नव्या उद्योजकांसाठी बेसिक टिप्स

एक उद्योजक म्हणून उद्योगाचा श्रीगणेशा करणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सगळ्यात मोठी आणि अनेकांना येणारी अडचण ही आर्थिक असते. त्यामुळे नवोदित उद्योजकाने व्यवसायाचा विचार करत असताना कमीत कमी भांडवल लागेल अशा व्यवसायाने उद्योजकीय आयुष्यायची सुरुवात करावी.

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास योग्य व्यावसायिक आखणी नसेल, तर तुमच्या व्यवसायाचे भविष्य संकटात असू शकतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. याचसाठी नवीन उद्योग सुरू केलेल्यांसाठी या काही टिप्स :

नव्या उद्योजकांसाठी बेसिक टिप्स

१. तुमच्या हातात किती व कोणत्या प्रकारची साधनसंपत्ती आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. भांडवल ही सर्वात मोठी गोष्ट असते. कारण भांडवलावरच आपण कशाप्रकारचे, किती प्रकारचे आणि कोठे काम देऊ शकतो हे अवलंबून असते. म्हणजेच व्यवसायाची जागा, कामासाठी लागणारी माणसं, कंपनी नोंदणी इ. गोष्टी जोडलेल्या असतात.

२. विविध ठिकाणी व्यवसायासाठी मिळणाऱ्या कर्ज सुविधांचा लाभ घ्या. वेळ आणि पैशांचे योग्य नियोजन करा. जेणेकरून पैसे हातात पडल्यावर त्याचे योग्य पद्धतीत मूल्यमापन होईल.

३. स्वत:मधील गुण ओळखा.

४. स्वत:चा कृती आराखडा तयार करा. जेणेकरून प्रत्यक्ष कार्यवाही करताना त्याचा तुम्हाला फायदा होईल.

५. इतरांच्या आयडिया चोरू नका. नवं आणि आकर्षक काहीतरी आपल्या ग्राहकाला देणे ही आपली जबाबदारी समजा. दुसऱ्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळ द्यायला हवं.

६. आपल्या उत्पादन अथवा सेवेचं मार्केट समजून घ्या. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मार्केटमध्ये तुमचं उत्पादन हे ग्राहकांना आकर्षून घेण्यास यशस्वी ठरलं पाहिजे.

७. स्वत:च्या उत्पादनाचं टार्गेट कस्टमर ओळखून स्वत:च्या उत्पादनाची नियोजनबद्ध आणि परिणामकारक मार्केटिंग करा. त्याशिवाय बदलत्या मार्केटनुसार स्वत:ला updated ठेवा. आपल्या उत्पादन अथवा सेवेचा विचार करत असताना पहिल्या दिवसापासूनच त्याच्या ब्रॅण्डिंगचा विचार करायला सुरुवात करा.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?