Advertisement
स्मार्ट उद्योजक सूची

₹६,००० ची नोकरी सोडून दुग्धव्यवसाय सुरू करणारा आज आहे यशस्वी उद्योजक

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

माझे बालपण हनुमंत खेडा या गावात गेलेले आहे. माझे शिक्षण बारावीपर्यंत गावातच झाले आहे. पुढे आयटीआय करून नाशिकला किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागलो. तिथे पंचवीसे रुपये महिना अप्रेंटिस म्हणून दिला जात होता. पुढे सहा हजार रुपये ट्रेनी म्हणून देण्यात आला. सहा हजार रुपयात काहीच परवडायचं नाही. सारे पैसे रूम भाडं, मेस यातच खर्च व्हायचे. याच दरम्यान वडिलांशी या विषयात चर्चा झाली. आमचा वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय सुरळीतरित्या चालू करावा ,असं वडिलांचं मत त्यांनी स्पष्ट केले.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

निर्णय पक्का केला आणि २०१२ साली दोन गायी घेतल्या. त्यांचे योग्यप्रकारे संगोपन केले. त्या स्थिरस्थावर झाल्यावर अजून दोन गायी वाढवल्या. त्यातली एक आजारपणामुळे मृत पावली. तिच्या आजारपणाचा डॉक्टरी खर्च जास्त असल्यामुळे मानसिक ताण वाढला होता. तरीही पुढे तीन गाईंना २०१४ पर्यंत व्यवस्थित सांभाळले, पण त्याच वर्षी माझा अपघात झाला आणि एक वर्षभर माझा पाय अगदीच निकामी झाला होता.

या वर्षभराच्या काळात वेळ वाया न घालवता धुळे येथील आदर्श कॉलेजला दुग्ध व्यवसाय डिप्लोमा करून घेतला. गाईंच्या संगोपनाची दरम्यान एका गाईच्या आजारपणाच्या वेळी आलेल्या समस्यांना सामोरे जाताना बरेच काही शिकायला मिळाले. त्यामुळे स्वतः प्रथम उपचार शिकून घेतले. हळूहळू गायी वाढवत गेलो. माझ्या घरच्या गायींपैकी आतापर्यंत अठरा गायी मी विकल्या. तो एक माझा नफा झालेला आहे. आता माझ्याकडे सोळा गायी आहेत.

मग दुग्धव्यवसायाला जोडधंदा म्हणून मी गावरान कोंबडीपालन केले व त्यातून स्थानिक अंडी विक्री चालू केली. दिवसाला माझ्याकडून ५० ते ७० अंडी विक्री होते. प्रति अंडे १० रुपये याप्रमाणे यातून उत्पन्न मिळते. शिवाय अजून जोडधंदा म्हणून शेळीपालन आणि शेततळे करून मत्स्यपालनावर भर दिला. शेततळ्यामुळे पाण्याची सोय झाली आणि मी शेतात ऊस लागवड करून घेतला. यातून चाऱ्याचीही सोय झालीय.

अविनाश राजेंद्र पाटील

आता २०२० मध्ये पंधराशे पक्षांची पोल्ट्री फार्म चालू केला आहे. शेततळ्यावर सौर ऊर्जेचा प्लांट बसवलेला आहे. आता माझ्या गोपालनातून सध्या १०० ते ११० लिटर दूध एक वेळी जात आहे. २७ रुपये प्रति लिटर मला भाव मिळतो. आता माझी मुक्तसंचार गोठा चालू करण्याची तयारी चालू आहे. २०२१ च्या शेवटपर्यंत तीस ते पस्तीस गायी करायच्या आहेत.

सुरुवातीला भरपूर संघर्ष करावा लागला. नियोजनाअभावी चार ते पाच गायी मेल्या. त्याच वेळी माझा अपघातही झाला. वडिलांचे बायपास झाले, पण कुठलाही धीर न सोडता व्यवसाय चालू ठेवला यात माझ्या आईचे आणि वडिलांचे खूप मोठे श्रेय आहे. २०१८ साली तर दुष्काळजन्य परिस्थिती होती त्यामुळे चाराटंचाईला तोंड द्यावे लागले पण आता सर्व नियोजनबद्ध काम केल्यामुळे आणि दुग्धव्यवसायाला दुसरे पूरक व्यवसाय चालू केल्यामुळे व्यवस्थितरीत्या माझा व्यवसाय चालू आहे. मी गावातले दूधसुद्धा जमा करतो. माझी ‘अविनाश महिला दूध उत्पादक सोसायटी’सुद्धा आहे.

माझ्या मित्रांनो, व्यवसायात टिकून राहायचे असेल तर संघर्ष करावाच लागतो. पहिले दोन वर्ष नफा काय असतो, त्याचा विचार करावा लागत नाही. व्यवस्थित नियोजनबद्ध काम केल्यानंतर तीन वर्षानंतर व्यवस्थित नफा हा दिसू लागतो.

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

  • गल्या व उच्च प्रतीचे दूध उत्पादक
  • गावरान अंडी विक्री
  • मत्स्यपालन करून स्वतः मासे विक्री
  • पंधराशे पक्षी पोल्ट्री कॉकरेल फार्म
  • शेळीपालन

अविनाश राजेंद्र पाटील
दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन,  मत्स्यपालन, प्रायव्हेट वेटनरी प्रॅक्टिस व शेती
व्यवसायातील अनुभव : 10 वर्षे
तुमची उत्पादने व सेवा : दूध विक्री, मत्स्य उत्पादन, शेळी उत्पादन गावरान अंडी उत्पादन व विक्री तसेच पंधराशे पक्षाचे पोल्ट्री फार्म
विद्यमान जिल्हा : जळगाव

व्यवसायाचा पत्ता : जिल्हा जळगाव, तालुका पारोळा, गाव हनुमंत खेडे, चाळीसगाव रस्ता पारोळा पासून आठ किलोमीटर अंतरावर
ई-मेल : avipatil3173@gmail.com
मोबाइल : 9975347479


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!