उद्योगसंधी

वेगाने वाढणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीतील उद्योगसंधी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


भारताची लोकसंख्या १३० कोटी असून यातील ४८ टक्के लोकसंख्या २५ वयोगटाच्या खाली आहे. या वयोगटातील व्यक्ती आपल्या सुंदरतेवर अधिक लक्ष देतात. आज प्रत्येक महिला आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेली आहेत. यामुळेच ब्युटीपार्लर या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

भारतात ब्युटी इंडस्ट्री या व्यवसायात दरवर्षी तीस टक्क्यांनी वाढ होत आहे. संपूर्ण जगात भारत या व्यवसायात दुसर्‍या क्रमांकावर आहे. आजही अनेक ब्युटीशियन भारतात प्रशिक्षण घेऊन विदेशात यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. भारतातील प्रशिक्षित ब्युटीशियनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

ब्युटी इंडस्ट्री पुढील पाच वर्षात तिप्पट होईल असा अंदाज एफआयसीसीआय या संस्थेने वर्तवला आहे. ब्युटीशियन व्यवसायातले आधुनिक तंत्रज्ञान युवतींना आत्मसात व्हावे म्हणून आज सरकारी तसेच खासगी संस्थेत विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

शासकीय आयटीआयमध्ये इयत्ता दहावीनंतर बेसिक कॉस्मॅटोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. खासगी संस्थेत तीन महिन्यांपासून ते चार वर्षांपर्यंतचे विविध अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत.

पर्ल अकादमी, शहनाझ हुसेन ब्युटी अकादमी, लॅक्मे अकादमी, व्हीएलसीसी, जुडी ब्युटी अकादमी, आयएसएएस इंटरनेशनल ब्युटी स्कूल आदी संस्था ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देतात. या अभ्यासक्रमांतर्गत फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युअर, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग, ब्लिचिंग, मेकअप, स्क्रीन ट्रीटमेंट आदी शिकवले जाते.

आधुनिक हेअर केअरमध्ये हेअर कटिंग, हेअरस्टाईल, हेअर कलरिंग, हेअर लाईटनिंग, हेअर स्पा, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कर्लिंग, हेअर प्रेसिंग असे प्रकार आहेत, तर विशेष फेशियल, बायोलीफ्ट फेशियल, पॅसाफिल, अ‍ॅक्ने, ओलेजन, अरोमा थेरपी, विधुत प्रवाह आणि गोल्ड फेशियल याशिवाय मेनिक्युअरमध्ये रेग्युलर, फ्रेंच, स्पा, पॅराफिन, हॉट स्टोन, लक्झरी, ब्राझिलियन, युरोपियन, हॉट ऑईल व इलेक्ट्रीक मेनिक्युअर असते. मेकअपमध्ये डे, नाईट, करेकटीव्ह, ब्राईडल मेकअप आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

विविध सौंदर्यप्रसाधने व त्यांचे उपयोग, मेकअपचे प्रकार, महत्त्व, त्यासाठी लागणारी साधने, उपकरणे, साहित्य जसे मेकअप ब्रश, फाऊंडेशन ब्रश, कन्सिलर, ब्लशर, आय लायनर, स्मजर, लिप ब्रश, क्लिन्झर, टोनर, मॉईश्चरायझर, कॉम्पट पावडर, काजळ, मस्कारा, आई ब्रो पेन्सिल, लिप लायनर, लिपस्टिक, लिप ग्लॉस, आय शॅडो आदींचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे व्यायाम, संतुलित आहार, शरीर व वजन व्यवस्थापन, आयुर्वेद आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

ब्युटी क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सौंदर्य उत्पादक, ब्युटीशियन, हेल्थ स्पा, सौंदर्य सल्लागार, सौंदर्य उपचारतज्ज्ञ, मेकअप आर्टिस्ट, इलेक्ट्रोलॉजिस्ट, जेल टेक्निशियन, मसाज थेरीपीस्ट, स्टाईल हेअर ड्रेसर, मेनिक्युअरिस्ट, पेडीक्युअरिस्ट, अरोमा थेरपीस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सलून व्यवस्थापन, ब्युटी प्रशिक्षिका आदी अनेक प्रकारचे व्यवसाय तसेच नोकरीचे दरवाजे उघडे होतात.

ब्युटीशियनचे काम सौंदर्य खुलवणे हे आहे. ब्युटीपार्लरसाठी स्वत:चे दुकान असल्यास पन्नास हजार रुपयांत ब्युटीपार्लर सुरू करू शकतो. या व्यवसायातून दहा ते पंधरा हजार रुपये प्रती महिना कमवू शकतो.

दोन ते तीन लाख रुपये भांडवलातून ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केल्यास तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, व्यवसायाची आवड आदींच्या जोरावर या व्यवसायातून त्यातून वीस ते नव्वद हजार रुपये प्रती महिना कमाई होऊ शकते. आज गावोगावी अन गल्लोगल्ली ब्युटी पार्लर सुरू झालेले आपण पाहतो, असे असताना या संधीचे सोने करायलाच हवे, नाही का?

– मधुकर घायदार
9623237135


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!