मध्य-पूर्वेत प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ उद्योजिका झाली नाशिकची अमृता क्षेमकल्याणी

अमृता क्षेमकल्याणी

गेली सोळा वर्षं जरी मी दुबईमध्ये माझं करिअर आणि व्यवसाय उभा केला, पण खरंतर मी नाशिकची सुकन्या. माझ बालपण निसर्गरम्य नाशिकमध्ये गेलं. गोदावरी नदीवरच्या नेहेमीच्या सहली आणि नाशिकच्या भोवतायच्या डोंगर दऱ्यांमध्ये भटकंती कधी घरातील सदस्यांबरोबर तर कधी मित्र मैत्रिणींबरोबर.

तिथेच मला निसर्गाची गोडी निर्माण झाली आणि पुढे वाढतच गेली. मी मॅकेनिकल इंजिनीरिंगमध्ये ग्रॅड्युएशन केलं तेव्हा खूप कमी मुली या क्षेत्रात जात असत. पण मला फिजिक्स आणि मशीनरी यात खूप रस होता.

माझ्या शिक्षणाचा आणि एकट्या मुलीने आव्हानांना सामोरं जायच्या अनुभवाचा मला पुढे बराच फायदा झाला. नाशिकला मी एका quarry equipment manufacturing कंपनीत design इंजिनीअर म्हणून थोडा काळ काम केलं. त्यानंतर लगेचच लग्न झालं आणि लग्नानंतर मी दुबईला आले.

इथे मी एका फ्रेंच कंपनीत इंजिनीअर म्हणून नोकरी केली. दुबई ही माझी कर्मभूमीच झाली, पण इथल्या झगमगाटात माझं मन रमेना. मला डोंगर, दऱ्या, पाऊस आणि निसर्गाची कमी भासायला लागली. तेव्हा मी इथल्या पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थेत स्वयंप्रेरणेने काम करू लागले.

तिथे मला दुबईतल्या निसर्गाशी ओळख झाली. आम्ही दोघे स्वतःहून आऊटडोअर सहलींना जाऊ लागलो आणि बघता बघता मी इथल्या रूक्ष वाळवंटाच्यासुद्धा प्रेमात पडले. २००७ मध्ये मी परीक्षा देऊन LEED AP certified sustainability consultant झाले, तेव्हा मध्य-पूर्वेत बोटावर मोजण्याइतकेच certified consultants होते.

पुढे जाऊन मी अजून बरेच सर्टफिकेशन्स केले यात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा Business Sustainability सर्टिफिकेशन पण येतं. मी जेव्हा काम सुरू केलं, तेव्हा हे क्षेत्र खूपच नवीन होतं, त्यामुळे माझ्या पहिल्या काही प्रोजेक्ट्स आणि जॉब्समध्ये खूप आव्हान होती. माझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या लोकांना ट्रैनिंग देऊन काम करून घेणं सोपा नव्हतं.

तेव्हाच मला जाणवला की जर समाजात sustainability आणि पर्यावरणाविषक जागरूकता असेल तर ही नवीन पण खूप आवश्यक व्यवसायपद्धती नीट स्थापित होईल. तेव्हा मी जनजागृतीसाठी www.sustainabilitytribe.com पोर्टलची स्थापना केली. हे मध्य-पूर्वेतलं पर्यावरणाला वाहिलेलं पहिलं पोर्टल आहे.

गेली बारा वर्षं मी या पोर्टलद्वारे लोकांना सहजसोप्या प्रकारे पर्यावरणपूरक जीवनशैलीबद्दल मोफत शिक्षण देते. २०१६ मध्ये मी #ZeroWasteUAE social initiative ची स्थापना केली, जी पुढे खूप यशस्वी झाली. Sustainability Tribe ने अनेक प्रोग्रॅम्स सुरू केले community events, Ambassador प्रोग्रॅम, Sustainability Tribe Club membership for businesses. Sustainability Tribe ने अनेक लोकांना आणि व्यवसायांना प्रेरणा दिली आहे आणि आता ही एक जनजागृतीची चळवळ बनली आहे.

एकीकडे गेली चौदा वर्षं मी विविध संस्था आणि उद्योगांना sustainable business practices ची अंमलबजावणी करायला मदत करत आहे. आजपर्यंत मला अनेक इंटरनॅशनल कॉन्फेरेंन्सस, इव्हेंट्स आणि विद्यापीठांमध्ये व्याख्यानांना बोलावलं गेलं आहे.

माझ्या काही कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट्सना इथल्या सरकारने outstanding results साठी recognize केला आहे. मी इंटरनॅशनल Sustainability पुरस्करांसाठी परीक्षक म्हणूनही काम करते आणि काही इंटरनॅशनल पर्यावरण संस्थांसाठी बोर्ड मेंबर आणि सल्लागार म्हणूनही काम करते.

२०१९ मध्ये मी डेन्मार्कच्या एका कॉर्पोरेट कंपनीतला जॉब सोडून दुबईमध्ये माझी स्वतःची AKSustainabilityAdvisory.com या नावाने कन्स्लटिंग कंपनी स्थापन केली. याद्वारे मी लहान-मोठ्या सगळ्या प्रकारच्या व्यवसायांना, कॉर्पोरेट कंपन्यांना, स्टार्टअप्सना Sustainability ची तत्त्वे लागू करायला मदत करते.

माझ्या कंपनीच्या अंतर्गत मी एक Sustainability Education प्रोग्रॅमपण सुरू केला आहे, जिथे आमच्या ई-बुक्स आणि ऑनलाइन कोर्सेसद्वारे उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि कोणीही व्यक्ती Sustainability प्रिंसिपलस शिकू शकतील.

गेल्या चौदा वर्षांत अनेक मध्य-पूर्वेतील अनेक प्रसारमाध्यमांनी माझ्या कामाची दखल घेतली आहे. मला २०२० मध्ये यूएईची टॉप Environmental Thought-leader असल्याचं रेकग्निशनसुद्धा मिळालं आहे.

अमृता राजेंद्र क्षेमकल्याणी

कंपनीचे नाव : AK Sustainability Advisory & Sustainability Tribe
आपला हुद्दा : Owner, Founder & Sustainability Advisor
व्यवसायातील अनुभव : 14
व्यवसायाचा पत्ता : The Greens, Dubai, UAE
विद्यमान जिल्हा : भारताबाहेरील

ई-मेल : amruta@sustainabilitytribe.com
मोबाइल : +971509839905
संकेतस्थळ : aksustainabilityadvisory.com/
Facebook Account URL : www.facebook.com/amrutant
फेसबुक बिझनेस पेज URL : www.facebook.com/sustainabilitytribe/
LinkedIn Account URL : www.linkedin.com/company/sustainability-tribe/

आमच्या सेवा :

1. Sustainability Consulting & Advisory (includes online consulting)
– Sustainability Strategy Development
– ESG Consulting
– Aligning businesses to UN SDG 2030
– Waste management & circular economy consulting
– Sustainability Reporting

2. Capacity Building & CSR Initiatives (in person and online)
– Employee engagement & training
– Creating outreach campaigns, CSR initiatives

3. Green Building Consulting

4. Marketing & Promotion via Sustainability Tribe Portal, social media, events, #ZeroWasteUAE Social Initiative, Ambassador Program Partners

5. E-books & Online Courses

6. Sustainability Tribe Club Membership for businesses, individuals, entrepreneurs.
This include consulting, marketing and training

7. Sustainability Training design and facilitate to schools, universities, organisations (in person and online)

Sustainability Tribe:
1. Sustainability Tribe Club Membership
2. Marketing & Promotion
3. Events

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?