माजी केंद्रिय कृषीमंत्री श्री शरदचंन्द्र पवार यांच्या संकल्पनेतुन साकार झालेली कंपनी तसेच केंद्रिय वाहतुक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या “शेतकरी फक्त अन्नदाता नाही, तर ऊर्जादाताही झाला पाहिजे”, या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काम करत असलेली कंपनी.
बाभुळसर गावचे सुपुत्र अभिमन्यू रामदास नागवडे व त्यांची बारामती इको सिस्टिम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. या शेतकऱ्यांशी निगडीत व कृषीपूरक कंपनीने अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या कंपनीला भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडुन (MNRE) अधिकृत बायो गॅस सयंत्र उत्पादक अशी परवानगी (मान्यता) मिळाली आहे.
अशा प्रकारचे ॲप्रोवल मिळालेली बारामती इको सिस्टिम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा. लि ही भारतामधील दुसरी व महाराष्ट्र राज्यातील प्रथम कंपनी ठरली आहे. अभिमन्यू नागवडे या ध्येय वेड्या, जिद्दी व निरंतर कष्ट करणाऱ्या तरुणाने १० वर्षांपूर्वी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचा आज याप्रकारे एक विशाल वृक्ष झाला याचा मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.
निश्चितच हा प्रवास सोपा नव्हता, असंख्य अडचणी, आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु अभिमन्यूच्या अथक परिश्रमामुळे, नेतृत्व गुणामुळे, अभ्यासू वृत्तीमुळे, प्रामाणिक कष्टामुळे, व्यवसाय व्यवस्थापन कौशल्य, समाजाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असल्याने असंख्य लोकांच्या विशेषत: राजकीय, प्रशासकीय अधिकारी वर्ग,शेतकरी, कामगार वर्ग, हजारोच्या संख्येने असलेला मित्र परिवार यांच्या सहकार्याने आज आपल्या घरातील एक तरुण ही अभिमानास्पद कामगिरी करू शकला. व आपल्या गावाचं, समाजाचं नाव भारतभर पोहचवल.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
कंपनीबाबत बोलायचं झालं तर उरुळी कांचन परिसरामध्ये अत्याधुनिक असा बायोगॅस उत्पादन प्रकल्प कार्यान्वित असून, देशातील १५ पेक्षा जास्त राज्यांमध्ये व महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कंपनीचे सयंत्र बसवलेले आहेत. ही संख्या हजारोमध्ये असून सर्व समाधानी शेतकरी ग्राहक आहेत.
भारताच्या सुपर कम्पुटरचे जनक जेष्ठ शास्रज्ञ् डॉ विजय भटकर सर, IIT दिल्ली संस्था आदरणीय शरदचंन्द्र पवार साहेब,केंद्रिय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब केंद्र सरकारचे ऊर्जा मंत्रालय देशातील नामांकित NGO या सर्वांच्या मार्गदर्शनातून नवीन R&D डिपार्टमेंटसुद्धा कार्यान्वित आहे.
सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमाल विक्री केल्यास त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही व फायदा तर नाहीच नाही. शिवाय हा रासायनिक शेतमाल खाऊन खूप ग्राहकांना आजार आलेत यामुळे त्यांचे दवाखान्याचे खर्च खुप वाढले आहेत म्हणजे कोणीच सुखी नाही.
यावर आम्ही ‘बारामती इको सिस्टीम्स’ने शेतकऱ्यांसाठी बायोगॅसच्या माध्यमातून विद्राव्य खते तयार करून औषधे आणि खतांवरचा खर्च कमी केला आहे म्हणजे कुठलेही खत व औषधे शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत नाहीत आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल मात्र बाजारात न विकता थेट आमच्या अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातुन घरपोच पोहचवतो. यामधुनच आमचे सर्व शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत.
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
आम्ही आमच्या अभिनव फार्मर्स क्लबच्या सर्व शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस संयंत्र व स्लरी फिल्टर हे दोन्हीही बसवून दिले आहेत. बनवलेल्या आधुनिक बायोगॅस संयत्राला २ ते ३ गायींचे २५ ते ३० किलो शेण व तेवढेच पाणी मिश्रण करून टाकावे लागते.
यामधून शेतकऱ्यांचा १० ते १२ लोकांचा दोन्ही वेळेसचा सर्व स्वयंपाक होतो म्हणजे महिन्याला हजार ते २ हजार रुपयांच्या इंधंन (एल,पी,जी) खर्चात बचत होते तसेच प्रत्येक महिन्याला ४ ते ५ एकराला लागणारे १० ते १२ हजार रुपयांचे विद्राव्य खत या बायोगॅसच्या माध्यमातून मिळते.
यामुळे सेंद्रिय शेतीतून वर्षभरात वाचवलेल्या पैशातून आमच्या अभिनव फार्मर्स क्लबचे निर्व्यसनी शेतकरी वर्षभर कुटुंब जगवू शकता. म्हणून एक देशी गायी व बायोगॅसच्या स्लरीच्या माध्यमातुन सर्व भारतातील शेतकरी समृद्ध बनु शकतात.
ब्रॅण्डचे वेगळेपण :
- या संयंत्रास उर्जा मंत्रालय भारत सरकारची मान्यता.
- हे उत्पादन कमी जागेत कमी वेळेत बसवता येते
- जास्त काळ टिकाऊ उत्पादन
- या संयंत्रासाठी बांधकामाची आवश्यकता नाही.
- इतर बायोगॅसच्या तुलनेत हे संयंत्र जास्त जाड असल्यामुळे जास्त वर्ष टिकाऊ.
ब्रॅण्डचे नाव : बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नांलाॅजी प्रा.लि
ब्रॅण्डची स्थापना : २० एप्रिल २०१९
कंपनीचे डायरेक्टर्स :
अभिमन्यु रामदास नागवडे (MBA मार्केंटिंग व BBA फायनान्स)
संस्थापक अध्यक्ष, बारामती इको सिस्टिम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा. लि
गौरव गोरख जगताप (Bsc Agri)Bi
संचालक बारामती इको सिस्टिम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा. लि
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.