एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आज करतोय ५० कोटींची उलाढाल


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


बाळासाहेब रामेश्वर मस्के यांचा जन्म महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील जातेगाव या गावी ऊसतोड कामगार परिवारात झाला. दुष्काळाला कंटाळून बाळासाहेब मस्के यांच्या आई-वडिलांनी मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्तलांतर केले. बाळासाहेब तसे सुरुवातीपासूनच शिक्षणात खूप हुशार होते, त्यांना मोठी स्वप्न उराशी बाळगण्याची सवय लागली, त्यांनी हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

गणित आणि विज्ञान या विषयात जास्त रुची होती, परंतु या गरिबीच्या भयाण परिस्थितीने त्यांना डॉक्टर होऊ दिले नाही. तरीही त्यांनी हार न मानत व्यवसाय करण्याचे ठरवले. असे ते वयाच्या बाराव्या वर्षांपासून स्टॉलवर खेळणी व इतर वस्तू विकून घराचा भार सांभाळत होते.

२०१० पर्यंत त्यांनी आपले मोबाईल शॉपी, मोबाईल रिपेरिंग, ट्रेनमध्ये वह्या-पुस्तके विकणे, स्टेशनवर बूट पोलिश करणे, स्टॉलवर चप्पल बूट विकणे, मोबाइलची सिम कार्ड विकणे, मोबाइलची दोरी व कव्हर विकणे अशा लहानसहान सतरा व्यवसायात नशीब आजमावले.

२०१० साली ‘मस्के ब्रदर्स फॅसिलिटी’ नावाची कंपनीची सुरुवात केली. त्याचे रूपांतर आज ‘मस्के ब्रदर्स ग्रुप ऑफ कंपनीज’मध्ये झाले. मस्के यांची आणि त्यांच्या ग्रुप कंपन्यांची नेट वर्थ ५० कोटीच्या घरात आहे.

मस्के ब्रदर्स ग्रुप ऑफ कंपनीज बिजनेस कन्सल्न्सी सर्विसेस, ट्रेनिंग अँड सेफ्टी कन्सल्टन्सी, लीगल आणि टॅक्स कन्सल्टन्सी, रिअल इस्टेट व्यवसाय, फायनान्स सर्विसेस, अशा बऱ्याच व्यवसायात कार्यरत आहेत. सुरुवातीला आणि आजही सेक्युरिटी गार्ड एजेन्सी चालू करण्यास लागणारी पसारा कन्सल्टन्सी त्यांच्या महत्त्वाचा व्यवसाय राहिला आहे.

एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्रात ९ शाखा, भारतभर २४ शाखा तसेच जवळजवळ १,१०० लोकांना नोकरी देणारा असा बाळासाहेब मस्के यांचा प्रवास सुरू आहे.

त्यांची ‘मस्के ब्रदर्स फाऊंडेशन नावाची संस्था’ शहिद जवानाच्या परिवाराची तसेच त्यांच्या मुलांची शैक्षणिक मदत करत आहे. त्यांच्या मदतीला त्यांचे बंधू शरद रामेश्वर मस्के आणि राजाराम झा आहेत तसेच त्यांच्याकडे ५ चार्टर्ड अकाउंटंट, २ सी एस आणि ४ वकील तसेच ३९ प्रोफेससीओनल्स मदतीला आहेत. तरुण उद्योजकांना मदत आणि मार्गदर्शन करणे याला ते आपला धर्म मानतात. त्यांनी आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त तरुण उद्योजकांना सहकार्य व मार्दर्शन केलं आहे.

“तुम्ही प्रयत्न सोडू नका, देव तुम्हाला हरू देणार नाही”, असं ते नेहमी सर्वांना सांगतात. चिकाटी आणि सतत प्रयत्न याने सर्व काही शक्य आहे आणि याचे उदाहरण म्हणजे बाळासाहेब मस्के. त्यांना संपूर्ण जगात आपली सेवा आणि सर्विसेस देण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहें.

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

आपली पसारा बिझनेस कन्सल्टन्सी सेक्टरमध्ये ११ वर्षांचा अनुभव असणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी, मस्के ब्रदर्स कन्सल्टन्सी प्रा. लिमिटेडला PSARA परवाना आणि सुरक्षा गार्ड प्रशिक्षणातील एक सर्वोत्कृष्ट सल्लागार मानले जाते. आम्ही महाराष्ट्र शासनासह सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र नोंदणीकृत आहोत.

२०१० मध्ये मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्रात नऊहून अधिक शाखा आहेत आणि भारतभरात २४ शाखा आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना PSARA परवाना मिळवण्यासाठी, सुरक्षा एजन्सीची स्थापना करण्यास, सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण प्रदान करण्यात मदत करतो.

आम्ही नवीन कंपनी सुरू करण्यासाठी कंपनी नोंदणी, कंपनी निगमन आणि इतर सेवांमध्येदेखील मदत करतो. कोटेशन बनवणे, प्रोफाइल बनवणे, जी एस टी तसेच लेबर कॉम्पियन्स करणे. आमच्यासोबत सर्व काही शक्य आहे.

बाळासाहेब रामेश्वर मस्के

कंपनीचे नाव : Maske Brothers Group Of Companies
आपला हुद्दा : Founder/ Managing Director
व्यवसायातील अनुभव : ११ वर्षे
विद्यमान जिल्हा : मुंबई

 • तुमची उत्पादने व सेवा : Psara License Consultant, (Complete Start to end Process Consultant)
  Maharastra State Authorised Security Guard training,
  Training Mou.
  Security Agency owner Training.
  Gst, Fssai license, Factory License, Company Formation, Company Tax and GST audit, Company Formation and ROC compliance, Labour license, EPF/ ESIC/ PT registration And Filling, GST registration – All Services across india.

व्यवसायाचा पत्ता : Head Office- 204, Shree Krishna industrial Premises, Opp Toll plaza, Dahisar east, Mumbai-400068.

व्यवसायाच्या शाखा :

 • Branch- 04, Sameer Apt Maratha colony, Near Ram Krishna Hotel, Dahisar East, Mumbai 400068.
 • Sangali- Office No 1, Shree Complex, Opp Dandekar Hall, vishram baug, sangli – 416415
 • Bhiwandi- 02, Sheetal Apt, Mandai Colony, Opp BSNL Exchange, Gauri pada, Bhiwandi- 421308.
 • Beed- at P- Georai, Tal- Geaorai, Dist – Beed.
 • Pune- 03, Survey No 54, Opp Shree Graphics, Gandhi chawk , Mundhwa, Pune.
 • Wardha- ward no 2, Akshay Shanti Dham, New Arts Collage Road, Wardhs-442001
 • Gujarat- 102, Shree Complex, Nava wadaj, Ahmedabad, Gujarat- 3800183.
 • Bihar- At Post Haripur, via Nehara, Banipur , Darbhanga, Bihar -847233.
 • Karnatak- Plot No 70, 2nd cross Road, Auto nagar, Belgavi, Karnataka- 500916.
 • Delhi- Office-456, Opp BSF Head Quarter, R K puram, sector 6, Near Bus Stop, Delhi-110022
 • Chennai- Ground floor, 32, Sai Geeta Society, Tirumurty Street, T nagar, Chennai- 600016.

ई-मेल : services.maskebrothers@gmail.com
मोबाइल : 7738995566
संकेतस्थळ : maskebrothers.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?