विनायक महालिंग शेटे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे गावचे रहिवाशी. विनायक यांचे शिक्षण बी.एस्सी आहे. वीरभद्र कोळे या नावाने शेतीसाठी लागणारी बियाणे, औषधे आणि खते पुरवणे हा त्यांचा मागील ३५ वर्षे व्यवसाय आहे. वडिलांच्या पश्चात आता हा व्यवसाय विनायक चालवतात.
कोळा म्हणून ओळखल्या जाणार्या या पट्ट्यात ५ ते १० हजार एकर क्षेत्रात शेती केली जाते. मुख्यतः ५० टक्के शेती ही डाळिंब, द्राक्ष शेती आहे. विनायक हे स्वत: शेतकरी आहेत ते स्वत: डाळिंब आणि द्राक्षाचे पीक घेतात. सोबत भाजीपालाही असतो.
विनायक सांगतात, “डाळिंब शेती ही आधुनिक पद्धतीने आम्ही करतो. डाळिंब शेतीला सोलापूर जिल्ह्यातील वातावरण पोषक आहे आणि आमच्या डाळिंबाला मागणी आणि भावही चांगला मिळतो. बाजारात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही शेती करतो. स्वतः पुरता मर्यादित विचार न करता आपल्या परिसरातील इतर शेतकर्यांनाही कमी खर्चात जास्त चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल. कोणती बियाणे, औषधे, खत वापरावीत यासाठी मार्गदर्शन करतो.”
पारंपरिक खते, बियाणे, शेतीविषयक अवजारे पुरवणे या व्यवसायासोबत शेतकर्यांना आधुनिक शेतीसाठी शेतकरी तयार करण्याचे काम त्यांच्या वडिलांनी सुरू केले. त्यांच्या पश्चात २०११ पासून विनायक शेतीचे काम बघतात.
विनायक सांगतात, त्यासाठी आम्ही शेतकर्यांसाठी मीटिंग घेतो. याद्वारे त्यांना नवनवीन तंत्रज्ञान, खते आणि आधुनिक शेतीविषयक येणारी माहिती देतो. याशिवाय शासनाच्या शेतकर्यांसाठी येणार्या योजना, शेतकर्यांना आवश्यक असणारी कर्जविषयक माहिती, शासनाकडून मिळणार्या सवलती आणि मदत यावर मार्गदर्शन करतो. शेतकर्याचा कमीत कमी खर्च कसा होईल यावर लक्ष देतो.
ज्या शेतकर्यांना ही पिके घ्यायची इच्छा आहे अशा शेतकर्यांना कोणते बियाणे वापरावे यापासून आम्ही मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष बाग फुलवताना बियाणे, खते, नवनवे तंत्रज्ञान यातून चांगला निर्यातक्षम माल तयार करायला मदत करतो.
शिवाय शेवटी पॅकेजिंगपासून माल विक्रीसाठी खरेदीदार मिळवून देण्यापर्यंत सेवा आम्ही देतो. यासाठी शेतकर्याला प्रत्येकी एक एकर शेतीला पंचेचाळीस हजार ते पंचावन्न हजारापर्यंत खर्च येतो. यात फवारणीपासून, विक्रीपर्यंत सर्व सेवा देतो.
एक एकर डाळिंब शेतीतून कमीत कमी तीन लाख ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न मिळते. पुन्हा हे सगळे त्या वेळी मार्केट रेट काय मिळतो त्यावरही निर्भर करते, परंतु अंदाजे तीन लाख ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न मिळते. आम्ही ऑरगॅनिक शेती करण्यावर जास्त भर देतो. रासायनिक खतांचा वापर न करता शेण खत, पालापाचोळा आणि खराब झालेले पीक यातून खते तयार करून शेतीत वापरतो.
जास्तीत जास्त तरुणांनी शेतीकडे वळावे असे आम्हाला वाटत असल्याने त्यासंदर्भात आम्ही सतत कार्य करत आहोत. डाळिंब हे असे पीक आहे जे बारमाही केव्हाही घेऊ शकतो. प्रत्यक्ष सहा महिन्याचा कालावधी लागतो तो पीक तयार व्हायला.
त्यानंतर चार महिन्याचा कालावधी पुन्हा जमीन तयार करण्यासाठी द्यावा लागतो हे सारे आम्ही आमच्या शेतकर्यांकडून करून घेतो. आतापर्यंत आम्ही दहा हजार शेतकर्यांपर्यंत पोहचलो आहोत. भविष्यात नवनवे शेतीसाठी आवश्यक सामग्री आणि तंत्रज्ञान लोकांना देऊन आधुनिक शेती यावर काम करायचे आहे.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीशेती करताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, पण आम्ही लोकांना यांत्रिक शेती करण्यासाठी तयार करतोय. विनायक सांगतात, आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेण्यासाठी जे जे शक्य आहे ते करत राहण्याचे आणि इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे भविष्यातील लक्ष्य आहे.
संपर्क : 9527702099 / 9545127171
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

