कथा उद्योजकांच्या

ज्यांच्या जादुई हाताने निखळ सौंदर्य बहरते, अशा डॉ. सुनीता जैन

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक स्त्रीला वाटत असते की, आपण कायम सुंदर आणि सुशील दिसावे अथवा काही जणी ह्या आपले नैसर्गिक सौंदर्य जे जन्मत:च लाभलेले असते ते टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. ते खूप नाजूक गोष्टीप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करतात. कसे आहे ना की, सौंदर्य हे जन्मतःच लाभलेले एक वरदानच आहे. ते आपण अजून कसे आहे ते छान टिकेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असलेच पाहिजे.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनातून कोणालाही स्वतःकडे द्यायला असा वेळच उरत नाही. त्यामुळे प्रकृतीकडे आणि अर्थातच आपल्या चेहर्‍याकडेही दुर्लक्ष होते. तर आपण त्यासाठी जरूर वेळ दिला पाहिजे. सौंदर्य हे प्रकृती स्वास्थ्याच्या कुपीत अत्तर जपावे तसे जपण्यासारखे आहे, तर त्यासाठी तशा तितक्याच नाजूक कोमल हातांचीपण गरज असते. कारण जशी नाजूक पद्धतीने रांगोळीवर नक्षी काढावी तशीच अगदी कोमल चेहर्‍यावरून हात आणि बोटे फिरली पाहिजेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

डोंबिवलीत असेच यशस्वी आणि जादूई हात कार्यरत आहेत. त्यांचे नाव आहे सुनीता सलोनच्या उद्योजिका डॉक्टर सुनीता जैन. त्यांच्या हातांमध्ये कमालीची जादू आहे. सुनीता ह्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी; पण त्यांनी नोकरी करत असतानाच एक आवड म्हणून पार्लर कोर्सदेखील केले.

सुरुवातीच्या कालखंडात त्यांनी घरातच पार्लर सुरू केले; परंतु त्यांच्याकडे जशी ग्राहक संख्या वाढू लागली तसे त्यांनी स्वतःचे सलोन थाटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे सुमारे वीस वर्षांपूर्वी त्यांनी जय हिंद कॉलनी डोंबिवली पश्चिमेला सलोन सुरू केले.

यासोबत त्यांच्या हातगुणामुळे वाढत्या ग्राहकांच्या ओघामुळे त्यांनी गोपी मॉलमध्ये मोठ्या स्वरूपात सलून उघडले आहे. त्यांची याच क्षेत्रातील उत्तम कामगिरी पाहून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वविख्यात सुप्रसिद्ध असा ब्रँड लॉरिअल ह्यांनीसुद्धा सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

हेअर स्ट्रेटनिंगपासून ते बॉडी स्पा आणि मसाजपर्यंत आणि दिसण्यात संपूर्णतः परिवर्तन म्हणजे ज्याला मेकओव्हर म्हटले जाते अशा सर्व सौंदर्य सुविधा त्यांच्या पार्लर मध्ये उपलब्ध आहेत. त्यांचे सलोन अत्याधुनिक नानाविध पद्धतींनी नटलेले आहे. या क्षेत्रात उत्सुक असणार्‍या मुलींसाठी त्यांनी तिथेच बाजूला जागा घेऊन क्लासेससुद्धा सुरू केले आहेत. त्यातून त्या सर्वप्रकारचे पार्लरचे प्रशिक्षण देतात.

मुलींसाठी त्यांच्या सरकारमान्य कोर्ससाठी शैक्षणिक कर्जही सहज उपलब्ध आहे. त्यांच्याकडे आजवर शंभरहून अधिक विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेतले असून त्यातील साठ पेक्षा अधिक जणींनी स्वतःचे सलून सुरू केले आहे. सुनीताजी स्वत: प्रशिक्षण देतात हे वैशिष्ट्य आहे. आज ह्या सर्व स्वतःचे सलून सुरू केलेल्या विद्यार्थिनींचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो.

आता तर हल्ली गल्लोगल्ली सलून आहेत; परंतु यांच्या सलूनचे वैशिष्ट्य खास करून लहान मुली हेच आहे. त्यासाठी त्यांनी खास प्रिन्सेस स्पा तयार केला आहे. त्यांच्यासाठी रसायनविरहित फेशिअलही त्यांच्याकडे सहज उपलब्ध आहे. याचसोबत त्यांच्याकडे बारशापासून लग्नापर्यंत सर्व समारंभांसाठी महिलांसाठी सौंदर्याची खास सजावट करून मिळते.

त्यापुढे त्या सांगतात, ह्या व्यवसायात त्यांची सुकन्या तन्वीदेखील एम.बी.ए.चे शिक्षण घेऊन उतरली आहे. तिचीही गेल्या नऊ वर्षांपासून त्यांना खूप मदत लाभत आहे. त्यांची ही सुकन्या आता यशस्वीपणे त्यांची सर्व धुरा सांभाळत आहे. त्यांचा कारभार उत्तमरीत्या बघत आहे.

तन्वी याबद्दल बोलताना म्हणते की, मी जरी एम.बी.ए. केले असले तरीदेखील आईला बालपणापासून पाहात आल्याने तिलाच मदत करायचे ठरविले होते. आईबद्दल अभिमानाने ती त्यापुढे सांगते की, आमच्या घरात आमची आई हीच पहिली यशस्वी महिला उद्योजिका आहे. त्यांच्या ह्याच कार्याचा गुणगौरव सन्मान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते यशस्वी उद्योजिका म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सुनीताजी पुढे सांगतात की, इजिप्त, दुबई, अमेरिका, स्वित्झर्लंड येथील गिर्‍हाइक खास भारतात आल्यावर विशेष करून डोंबिवलीत आल्यावर सुनीता सलूनलाच पसंती देतात. तसेच नुकत्याच त्यांच्या जुन्या गिर्‍हाइक असलेल्या महिला ह्या सध्या ठाण्यात स्थायिक झाल्या असल्या तरी खास इथेच येतात. काही जणी फार पूर्वीपासून यायच्या. त्यांच्या मुलींसाठीही आता त्या इथेच येतात.

हे सांगताना सुनीताजी याचे सारे श्रेय पतींना तसेच ‘सुनिता सलून’च्या टीमला देतात. खास लोकाग्रहास्तव त्यांनी आता डोंबिवली पूर्वेलासुद्धा नवे दालन सुरू केले आहे. भविष्यात अजून एक नवे दालन खास स्त्री-पुरुषांसाठी मागणीनुसार सुरू करण्याचे त्यांनी योजिले आहे.

शेवटी त्या या क्षेत्रात येऊ घातलेल्या होतकरू तरुणींसाठी मार्गदर्शनपर बोल म्हणून सांगतात की, हा व्यवसाय किंवा हे क्षेत्र जर मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त आर्थिक फायद्याकडे घेऊन जाते, तर अशा या असामान्य उद्योजिकेस धडाडीने कार्य करणार्‍या, कार्यमग्न, कार्यशील व्यक्तिमत्त्वाची गरुडभरारी ही कालानुरूप अधिकाधिक उंचच उंच झेप घेत जावो, ह्याच त्यांना सदिच्छा.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.



Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!