उद्योजक Profiles

वडिलांची मिल बंद पडली, शिक्षण घेण्यातही अडचणी आल्या, तरी जोमाने झाला उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘जसा कुंभार तसा त्याचे मडके’ या नियमानुसार शिक्षिका आई, त्यामुळे शिक्षणाचा वारसा आणि बाळकडू घरातूनच मिळाले. अगदी घरापासून ते शाळेपर्यंत सगळेच आम्हाला मॅडमचे चिरंजीव असेच ओळखत. जसे जोपर्यंत मुल आईच्या पंखाखाली असते तेव्हा मजेत चालू असते.

आम्हाला समाजातील कडवट गोष्टींचा कधीही त्रास झाला नाही. पण सगळेच दिवस सारखे नसतात. एका अवघड वळणावर येऊन थबकलोच. ऐन दहावीच्या परीक्षेचा निकाल हाती, महाविद्यालयीन स्वप्ने डोक्यात असतानाच वडिलांची मिल (गिरणी) बंद पडली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

मग जे मिळेल ते काम करण्याची गरज होती आणि आईच्या वेतनावर कसाबसा आमचा चरितार्थ चालू होता. खूप शिकायचे आणि मोठा व्हायचे हे लहानपणीच बिंबवले होते, पण प्रवास इतका खडतर असेल याची कल्पना मुळीच नव्हती.

वडिलांचे वय उतरणीला असल्याने आम्हा तरुणांना कामधंदा करणे भागच होते. जे भेटेल ते काम करू लागलो. पेपर वाटण्यापासून ते मजुरीची काम करत राहीलो, पण आईचा अट्टाहास, शिक्षण घेतलेच पाहिजे आणि काम करत करत शास्त्रशुद्ध तंत्रशिक्षण हा पर्याय निवडला. दहावीच्या गुणांनुसार औद्योगिक तंत्रज्ञान या शाखेत प्रवेश मिळाला.

तारेवरची कसरत चालू होती. पदविका अभ्यासक्रम, नॅशनल कॅडेट क्रॉप आणि मिळेल ते काम अशी ओढाताण व्हायची. आईच्या संस्कारांमुळे पदविका अभ्यासक्रमाचा बराचसा खर्च शिष्यवृत्तीतुन व्हायचा. संपूर्ण अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. आता वेळ आली होती ती औद्योगिक क्षेत्रात आपली स्वत:ची कसब आजमावून पाहण्याची.

अगदी हेल्परपासून सुरुवात करत एका बहुराष्ट्रीय कंपनीत मुख्य तंत्रज्ञ असा प्रवास केला. देश-विदेशात कामानिमित्त सफरी केल्या, पण नोकरीत काही काळ घालवल्यावर मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चं तेजस्वी वलय असावे, असे सतत वाटत होते आणि ते अजूनही वाटत आहे. म्हणूनच स्वत:चा संगणक तंत्रज्ञानाचा व्यवसाय सुरू केला. सोबत आपल्या हातून लोकांची सेवा व्हावी, या सद्हेतूने भारतीय जीवन विमा निगमची एजन्सी घेतली.

अतुल शामराव पिसाळ

कंपनीचे नाव : SAS GROUP OF COMPANY
आपला हुद्दा : Financial & IT Consultant
व्यवसायातील अनुभव : 9 वर्षे
व्यवसायाचा पत्ता : 1st Floor, Sunray Shopping Center, Charkop Market, Borivali Gorai Road, Kandivali west. Mumbai. 400067.
विद्यमान जिल्हा : मुंबई

ई-मेल : sasgroupofcompany@gmail.com
मोबाइल : 9930616187
संकेतस्थळ : Charkop Market
Facebook Account URL : https://www.facebook.com/atul.pisal/
फेसबुक बिझनेस पेज URL : https://www.facebook.com/100000010111059/posts/4539400149403611/
LinkedIn Account URL : https://in.linkedin.com/in/atul-pisal-72500914

तुमची उत्पादने व सेवा :

√ Computer programming, website design related activities.
√ Repair of all computers and Laptop systems.
√ Repair and maintenance of all IT and peripheral equipment.
√ Information technology and computer service activities.
√ Data processing, hosting and related activities.
√ Life insurance
√ Non Life insurance
√ Health insurance

  • Annual Maintenance Contract of Desktop, Laptop, Printers & all
  • Website Design CMS & SEO for company Websites and all DTP Designs Work.
  • Application Support
  • Email-Web-Domain Resistor & Hosting
  • Tally Partner
  • Sales & Purchase of all IT Hardware.
  • IT Consultancy etc.
  • Big Rock Partner
  • Call Center, Dialer & Mor

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!