सर्वसामान्यपणे व्यवसाय अथवा नोकरी करणार्या वयोमानाच्या व्यक्तीला भविष्यात तुला काय करायचे आहे? तुझे ध्येय काय? असा प्रश्न विचारला, तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. कुणाला मोठा अधिकारी व्हायचे असते, तर कुणाला संशोधक.
काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी काहीच मंडळी शेती हा व्यवसाय स्वेच्छेने निवडताना आपल्याला दिसतील. शेती हा आवडीचा आणि ठरवून निवडलेला पर्याय नसतो. अशा वेळी महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे प्रत्येक जण शेती या विषयाकडे दुर्लक्ष करू लागला, तर अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय.
शेतीला कमी लेखण्याची वृत्ती केवळ भारतात नाही. जागतिक सर्व्हेक्षणानुसार जगभरात थोड्याफार फरकाने हीच वृत्ती दिसते. युरोपातील केवळ ६ टक्के शेतकरी हे ३५ वर्षांपेक्षा कमी वयोमानाचे आहेत. अमेरिकन शेतकर्याचे सरासरी आयुर्मान ५६ वर्षे तर ऑस्ट्रेलियातील ५२ टक्के शेतकरी हे ५५ वर्षे वयोमानाचे आहेत.
तरुणांनी शेतीकडे वळावे असे वाटत असेल, तर यातून त्याची बौद्धिक भूक भागली पाहिजे व आर्थिक समाधान मिळायला हवे. भारत हा जागतिक पातळीवरील सर्वात तरुण वयोमान असलेला देश आहे. भारतातील ७० टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. २०२० मध्ये सरासरी भारतीयांचे वय हे २९ वर्षे असेल. याउलट अमेरिका आणि चीनचे ३७ वर्षे. त्यामुळे भारताला शेतीला वरच्या स्तरावर नेण्याची संधी उपलब्ध आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)खरे तर केवळ अन्नसुरक्षा आणि शेतीतील क्रांतिकारक बदल एवढ्यापुरतंच याचं महत्त्व नाही, तर ग्रामीण भारतातून शहराकडे जाणारा लोंढा कमी करण्यासाठीसुद्धा याचा लाभ आपल्याला होईल. प्रचंड क्षमता असणारे, विविध कल्पना लढवून जास्तीत जास्त धोका पत्करायला तयार असणारा तरुण शेतकरी लाभला, की आपोआप शेतीला वलय प्राप्त होऊ लागेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
शेती म्हणजे पेरणी, कापणी, मळणी एवढंच सर्वसामान्यपणे माहीत असतं; परंतु शेती म्हणजे केवळ एवढंच नव्हे, तर अजूनही बरंच काही असतं. उदा. नवनव्या संकल्पना, शेतीची मशागत, अवजारे आणि यंत्र, अचूक शेतीकाम, असे अनेक प्रकार निगडित असतात. सद्यःस्थितीत शेती पद्धतीमध्ये काही बदल करण्याची गरज आहे.
आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो; पण तरीही आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेकडून हे क्षेत्र दुर्लक्षित आहे. शेतीतील उपलब्ध संधी याविषयी पुरेशी माहिती आणि अभ्यास नसल्याने ग्रामीण युवकाला शेतीतील उपलब्ध संधीची हवी तशी माहिती नाही.
खरे तर ग्रामीण युवक वर्षानुवर्षे आपल्या आईवडिलांना शेतात राबताना पाहतच मोठा झालेला असतो. काही मोजक्याच शेतकर्यांकडे सुबत्ता असते. किमान सोयीसुविधा त्याने अनुभवलेल्या असतात. शेतीतून केवळ रोजच्या गरजाच भागलेल्या असतात.
आधुनिक शेती ही यावरील उपाय आहे; परंतु आपल्याकडील शिक्षण व्यवस्था याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात कमी पडतात.
तंत्रज्ञानाचा वापर
तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी नवनवीन अॅप्लिकेशन्स तयार करावयास हवेत. मोबाइल हा तरुणांचा जवळचा मित्र आहे. मोबाइल अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून सतत नवनवीन गोष्टींसाठी आपण अद्ययावत राहू शकतो. हवामानाचा अंदाज, बी-बियाणे आणि त्यांच्या किमती, शेतीविषय तज्ज्ञांचा सल्ला असे विविध विषयांबाबत शेतकरी अद्ययावत होऊ शकतो.
अशा अॅप्लिकेशन्सचा फायदा म्हणजे शेतकर्याचे शेतीविषयक मत, दृष्टिकोन बदलण्यासही होतो. तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्याचा शेतीसाठीचा वापर यामुळे शेतीतील उत्पादन आणि धान्यवाढीसाठी कमी शेतजमीन असणार्या शेतकर्यांनाही याचा फायदा मिळतो. सुशिक्षित शेतकरी हा ‘मागणी तसा पुरवठा’, अन्न आणि हवामानाचे धोके आणि त्याचे व्यवस्थापन यावर योग्य पद्धतींनी काम करू शकतो.
आजच्या युवकासाठी शेती ही एक संधी आहे, भूकमारी कमी करण्यास जगाला मदत करण्यात आपले योगदान देण्याची. शेतीसाठी योग्य धोरणं तयार होण्याची गरज आहे. तांत्रिक ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन याच्या आधारे शेतीतील असलेल्या आव्हानांना सामोरे जाता येईल. गरज आहे त्या प्रकारच्या धोरणांची.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.