कोरोनानंतर खूप गोष्टी बदलल्यात हे आपल्याला आजूबाजूला पाहिले तर कळतेच, पण सगळ्यात मोठा बदल हा दृष्टिकोनबदलात झाला आहे. जगण्याचा दृष्टिकोन, कामाचा दृष्टिकोन व्यवस्थेला बदलण्याची ताकत ठेवते. या दृष्टिकोनबदलात रिमोट वर्कचा उदय झाला.
रिमोट वर्क म्हणजे कामाच्या जागेत व्यवस्थेत केलेला बदल. पूर्वापार चालत आलेल्या कार्यालयीन वातावरणातून बाहेर पडून काम करणे. सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. ती जिथे उपलब्ध असेल तिथून आपले काम पूर्ण करणे मग ते आपले घर असो अथवा को-वर्क स्पेस आपली इतर कोणती आवडती जागा.
सध्याच्या काळात तर लोक जगण्याचा, फिरण्याचा आनंद घेत प्रवासात असताना आपले काम करतात. यातून वर्क फ्रॉम होम हेसुद्धा मोठ्या प्रमाणात केले जावू लागले आहे. हाय स्पीड इंटरनेट व डिजिटल कम्युनिकेशन टुल्सचा वापर करून अनेक व्यवसाय आणि कर्मचार्यांसाठी रिमोट वर्क हा एक व्यवहार्य आणि वाढता लोकप्रिय पर्याय बनला आहे.
या बदललेल्या कामाच्या पद्धतीचा अनेक उद्योजकांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी फायदा होतोय. भारतात रिमोट वर्कमुळे खूप मोठ्या उपेक्षित टॅलेंटला काम मिळाले आहे आणि पर्यायाने जागतिक पातळीवर भारतात खूप मोठा वर्ग अर्थार्जन करणार्या प्रवाहात जोडला गेला आहे.
उद्योजकांना याचा फायदा काय आणि कसा होतोय? तर कामाच्या वेळेतील लवचिकतेमुळे कर्मचार्यांवरील ताण कमी होतो. घर, काम आणि इतर आघाड्यांवर काम करताना संतुलन साधने कठीण जाते, पण या सुधारित पद्धतीमुळे हा बॅलन्स करणे शक्य होते. याचा थेट परिणाम हा प्रॉडक्टिव्हीटी वाढण्यावर होतो. स्वत:चे वेळापत्रक स्वत:च्या हातात असते. या सगळ्यामुळे आपल्या कामातून मिळणारे समाधानही कर्मचारी अनुभवू शकतात.
दुसरा मुद्दा असा की रिमोट वर्कमुळे जागतिक दरवाजे उघडले गेलेत आणि भौगोलिक सीमांचे बंधन न राहता चांगल्या टॅलेंटला संधी मिळतेय. नवकल्पनांना चालना मिळतेय. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात जिथे विविध प्रकारचे टॅलेंट आहे, तिथे खूप संधी निर्माण होत आहेत.
कंपन्या ऑफिस स्पेस, युटिलिटीज आणि ऑफिस सप्लाय यासारख्या ओव्हरहेड खर्चांवर बचत करू शकतात. यातून झालेली बचत ही कर्मचार्यांच्या विकासावर, आधुनिक तंत्रज्ञानावर तसेच ग्राहक सेवा सुधारण्यावर करता येते. पुन्हा यामुळे आपली उत्पादन क्षमता वाढते.
स्टार्टअप किंवा कमी बजेटमध्ये जे व्यवसाय चालतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. व्यवसायाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे मोठमोठ्या शहरांत आज जी पायाभूत सुविधांची गरज आहे, ती कमी होतेय. याशिवाय छोट्या शहरांतूनही कामाला गती मिळते व तिथेही रोजगारनिर्मिती होत आहे.
रिमोट वर्क पद्धतीमुळे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिजिटल साधनांच्या वापराला वेग आलाय. त्यामुळे क्लाउड सर्व्हिसेस, सायबर सेक्युरिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासारख्या आवश्यक साधनांमध्ये व्यवसायांची गुंतवणूक वाढली आहे. या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम झाली आहेत.
व्यवस्थापन पद्धतीत बदल झालेत. या पद्धतीत टीमवर्क नीट व्हायला नेतृत्वशैलीतील बदल व्हायला हवेत. त्या दृष्टीने काम केले जातेय. रिमोट वर्कमध्ये डिजिटल साधनांची माहिती असलेली व्यक्ती चांगले रिझल्ट देते त्यामुळे नेतृत्वालाही हा बदल स्वत:मध्ये अंगिकारायला हवा.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीशहरीकरण आणि रिअल इस्टेटवर परिणाम
कोणीही कोठूनही काम करू शकते अशी मुभा रिमोट वर्कमध्ये मिळते. आवश्यकता आहे डिजिटल कम्युनिकेशन साधनांची. यामुळे रिअल इस्टेट उद्योगावर परिणाम होतोय. पूर्वी कामानिमित्त अनेकांना घरापासून दूर कामाच्या ठिकाणाजवळ राहावे लागायचे.
व्यवसाय, नोकरीच्या संधी पूर्वी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या शहरात जास्त होती. म्हणून लोकांचा ओढा शहरांकडे जास्त होता, पण रिमोट वर्कमुळे अनेकांना आता आपल्या घराच्या ठिकाणाहून काम करणे सोपे आणि सोईचे झाले आहे. त्यामुळे स्थलांतर कमी होतेय. याचा परिणाम शहरीकरण आणि रिअल इस्टेटवर होतोय.
या कार्यपद्धतीत जसे फायदे आहेत तसेच अनेक आव्हानेसुद्धा आहेत. वर्क कल्चर, डाटा प्रायव्हसी अशी अनेक आव्हाने आहेत. कामाच्या नव्या पद्धतीसाठी पूरक स्ट्रॅट्रेजी आवश्यक आहेत. पारंपरिक पद्धतीच्या व्यावसायिक रणनीतीत बदल करून आवश्यक ते प्रशिक्षण आणि कायदे नियम नव्याने या पद्धतीला पूरक असे बनवण्याचे आव्हानही आज सरकार आणि अनेक कंपन्यांनपुढे आहे.
नाण्याला दोन बाजू असतात. फायदा आणि तोटा, चांगले-वाईट असे विविध पैलू प्रत्येक गोष्टीला असतात. त्यामुळे रिमोट वर्क कल्चर रुजतानाही या अशा गोष्टी समोर येणारच. ही आव्हाने पेलत भविष्याचा वेध घेत रणनीती आखली पाहिजे.
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

