१५ ऑगस्ट २०१५ रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर ‘MR Masale’ची स्थापना झाली. श्रेया रायचूरकर आणि महेश रायचूरकर या जोडप्याने गावाकडच्या खर्या चवीला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांच्या या प्रवासाला प्रेरणा मिळाली ती त्यांच्या बालपणीच्या आठवणींतून जेव्हा आजीच्या हातच्या मसाल्याचा सुगंध स्वयंपाकघरातून संपूर्ण घरात दरवळायचा.
त्या गंधाने भूक तर जागवायचीच, पण मनाला आणि पोटाला एक खात्रीही द्यायची की आज काहीतरी झणझणीत, चमचमीत खायला मिळणार. आजच्या धावपळीच्या जीवनात, मसाल्यांचा तो गावाकडचा जादुई स्पर्श हरवत चाललाय. बाजारात मिळणारे अनेक मसाले एकत्र टाकूनही ती खरी चव, तो सुगंध जाणवत नाही.
याच उणीवेतून ‘MR Masale’ चा जन्म झाला. श्रेया आणि महेश यांनी ठरवलं, की त्यांच्या मसाल्यांनी प्रत्येक घरात पुन्हा तीच गावाकडची चव आणि सुगंध आणायचा. त्यांनी पारंपारिक पद्धतीने, अगदी योग्य प्रमाणात मसाले एकत्र करून “MR-All in One” मसाला तयार केला.
“MR-All in One” मसाला हा केवळ मसाला नाही, तर गावाकडच्या आठवणींचा आणि प्रेमाचा ठेवा आहे. हा मसाला रोजच्या भाजीपासून ते आमटी, उसळ, शाकाहारी आणि मांसाहारी रस्सा भाजीपर्यंत सर्व पदार्थांना खुलवतो. अगदी थोड्या प्रमाणात वापरूनही हा मसाला तुमच्या जेवणाला गावाकडचा खमंग सुगंध आणि चव देतो. प्रत्येक दाणा, प्रत्येक मसाला काळजीपूर्वक निवडला जातो, जेणेकरून तुमच्या थाळीत येईल ती खरी, घरगुती चव.
‘MR Masale’ हे फक्त मसाल्यांचं नाव नाही, तर एक भावना आहे, गावाकडच्या साध्या, पण हृदयाला भिडणार्या चवींची. प्रत्येक घरात, प्रत्येक जेवणात, आम्ही तुमच्यासाठी आणतोय तो गावाकडचा मसाला आणि तीच गावाकडची चव!
MR Masale ची उत्पादने :
- मिरची पावडर
- हळदी पावडर
- धणे पावडर
- गरम मसाला
- चाट मसाला
- अस्सल घरगुती “ऑल-इन-वन” मसाला
संपर्क : 9209009801





