Advertisement
Advertisement
कथा उद्योजकांच्या

डेस्कटॉप इंजिनीअर ते मार्केटिंग सल्लागार

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

मार्केटिंगचं कोणतंही लौकिक शिक्षण घेतलं नाही, पण तीच स्वतःची शक्ती बनवणारा मार्केटिंग सल्लागार तुम्हाला पाहायचा असेल, तर अमोल पुंडे याला आवर्जून भेटायला हवं. अमोल पुंडे एक तरुण, हरहुन्नरी आणि अतिशय पॉजिटिव्ह व्यक्तिमत्त्व. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गवारीत जे आहे त्यावर आपण कसे बेस्ट परफॉर्म करू शकतो याचा विचार करणारा उद्योजक.

अमोलने बी.कॉम. झाल्यावर हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला आणि एका खासगी कंपनीत डेस्कटॉप इंजिनीअर म्हणून आपल्या करीअरची सुरुवात केली. नोकरीत दोन वर्षांत सर्व बढती घेऊन झाल्यावर त्याचं मन रमलं नाही. मग त्याने स्वत:चाच कॉम्प्युटरचे पार्ट्स सप्लाय करण्याच्या व्यवसाय सुरू केला; परंतु फक्त ट्रेडिंगचा हा व्यवसाय करण्यातला जो तोचतोपणा होता, त्यामुळे यातही मन रमेनासं झालं. पुढे २०१३ मध्ये आनंद घुर्ये या उद्योग ज्योतिषांशी संपर्क आल्यानंतर अमोलला आपल्यातल्या अंगभूत कौशल्यांची ओळख होऊ लागली आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलने ‘मार्केटिंग सल्ला’ ही आपली कन्सल्टन्सी सुरू केली.

Advertisement

मोलाची साथ : पत्नी आणि भाऊ
मार्गदर्शक : आनंद घुर्ये
इतरांना संदेश : जोशात येऊन मोठी रिस्क घेऊ नका. आधी छोट्यातून सुरुवात करा आणि मग यश मिळवा.

२०१३ पासून अमोलने अनेक उद्योजकांना मार्केटिंगविषयक मार्गदर्शन केलं आहे. त्याचं वैशिष्ट्य हे आहे की, त्याने स्वतः मार्केटिंगचं कुठलंही लौकिक शिक्षण घेतलेलं नसल्यामुळे तो कोणत्याही थिअरी न मांडता थेट जो प्रश्न आहे, त्यावर प्रॅक्टिकल उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. गेल्या आठ वर्षांत चहाच्या टपरीवाल्यापासून ते बीएमडब्ल्यूमधून फिरणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना त्याने मार्केटिंगचे सल्ले दिलेले आहेत. कोणत्याही एकाच प्रकारच्या मार्केटिंगच्या प्रकारावर तो अडून न राहता अगदी पारंपरिक पत्रक वाटण्यापासून ते डिजिटल मार्केटिंगपर्यंत व्यवसायाची जी गरज आहे ती ओळखून तो सल्ले देतो.

दुसर्‍या बाजूला अमोलची फी आकारण्याची पद्धतही हटके आहे. समोरच्याला जे परवडेल यानुसार तो फी घेतो. समोरचा धंद्यात सेट झाला पाहिजे, हेच त्याचं एकमेव लक्ष्य असतं. दुसर्‍यांना मार्केटिंग शिकवत असताना अमोल फक्त कन्सल्टन्सीवरच न थांबता त्याने स्वतःचे इतर व्यवसायही सुरू केले आहेत. यामध्ये एक फूड सप्लाय, एक फार्मा कंपनी, डिझायनिंग एजन्सी, वेब डेव्हलपमेंट कंपनी यांचा समावेश होतो. फूड सप्लाय आणि फार्मा कंपनी या संधी अमोलकडे समोरून चालून आल्या. लोकांनी त्याचे कौशल्य बघून त्याला थेट भागीदार करून घेतला.

अमोलच्या या प्रवासात अडचणी अनेक आल्या, पण घरातल्यांची साथ आणि प्रोत्साहन हे त्याला भरपूर मिळालं. भविष्यात अमोल मार्केटिंग सल्ला हे कायम सुरू ठेवणार आहे, परंतु त्याला भविष्यात हे सल्ले मोफत द्यायचे आहेत.

संपर्क : अमोल पुंडे – ९८२००१७१७४


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!