व सामान्यत: आपल्याला ते ठाऊक नसते.

२. मनाचा आवाज ऐका : तुमच्या आणि तुमच्या ध्येयपूर्तीच्या मध्ये फक्त एकच अडथळा आहे आणि तो म्हणजे तुमची भीती. ‘तुम्ही जर फक्त भीतीपोटी तुमच्या ध्येयांपासून लांब राहत असाल तर तुम्ही स्वत:च्याच मनाचा आवाज दाबत आहात

३. अपयश हा शेवट नसतो : चूक होणे हा आयुष्याचाच एक भाग आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा रस्ता सापडतो त्या वेळी चुका होतील, या भीतीने मागे वळू नका. अपेक्षाभंग, पराजय, अयशस्वी होणे या सर्व देवाकरवी आपल्याला पुढील मार्ग सुचवण्यासाठीच्या योजना आहेत.

४. तुम्ही विशेष आहात : प्रेम तुमच्या आत आहे, त्याला बाहेर शोधू नका. प्रेम हे कुठेही शोधून मिळणारी गोष्ट नाही, ती तुमच्यातच आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःकडे एका नवीन दृष्टिकोनातून बघायला हवे.

५. चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वत:पासून होते : ‘तुम्ही बदला जग बदलेल.’ जेव्हा तुम्ही प्रेम द्यायला सुरुवात करता त्या वेळी तुम्ही स्वत:ला बदलण्याच्या मार्गावर पहिले पाऊल टाकता आणि जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी बदलतात त्या वेळी तुमच्या सभोवतालचे जगही बदलू लागते.

६. लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण : कोणी कसे जगावे, काय करावे, काय करू नये यापेक्षा आपण काय करत आहोत आणि आपण कसे जगले पाहिजे याकडे लक्ष द्या आणि आवश्यक ते बदल आचरणात आणा. आपण आपल्या जबाबदार्‍यांकडे डोळे उघडे करून पाहिले की मग इतर काय करतात याकडे लक्ष द्यायला वेळच उरत नाही.

७. इतरांकडून अपेक्षा ठेवणे हेच अपेक्षाभंगाचे मूळ कारण : तुमच्या भावनांसाठी इतर लोक कारणीभूत नसतात. प्रेमामध्ये किंवा इतर कुठल्याही नात्यामध्ये (ज्यात प्रेम हाच मूळ मुद्दा असतो) कुणीच कुणाला दुखवू शकत नाही. आपण स्वतःच आपल्या भावनांचे प्रवर्तक असतो आणि त्यासाठी आपण इतर कुणाला दोष देऊ शकत नाही.

८. स्वत:ला ओळखा : आयुष्य आपले आहे, उद्दिष्ट आपले आहे, जबाबदारी आपली आहे, प्रेम आपले आहे, यश आपले आहे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे स्वतःला ओळखणे आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचा एक मंत्र आहे, स्वत:ला फसवू नका.

– प्रदीप मोकळ
9595593335
(लेखक हे व्यवसाय मार्गदर्शक आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?