स्टार्टअप

मुंबईतला हा तरुण सकाळी ताजे मासे विकून पुढे नोकरीही करतो

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कोण म्हणतं मराठी मुलं व्यवसाय करत नाहीत? अरुण राऊतसारखी तरुण मुलं तर नोकरी पण करतात आणि व्यवसाय पण. अरुणने मला पाहिलं होतं ते दहीहंडी उत्सवाच्या निवेदनात. सकाळीच मॉर्निंग वॉकला जात असताना अरुणने स्वतःहून मला हाक मारली आणि सांगितलं की तुमचे निवेदन खूप छान असतं.

मला या तरुणाबद्दल बरेच दिवस अप्रूप होतं, पण बोलायचं कसं या प्रश्नाला अरुणनेच बगल देत संवादाला सुरुवात केली. झी मराठीसारख्या प्रसिद्ध चॅनलमध्ये प्रोडक्शन टीममध्ये काम करणारा अरुण सकाळीच भाऊच्या धक्क्यावर जातो आणि भांडुपकरांसाठी ताजे मासे घेऊन येतो आणि त्या माशांचा व्यवसाय करतो आणि मग नोकरीलासुद्धा जातो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

त्याच्या संपूर्ण कुटुंबात पहिला अशा पद्धतीच्या व्यवसायाची आवड असणारा हा तरुण कोणतही दुकान नसताना कसलीच तमा न बाळगता महिंद्रा स्प्लेंडर टॉवरच्या समोर असणाऱ्या गेटजवळ बसून ही संपूर्ण मच्छी सुट्टी करतो आणि भांडुपमधील अनेक फिशलवर्सना ऑथेंटिक मच्छीचा आनंद देतो.

अशी तरुण मुलं म्हणजे आपल्या सर्वांसाठी असणारे एक प्रेरणास्थानच आहेत. अरुणसारख्या अशा बऱ्याच तरुण मराठी मुलांनी व्यवसायात यावं, याकरता आपण सगळेच अशा मराठी मुलांना पाठिंबा देऊया.

टीप – माझं प्रमोशन करा, असं तो चुकूनही बोलला नाही. मीच त्याने इतरांसाठी उदाहरण ठराव यासाठी ही पोस्ट शेअर करत आहे.

संपर्क : अरुण राऊत – 8104916706
(सौजन्य : प्रसिद्ध निवेदनकार किरण खोत यांची फेसबुक पोस्ट)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!