विजय शेखर शर्मा यांच्या Paytm या ई-कॉमर्स कंपनीतून प्रमुख गुंतवणूकदार असलेले चीनच्या अलिबाबा आणि Ant Financial यांनी आपली भागीदारी विकली आहे. पेटीएम मॉलने एका निवेदनात पुष्टी केली की अलिबाबा आणि अँट फायनान्शियल दोघेही फर्ममधून बाहेर पडत आहेत.
अलिबाबा समूहाने ‘पेटीएम मॉल’मधील २८.३४ टक्के तर तिची उपकंपनी असलेल्या अँट फायनान्शियल्स कंपनीने १४.९८ टक्के हिस्सा विकला आहे. अशा तऱ्हेने दोन्ही कंपन्यांनी ४३.३२ टक्के हिस्सा ४२ कोटी रुपयांना विकला आहे. हा हिस्सा, अर्थात समभाग ‘पेटीएम मॉल’ने खरेदी केला आहे.
पेटीएम मॉलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही भारतातील ऑनलाइन वाणिज्य चालवण्यासाठी भारत सरकारच्या क्रांतिकारी ONDC कार्यक्रमावर काम करत आहोत. निर्यात बाजारपेठेतील संधी शोधण्याचीही आमची योजना आहे. आमच्या गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि शाश्वत विकासासाठी आम्ही उत्सुक आहोत.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.