Advertisement
उद्योगसंधी

Affiliate Marketing (भाग २)

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रकार : पूर्ण ऑनलाईन
कॉम्प्युटरचे ज्ञान : मध्यम
गुंतवणूक : नाही
शिकून कमविण्यासाठी वेळ : १-६ आठवडे

Affiliate Marketing (भाग १)

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

मागील भागात आपण Affiliate मार्केटिंगची ओळख करून घेतली. आता त्याची थोडी अधिक माहिती आणि अनेक संधींविषयी घेऊ.

लक्षात ठेवा, ट्रॅफिक (म्हणजे तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगला मिळणारे वाचक) हाच इंटरनेट व्यवसायाचा देव आहे आणि, तुम्ही बनवत असलेले कंटेंट (मजकूर, चित्रे, व्हिडिओ) हा राजा आहे. तुम्हाला जेव्हा भरपूर visitors हवे असतात, तेव्हा तुम्ही एवढा प्रसार, प्रचार करता की गुगलला तुमचा शोध लागतो.

आताच्या विषयात, तुम्हाला तुमची affiliate लिंक गुगलवर लोकप्रिय करायची आहे. ब्लॉग लिहिणे, हे अशाच कामासाठी सुरुवातीपासून सुचवले आहे. तुमच्या आशय, विषयाशी संबंधित महत्वाचे शब्द (keywords) वारंवार असलेला मजकूर तुम्ही बनवावा. म्हणजे ते शब्द शोधणारा वाचक तुमच्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकतो.

तो तुमच्या ब्लॉगवर आल्यावर, तुमचा मजकूर, लेख, गोष्ट, कविता वाचून, तो त्यासंबंधी तुम्ही तिथे ठेवलेली affiliate लिंक ही बघतो आणि तिलाही भेट देऊ शकतो. हे अगदी टीव्ही मालिकाप्रमाणे आहे. चांगल्या मालिकेसाठी जास्त प्रेक्षक असतात आणि तिथेच ब्रेकचा माध्यमातून जाहिरातीही दाखवल्या जातात.

तुम्ही विकत असलेले प्रॉडक्ट, सेवा ह्यासंबंधी लिखाण करताना त्या विषयीचे key words ठरवा आणि त्याचा वापर तुमच्या मजकुरात ७-८ वेळा करा. त्यामुळे गुगल शोधामध्ये तुमचा ब्लॉग येऊ शकेल, अर्थात अजून अनेक मार्गांनी तुमचा ब्लॉग प्रसारित करणेही, गरजेचे आहे.

सध्या, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी Clickbank, Amazon, Flipkart ह्यापैकी १-२ निवडा. त्यात नोंदणी करून, त्यातील प्रॉडक्ट, सेवांचे प्रकार आणि त्या खाली येणारी प्रॉडक्ट पाहा. शेकडो प्रॉडक्टचे प्रकार आणि पर्याय आहेत. क्लिकबँक हे डिजिटल प्रॉडक्ट्स विकते, त्याचे कमीशन ८०% पर्यंतसुद्धा असते.

अमेझॉन, फ्लिपकार्ट हे घरगुती वापरातील वस्तू पासून, electronic वस्तु , वस्त्र प्रावरणे, कपडे, पुस्तके इत्यादी हजारो वस्तू विकतात. ते १-१५ टक्के कमिशन देतात.

✅ विषयानुसार अनेक प्रकारचे भरपूर affiliate marketing पर्याय खालीलप्रमाणे आहेत :

Mixed product affiliate networks:

 • Clixgalore.co.in
 • Vcommission.com
 • Maxbounty.com

Domain, Hosting related:

 • Godaddy.com
 • Hostgator.com
 • WordPress.com
 • Bigrock.com

Travel, Hotel, Trips related:

 • Tripadvisor.com
 • Travelguru.com
 • Redbus.com
 • Yatra.com

Job/placement related:

 • Monster.com
 • Naukri.com
 • Fiverr.com

Matrimonial:

 • Shadi.com
 • Jeevansathi.com

Banking and finance:

 • ICICI bank referral
 • HDFC Bank affiliate
 • Religare trading affiliate
 • Iforex trading

Health related:

 • Medlife.com
 • Healthkart.com

Educational/Courses:

 • Udemy.com
 • Coursera.com

आणखीही भरपूर आहेत. पण, सध्या १-२ पर्याय निवडा, त्यावर मजकूर बनवणे आणि प्रचाराची पद्धत, तंत्रे पूर्ण समजून ती वापरणे शिका आणि त्यात यश मिळाल्यावर फक्त ती पद्धत इतर अनेक प्रॉडक्टसाठी कॉपी करा.

✅ इंटरनेट व्यवसायाची सुंदरता आणि खुबी पाहा. तुमच्या मजकूर आणि affiliate लिंकपर्यंत इंटरनेट वापरकर्ता जगभरातून पोहोचू शकतो, त्याला आवडल्यास तो तुमचे प्रॉडक्ट खरेदी करतो, पैसे देतो, कंपनी त्याला प्रॉडक्ट पोहोचवते, तुमच्या दखल न घेता, तुमच्या अपरोक्ष, तेही २४ x ७ x ३६५. म्हणून आम्ही म्हणतो, तुमच्या इंटरनेट व्यवसायातून तुम्ही पैसे कमावू शकता, तुम्ही झोपलेले असतानासुद्धा.

✅ तुमच्या प्रतिक्रिया, सूचना, प्रश्न, शंका व्हॉटसअपवर पाठवा.

– सतीश रानडे

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!