युवकांनी करायला हव्यात या ८ गोष्टी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आज भारत हा युवकांचा देश म्हणू ओळखला जातोय. ही युवाशक्ती भारताला महासत्तेच्या दिशेने पुढे नेण्यात मोठी भूमिका पार पाडते. युवकांसमोर प्रलोभनेही खूप असतात. त्यामुळे युवकांची शक्ती ही योग्य दिशेने वापरण्यासाठी खालील गोष्टींवर नजर टाकूयात.

१. आयुष्यात ध्येय ठरवा : आपल्या आयुष्याचे ध्येय काय हे अनेक युवकांना माहीत नसते. युवक जेव्हा ध्येयहीन आहे असे जाणवते तेव्हा मनाला खूप वाईट वाटते. अनेकजण चांगली नोकरी, चांगला पगार एव्हढ्यापुरतेच ध्येय आयुष्यात बाळगतात. ध्येय हे आहे यात काहीच गैर नाही. पण अनेकांना हे आपले ध्येय आहे हेही माहीत नसते; हे मात्र योग्य नवे. कितीही छोटे का असेना पण आयुष्यात ध्येय हवे. प्रत्येक युवकाचा याविषयी आग्रह असायला हवा. एकतरी ध्येय जरूर बाळगा.

२. वेळेचे महत्त्व ओळखा : वेळ अनमोल आहे हेच खरे. आपण सगळेच जाणतो की; गेलेली वेळ परत येत नाही. तरीही आजचा युवक आपला बराचसा वेळ सोशल मीडियासारख्या माध्यमावर घालवतो. काही लोकांचा वेळ यातूनही सत्कारणी लागतो, पण जास्तीत जास्त युवकांचा वेळ वाया जातो.

युवकांनी वेळेचे महत्त्व जाणावे. वेळेचे नियोजन करावे. नवीन गोष्टी शिकण्यात, चांगली कामे करण्यात स्वतःचा वेळ खर्ची करावा. म्हणजेच वेळेचा सदुपयोग करावा.

३. आळस सोडा आणि कठोर परिश्रम करा : आळस हा माणसाचा शत्रू आहे. मनुष्याचे शरीर, मन, पैसा नष्ट करायला हा आळसच जबाबदार असतो. आळशी लोक नेहमी नकारात्मक विचार करत असतो. सतत आपली काम पुढे ढकलतो. ऐक ना अनेक कारणे पुढे करत आपली काम न करता सतत परिश्रमापासून स्वतःला बाजूला ठेवले जाते. म्हणूनच युवकांनी आळस सोडून कठोर परिश्रमावर भर द्यायला हवा.

४. नवीन बदल स्वीकारा; सतत शिकत राहा : आयुष्यात सतत नवनवीन बदल घडत असतात. त्यामुळे ते स्वीकारा. सतत जे मिळेल ते शिकत राहा. सतत स्वतःला update ठेवत राहा.

५. जोखीम स्वीकारा : एक वेबसिरीजमध्ये एक डायलॉग मधल्या काळात खूप गाजला तो म्हणजे “रिस्क है तो इश्क है।” जोखीम पत्करणे ही प्रत्येक युवकाला जमायला हवी. जो जोखीम उचलतो तो भविष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटांना सामोरा जायला तयार होतो. त्यामुळे जोखीम स्वीकारायला शिकायला हवे.

६. आव्हान स्वीकारा : जीवनात खूप आव्हानं येतात. खरंतर जीवन जगणे हेच एक आव्हान आहे. हे वेळीच समजायला हवे. आव्हान ही गरीब-श्रीमंत, लहानथोर, असे सगळ्यांसमोर येतात. आव्हान स्वीकारून संघर्ष केला तर येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगात आपण मार्ग काढू शकतो. म्हणूनच आव्हाने स्वीकारा.

७. पैशाचे मोल समजा : जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे पैसा, आयुष्य सुलभ आणि सुखकारक करायचे असेल तरी आवश्यक आहे पैसा… रोजच्या जगण्यात पैशाचे मोल ओळखायला हवे.

आहे म्हणू पैसा कसाही खर्च करून चालत नाही आणि पैसे नाही म्हणून हातावर हात ठेऊन बसूनही चालत नाही. आजच्या तरुणांनी पैशाचे मोल समजायला हवे. ते आज समजलं तर आयुष्यात अनेक गोष्टी सोप्या होतील.

८. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा : आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्या व्यक्तिमत्वाच्या घडणीला हातभार लागत असतो. त्यामुळे नेहमी चांगल्या संगतीत राहा. यातून आपण घडत असतो.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?