मी अमर पडवळ. पुण्यातील ग्रामीण भागात माझा जन्म झाला. लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीने आकर्षित केल्याने छोट्याशा खेड्यात मन रमेना. अखेर २००९ साली नातेवाईकांच्या मदतीने मुंबईत स्थलांतर केले आणि तिथून चित्रपटजगताचा खरा प्रवास सूर झाला.
घरातून फारसा आर्थिक पाठबळ नसल्याने “वॉटर मार्क” या कंपनीमध्ये ३डी जर्नलिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे नोकरीत जम बसवून नोकरीसोबतच ठाणे येथे एका ऍक्टिंग ग्रुपसोबत कलाकारी आणि “MAAC” या नामांकित इन्स्टिट्यूटमधून चित्रपटनिर्मितीचे तंत्र शिकण्यास सुरुवात केली. सहा वर्षे कामाचा अनुभव आणि चार वर्षे फिल्ममेकिंगच्या अभ्यासाच्या जोरावर स्वतंत्र व्यवसाय करण्याचा विचार करून २०१६ मध्ये नोकरी सोडली.
त्यानंतर २०१६ मध्ये “सिंड्रेला” आणि “तुंबाड” या बहुचर्चित सिनेमांमध्ये कलाकार (Actor) म्हणून काम केले. त्यानंतर २०१७ मध्ये “बोधी” या मराठी चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणूंन दोन महिने तर २०१८ मध्ये “Screwdriver” या हिंदी चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक आणि निर्मिती पश्चात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तब्बल एक वर्षे काम बघितले. तसेच “Sip Digital” या Production House सोबत शॉर्ट फिल्म्स, विविध ब्रँडसाठी जाहिरातनिर्मितीत मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
काही केल्या स्वतःचा व्यवसाय करण्याची मनिषा शांत बसू देत नव्हती म्हणून जानेवारी २०१८ मध्ये “७० MM Films Production” या नावाने स्वत:ची चित्रपटनिर्मिती संस्था स्थापन करून जाहिरात, लघुचित्रपट, चित्रपट अशा विविध क्षेत्रात व्हिडिओ निर्मितीचे काम सुरू केले. “७० MM Films Production” या चित्रपटनिर्मिती संस्थेद्वारे आतापर्यंत शॉर्ट फिल्म, जाहिराती, डॉक्युमेंटरी फिल्म्स आणि चित्रपटनिर्मितीचे काम केले आहे.
“७० MM Films Production” या संस्थेत माझ्यासोबत अजून दहा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी तज्ञ् मंडळी काम पाहतात. माझं स्वतःच ठाणे येथे रजिस्टर कार्यलय आहे. आज मी या संस्थेद्वारे advertisement, Business profile, corporate films, Short Films, Feature Films, Documentary films, तसेच विविध प्रकारचे व्हिडिओ निर्मितीचे काम करत आहे.
अमर पडवळ
ई-मेल : 70mmfilmsproductin@gmail.com
भ्रमणध्वनी : 9594080418
जन्म दिनांक : 1991-12-04
जन्म ठिकाण : Pune (Rural)
विद्यमान जिल्हा : ठाणे
शिक्षण : Diploma In VFX
फेसबुक अकाऊंटची लिंक : http://www.facebook.com/70MMFi
कंपनीचे नाव : 70 MM Films Production
तुमची उत्पादने / सेवा : Video Production
स्मार्ट उद्योजक सूची | Registration in ‘Entrepreneurs Directory’
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.