१. जर आपण त्रास, दुःख, आजार आणि संकट यांचा विचार करत असाल, तर थांबा. आताच विचारांची दिशा बदला आणि तुम्हाला काय हवंय, याचा विचार करायला सुरुवात करा.
२. तुमच्या आयुष्यात योगायोगाने घडलेल्या एखाद्या गोष्टीचा मागोवा घ्या. नशीबवान लोकांचा कल अशा योगायोगाने घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा पाठलाग करणं आणि त्यावर कृती करण्यावर असतो.
३. चांगल्या गोष्टी घडतात, यावर भरोसा ठेवा, तशी अशा बाळगा, अपेक्षा ठेवा. अपेक्षांमधूनच गोष्टी प्रत्यक्षात येतात.
४. वाईट गोष्टी घडल्या की त्याची चांगली बाजू पहायला शिका. त्यातून योग्य तो धडा घ्यायचा आणि पुढे जायचे. त्यामध्ये अडकून राहू नये.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
५. निरर्थक गोष्टींचं भिजत घोंगड बाजूला सारणंच योग्य असतं. त्यामध्ये पैसे आणि प्रयत्न गुंतवणं बंद करा.
६. चुकीच्या ठिकाणी प्रेमाची अपेक्षा करू नका. कोणत्याच प्रकारच्या प्रेमाची अपेक्षा ठेवू नका. “मी असं झालं कि आनंदी होईन” किंवा “हे मिळालं तर मी सुखी होईन” या विधानांमधला भ्रम समजून घ्या. कारण आनंदी राहणं ही मनाची एक अवस्था आहे, ज्यामध्ये आपले विचार सर्वात जास्त आनंददायी असतात.
७. बेशिस्त लोकांकडे अपयश स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आपले ध्येय सोडून इतर गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपण आपली ध्येयं, मग ती काहीही असतील, ती पूर्ण करण्यात अपयशी ठरतो. त्यामुळेच जर का आपण यश निवडले नाही किंवा ते मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीत जराजरी ढिलेपणा दाखवला तर असं करणं हे अपयशाचे स्वप्न पाहिल्यासारखेच आहे.
८. एकूणच आनंद काय किंवा दुःख काय हे आपण आपल्याच मनावर बिंबवलेल्या विचारांमधून आपणच निर्माण करतो. त्यामुळे तुम्ही जे वाचता, ऐकता आणि ज्यांच्या सहवासात असता असे लोक काळजीपूर्वक निवडा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.