Advertisement
उद्योगवार्ता

‘मुद्रा’ योजनेची प्रकरणे तातडीने निकाली काढा : बडोले


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


प्रत्येक गरजू व बेरोजगार युवक-युवती स्वावलंबी झाली पाहिजे, असा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे. यासाठी जास्तीत जास्त बेरोजगार व गरजू व्यक्तींना ‘मुद्रा’ योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी ‘मुद्रा’ योजनेची प्रकरणे तातडीने निकाली काढा, असे निर्देश राजकुमार बडोले यांनी गोंदिया येथे दिले. पंचायत समिती सभागृह सडक/अर्जुनी येथे २ जुलै रोजी पालकमंत्री बडोले यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुद्रा’ योजनेचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

बडोले यावेळी म्हणाले, ‘मुद्रा’ योजनेबाबत ज्या बँकांना शिशु, किशोर व तरुण या गटाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ते त्यांनी वेळेत पूर्ण करावे. या योजनेची माहिती घेण्यासाठी कोणत्याही बेरोजगार व्यक्तींची बँकेत आल्यानंतर निराशा होणार नाही याची काळजी घ्यावी व त्यांना या योजनेबाबत विस्तृत माहिती देऊन सहकार्य करावे. अनेक बेरोजगार व गरजू व्यक्ती छोटे-छोटे उद्योग व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींना ‘मुद्रा’ योजनेतून बँकांनी योग्य ते सहकार्य करावे. त्यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे सांगून ते पुढे म्हणाले, बँकांनी मुद्रा योजनेतून बेरोजगार व गरजू व्यक्तींना कर्ज देतांना सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. ‘मुद्रा’ योजनेतून रोजगार उभारण्यासाठी बँकेमध्ये येणाऱ्या गरजू व्यक्तीला समाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत. अनेक बँका बेरोजगार व गरजू व्यक्तींना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी बेरोजगार व गरजू व्यक्ती करीत आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या तक्रारी येणार नाही याबाबत सर्व बँकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: