केवळ मौखिक प्रसिद्धीतून विश्वविख्यात बनलेले भविष्यकार उल्हास पाटोळे


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


लंडनला अत्युच्च पदावर काम करणारे एक मराठी दाम्पत्य होते. तिथे दोघांनाही अतिशय उच्च पगाराची नोकरी होती. काही घरगुती समस्यांमुळे दोघांनाही मुंबईला घरी यावे लागले. इकडे आल्यावर दोघांचेही वाईट दिवस सुरू झाले. त्यांच्या शिक्षणाला अनुरूप अशी नोकरी दोघांनाही मिळेना. घरगुती समस्यांमुळे परत अमेरिकेत जाणेही शक्य नव्हते

दोघेही फार मेटाकुटीला आले होते. एका परिचितांतर्फे त्यांना दादर, प्रभादेवीच्या ‘अ‍ॅस्ट्रोनेत्रम’चे संचालक ज्योेतिषाचार्य उल्हास पाटोळे यांची माहिती समजली. ते दाम्पत्य त्यांना भेटले. उल्हास पाटोळे यांनी त्यांच्या समस्यांचा विविध भविष्यकथन शास्त्रांच्या आधारे अभ्यास केला व काही उपाय सुचवले. पुढे अल्पावधीतच या दाम्पत्याने मुंबईत काही कोटींचा फ्लॅट घेण्याइतपत प्रगती केली.

अर्थात तो फ्लॅट निवडण्यासाठीही त्यांनी उल्हास पाटोळे यांचेच मार्गदर्शन घेतले. इतकेच नव्हे तर याच दाम्पत्याला, वैद्यकीयदृष्ट्या सर्व नॉर्मल असूनही अपत्य होत नव्हते. याबाबतही त्यांनी उल्हास पाटोळे यांचे मार्गदर्शन घेतले. उल्हास पाटोळे यांनी दोघांच्या कुंडलींचा अभ्यास करून सुचवलेले उपाय केल्याने त्यांना संतान झाले.

अशा तर्‍हेने आजवर हजारो जणांच्या आयुष्यातील विविध समस्यांचे अ‍ॅस्ट्रोनेत्रमच्या उल्हास पाटोळे यांनी निवारण केले आहे. आजच्या जाहिरातींच्या जगात प्रत्येक उत्पादक-सेवा देणारा आपापल्या व्यवसायाची विविध माध्यमांतून जाहिरात करत असतो. उल्हास पाटोळे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की, ते आपल्या व्यवसायाची कोणत्याही प्रकारची जाहिरात करीत नाहीत. केवळ मौखिक प्रसिद्धीद्वारेच त्यांची ख्याती फक्‍त मुंबईत आणि भारतातच नव्हे, तर देशविदेशांतही पसरलेली आहे.

अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हाँगकाँग, कतार, मस्कत इत्यादी मध्यपूर्वेतील देशांमध्येही त्यांचे क्लायंट्स आहेत. त्यांची सेवा आणि त्यांनी सुचवलेल्या उपायांमुळे एका क्लायंटला त्यांची प्रचीती आली की, तो आपोआप इतर दहा गरजू लोकांना त्यांच्याकडे पाठवतो. त्यांच्या  समस्या निवारण झाल्या, की ते त्यांची माहिती आनंदाने इतरांना सांगतात. त्यातूनच गेली वीस वर्षे उल्हास पाटोळे हे ज्योतिषी-भविष्यकथनकार म्हणून शब्दश: जगप्रसिद्ध झाले आहेत.

उल्हास पाटोळे हे एका राष्ट्रीयीकृत बँकेत कामाला होते. त्यांना फलज्योतिष्याची उपजतच अतिशय आवड होती. बँकेतील नोकरी चालू असताना ते विविध ज्योेतिषांना भेटत व त्यांच्याकडून ज्ञान संपादन करीत. काही वर्षांपूर्वी चायनीझ फेंगशुईची लाट आली तेव्हा त्यांनी जिज्ञासेने भारतीय वास्तुशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रत्नशास्त्र, टॅरो कार्ड्स व इतर अनेक संबंधित शास्त्रांचा आभ्यास केला.

ते बँकेत असताना त्यांनी वर्तवलेले भविष्य खरे ठरल्यामुळे त्यांच्याकडे अनेक जण आपापल्या समस्या घेऊन येत. अशा गरजू लोकांची संख्या वाढल्यामुळे वीस वर्षांपूर्वी त्यांनी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली व ज्योतिषशास्त्रालाच वाहून घेतले.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


आज त्यांच्या व्यवसायालाही वीस वर्षे झालेली आहेत. दादर, प्रभादेवी येथे त्यांचे सुसज्ज कार्यालय आहेत. येथे देशविदेशांतून लोक त्यांचा सल्‍ला घ्यायला येतात. वास्तुशास्त्रातील जाणकार म्हणून अनेक उद्योजक-व्यापारी त्यांना स्वखर्चाने परदेशातही आपापल्या वास्तूंच्या परीक्षणासाठी घेऊन जातात.

वास्तुशास्त्राच्या बाबतीत त्यांनी काही कमी खर्चाचे, बिलकूल तोडफोड न करावे लागणारे, त्यामुळे लोकांना परवडणारे मात्र तितकेच परिणामकारक असे उपाय विकसित केलेले आहेत. ज्योतिषाचार्य उल्हास पाटोळे आपल्या ग्राहकांना ते उपाय सुचवतात. ज्योतिषी आणि वास्तुशास्त्री म्हणून उल्हास पाटोळे यांच्या अगणित परदेशवार्‍या झाल्या आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरूनही मंगळदोष आणि वास्तुशास्त्रासंबंधी त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत.

उल्हास पाटोळे म्हणतात की, त्यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्‍ती आणि तिची समस्या वेगवेगळ्या स्वरूपाची असते. तिचा साद्यंत अभ्यास करावा लागतो. काही वेळा यंत्रांचा, कधी तांत्रिक विधींचा, कधी मंत्रशास्त्राचा, तर कधी अंकशास्त्र, कधी रत्नशास्त्र, तर काही वेळा कलर थेरपीचाही उपयोग करावा लागतो. माणसे समान, ठोकळेबाज नसतात. त्यांच्या समस्याही विविधांगी असतात. त्यामुळे एकच उत्तर सर्वांना लागू होत नाही. तेव्हा एकाच शास्त्राला चिकटून बसता येत नाही.

समस्येनुसार त्यावरील उपाय बदलतात. कोणत्या शास्त्राचा त्या व्यक्तीच्या समस्या निवारणासाठी उपयोग करायचा, हे ठरवण्यासाठी अनुभवाचीच गरज असते. हल्‍ली कोणीही शॉर्टटर्म कोर्सेस करून ज्योतिषी बनतो, भपकेबाज ऑफिस टाकून लोकांना चुकीचे मार्गदर्शन करतो, हे चुकीचे आहे. लोकांनी जाणकार, अनुभवी ज्योतिषांचाच सल्‍ला घ्यावा. तसेच वास्तुशास्त्र हे पुरातन भारतीय शास्त्र आहे. घर-दुकान-कार्यालय घेण्यापूर्वी वास्तुशास्त्र जाणकाराचा सल्‍ला अवश्य घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे अनेक त्रास टळतात. याबाबत अमराठी समाजात फार जागरूकता आहे.

उल्हास पाटोळे वास्तुशात्र, अंकशास्त्र आणि टॅरोकार्ड्स यांचे कोर्सेसही घेतात. आजवर अनेकांनी त्यांच्याकडून या शास्त्रांचे ज्ञान घेतले आहे. भविष्यात त्यांना आपली वेबसाइट बनवायची आहे. लोकांशी संवाद साधता येईल अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रविषयक विषयांवर व्याख्याने देऊन ती यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करायची आहेत.

जाहिरातींवर खर्च करून कोणालाही प्रसिद्ध होता येते; पण कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता उल्हास पाटोळे यांनी जगभरात जी ख्याती मिळवलेली आहे तीच त्यांनी सुचवलेल्या उपायांमुळे लोकांच्या समस्या निवारण होतात, याची ग्वाही देते. तेव्हा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींनी त्यांचे अवश्य मार्गदर्शन घ्यावे. त्यासाठी संपर्क साधावा.

संपर्क – उल्हास पाटोळे
९३२२८४२१७७, ९९८७८१५८९९


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?