स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
बर्याच उद्योजकांशी चर्चा करताना असे लक्षात आले की, अकाऊंटस हा एक दुर्लक्षित भाग आहे. मी बर्याच ठिकाणी जेव्हा लोनसंबंधी सल्लामसलत करण्यासाठी जातो तेव्हा दुर्दैवाने असे समोर येते की, उद्योजक स्वत: अकाऊंट्समध्ये फार कमी लक्ष घालतात किंबहुना त्यांना ह्या क्षेत्राबद्दल फारच अनास्था असते.
जेव्हा आपण बिझनसेचा विचार करतो तेव्हा असा प्रश्न समोर मांडतो की बिझनेस म्हणजे नक्की काय? तर प्रामुख्याने Marketing, Product, Promotion, Factory or Machines, Customers आदि गोष्टींकडे निर्देश केला जातो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
मला हे मान्य आहे की, ह्या बाबी फारच महत्त्वाच्या किंवा सेन्सेटिव्ह आहेत. या गोष्टींना आपण Live Wise Functions असेही म्हणू शकतो कारण ह्याबाबत जर काही चढाव उतार झाले तर ते आपल्या धंद्यावर त्वरीत परिणाम करतात. येथे मला हे नमुद करावयाचे आहे की कदाचित केव्हा निश्चितपणे अशी स्थिती येण्यास कारणीभूत ठरते ती म्हणजे अकाऊंटस्बद्दलची अनास्था.
साधारणत: उद्योजक नाइलाजाने अकाऊंटकडे वळतात. ते जून/जुलै उलटून गेल्यावर आणि तेसुद्धा मार्च ३१ ला संपलेल्या वर्षाकरता सध्याच्या ह्या घोर स्पर्धात्मक युगात जुन्या काही काळ उलटून गेलेल्या गोष्टीकडे आपण जेव्हा लक्ष घालतो तेव्हा ती केवळ औपचारिकता उरते कारण की आपण केवळ Historical data कडे पाहत असतो जेथे बाण आधीच सुटून गेलेला असतो आणि त्यात सुधारणा करणे केवळ अशक्यप्राय होऊन बसलेले असते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेच उद्योजक अकाऊंटस्चे काम हाताळण्यासाठी स्कील्ड सोडा पण अनस्कील्ड स्टाफपण ठेवत नाहीत आणि हे काम चक्क एखाद्या फर्मला आऊट्सोर्स केले जाते त्यात काही गैर नाही पण जर त्या फर्मला वेळोवेळी आणि योग्य प्रकारे Input Data दिला गेला नाहीत दुरावस्था अटळ असते.
अकाऊंटस ही बाब फक्त ट्रान्झेक्शनच्या अनुशंगाने करावी लागणारे पण न टाळता येणारे काम असा दृष्टिकोन ठेवणे हे आपल्या व्यवसायाच्या संदर्भात घातक ठरू शकते. जेव्हा आपण आपले अकाऊंट्स चोख ठेवतो त्याचे कैक फायदे सांगता येतील. जर का आपण अकाऊंट्स वेळोवेळी अद्ययावत केले तर आपणास लगेच माहिती होते की आपण कुठे चुकतोय, कितपत चुकतोय आणि ही जाणीवच आपणास योग्य अॅक्शन घेण्यास भाग पाडते.
जर का आपले अकाऊंट अपडेटेड नसतील तर झालेल्या चुका समोर येणे राहिलेच तर त्यावर नियंत्रण आणणे अशक्यप्राय होऊन बसते. एकदा का तुम्ही पैसा गमावलात तर परत भरपाई होणे नाही हे मी सांगावयासच नको. तेव्हा सतत अकाऊंट अद्ययावत करा आणि त्या त्या कालखंडाचे निष्कर्ष मागील संबंधीति कालखंडाशी पडताळून पहा. उत्तरे आपोआप समोर तर येऊ लागतीलच आणि त्यावर त्वरीत उपाययोजनादेखील करता येतील.
बरेच वेळा काही पेमेंट करताना त्रुटी रहातात. चुका होतात. दोनदा पेमेंटस् होतात वगैरे वगैरे अशा वेळेला बरचेवर जर पडताळणी होत असेल तर ते निदर्शनास येते. उलटपक्षी आपल्याला येणारे पैश्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत नाही. इतरही अनेक बाबतीत Reconciliations झाल्याने चुका टळतात व कोठेही आर्थिक तोटा होत नाही किंवा कोणी विलंब आकार delayed interest लावत असतील तर त्यांसदेखील आळा बसतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकळत आपल्या व्यवसायात एक शिस्त येते आणि याचे अनेक अप्रत्यक्ष फायदे आहेत त्यात सर्वात मुख्य म्हणजे आपल्या बिझनेसची प्रतिमा संबंधितांमध्ये उंचावते.
– प्रशांत नायगावकर
९९२०७७३६८१
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.