Advertisement
उद्योगसंधी

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी Be a Partner of 'Smart Udyojak'

‘स्मार्ट उद्योजक’ हे उद्योग व उद्योजकता विकास या विषयासाठीचे मासिक एप्रिल २०१५ मध्ये सुरू झाले. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मासिकाचे वर्गणीदार विस्तारले आहेत. ‘स्मार्ट उद्योजक’चे प्रतिनिधी होऊन आपणही या प्रवासात सहभागी होऊ शकता.

या मोबदल्यात आपल्याला आकर्षक कमिशन तसेच उत्तम कामगिरी केल्यास बोनसही दिला जाईल. त्यामुळे आपली नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून आपण जोडव्यवसाय म्हणूनही हे काम करू शकता.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

वर्गणीदार करणे

‘स्मार्ट उद्योजक’ मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होते व वर्गणीदारांना रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवले जाते. रजिस्टर पोस्टाद्वारे खात्रीपूर्वक अंक पाच ते सहा दिवसात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोहोचू शकतात. या आधी सामान्य पोस्टाने अंक पाठवले जात होते, पण सामान्य पोस्टाने अंक वेळेत न पोहोचणे व गहाळ होणे हे प्रकार वाढल्यामुळे फेब्रुवारी २०१८ पासून सामान्य पोस्टाची वर्गणी बंद केली आहे. रजिस्टर पोस्टाच्या वर्गणीमध्ये अंकाची किंमत व रजिस्टर पोस्टाचा अधिभार समाविष्ट असतो.

छोटे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, वाचनालये, महाविद्यालयीन तरुण, शालेय विद्यार्थ्यांचे पालक, नोकरी करणारे, जोडधंद्यासाठी प्रयत्नरत असलेले, महिला बचत गट, इत्यादींसाठी हे मासिक उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना मासिकाचे वर्गणीदार करू शकता किंवा दर महिन्याचे अंक विकू शकता.

किरकोळ अंकांची विक्री

याशिवाय आपण सुटे अंकही विक्रीसाठी मागवू शकता. यांची किंमत प्रत्येकी ₹२० आहे. यातही आपल्याला आकर्षक कमिशन आहे. यासाठी आपल्याला अंकांची आगाऊ मागणी करावी लागेल.

जाहिराती मिळवणे

‘स्मार्ट उद्योजक’ मासिक तसेच वेब पोर्टलसाठी जाहिराती नोंदवू शकता. यात तुम्हाला चांगल्या उत्पन्नाची सर्वात जास्त सोय आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचणारे मासिक असल्यामुळे जाहिरातदारांना त्याचा सर्वात जास्त फायदा होतो. शिवाय आपण जाहिरात दरही सामान्यातल्या सामान्य व्यावसायिकाला परवडतील असे आहेत. अगदी दिवसा ₹४० मध्ये उद्योजक आपल्याकडे जाहिरात करू शकतील.

संपादकीय सहयोगसुद्धा करू शकता

आपल्याकडील स्थानिक उद्योग-व्यवसायविषय घडामोडी, उद्योजकांच्या मुलाखती, शेतीतील प्रयोग, शेती व व्यवसायातील यशोगाथा इत्यादी विषय तुम्ही ‘स्मार्ट उद्योजक’साठी लिहू शकता. मात्र याबाबतीत संपादकांशी पूर्वचर्चा झालेली असणे आवश्यक आहे व तुम्ही केलेले लेखन संपादकीय दृष्टिकोनातून योग्य असणे गरजेचे आहे.

कमिशनविषयक व इतर अधिक माहितीसाठी संपर्क  : ९७७३३०१२९२

नियम व अटी

  • प्रतिनिधीने प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे.
  • तुम्ही एकदा केलेल्या ग्राहकाचे कमिशन तुम्ही प्रतिनिधी असेपर्यंत कायम तुम्हाला मिळत राहील.
  • वर्गणीदारकडून घेतलेली वर्गणी तीन दिवसात ‘स्मार्ट उद्योजक’च्या बँक खात्यात जमा केली पाहिजे.
  • तुमचे कमिशन तुम्ही वर्गणी जमा केल्यानंतर पुढील तीन दिवसात तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जाईल.
  • तुम्हाला प्रतिनिधी होण्यासाठीचा अर्ज भरताना ₹१००० अनामत म्हणून भरावे लागतील. प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक वर्ष काम पूर्ण केले की १५% व्याजासाहित तुम्हाला ही अनामत परत मिळेल, परंतु वर्षभरात प्रतिनिधी म्हणून काम बंद केले तर अनामत रक्कम ५०% वजा करून एक वर्षानंतर परत मिळेल.
  • तुम्हाला दरमहा किमान ₹१००० चा बिझनेस आणणं गरजेच आहे. बिझनेस तितका होत नसेल तर कार्यालयाशी संपर्क करून तिथून मदत घेता येईल.

नियम व अटी मान्य असून प्रतिनिधी पदासाठी अर्ज करण्यासाठी PayUmoney वरील फॉर्म भरा व अनामत रक्कमेचे payment करा.

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: