Advertisement
उद्योगसंधी

स्वत: उत्पादक होणे

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

आपण आधीच्या लेखात दुसऱ्या उद्योजकांची उत्पादने विकून आपले उत्पन्न कसे मिळवावे ते पहिले. आता ती किंवा तशी उत्पादने तुम्ही बनवू शकत असाल व तुमची खाली सांगितल्याप्रमाणे तयारी असेल, तर तुम्ही स्वतः एकट्याने, कुटुंबासह किंवा भागीदारीत अशा व्यवसायाला सुरुवात करू शकता.

✅ अशा तऱ्हेच्या उत्पादन व्यवसायाला सुरुवात करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा :

Advertisement

• तुमची आवड, ज्ञान, माहिती, अनुभव
• त्या उत्पादनासाठी ग्राहक, मागणी व त्यातील स्पर्धा
• जागा, भांडवल, यंत्रे, वीज, गॅस, मनुष्यबळाची आवश्यकता
• उत्पादन प्रक्रिया,
• त्यातील वस्तू, इंधन, मेहेनत, वाहतूक खर्च, भाडे वगैरेचा हिशोब
• सरकारी परवानग्या
• दर्जा, गुणवत्ता
• विक्री, वितरणाची व्यवस्था
• पुढील ३-६ महिन्याचे जमा-खर्च अंदाजपत्रक
• आर्थिक किंवा इतर भागीदाराची आवश्यकता
• मिळणारा नफा, परतावा

जमा-खर्चाचे अंदाजपत्रक बनवण्यात चूक झाली, तर नुकसान होऊ शकते म्हणून पूर्ण अभ्यास, गणित आणि हिशोब कागदावर बरोबर जमल्यावरच पुढे जावे.

घरातील व्यक्ती आणि मित्र किंवा ह्या व्यवसायातील माहितगार चार्टर्ड अकाउंटंटशी बोलून तुम्ही तुमचा व्यवसाय आराखडा निश्चित करावा.

✅ खालील उदाहरणावरून आपल्याला कोणते उत्पादन हाती घ्यावे याच्या कल्पना सुचतील :

• रोजच्या जेवणाचे डबे
• टिकाऊ पदार्थ लाडू, चकली, चटणी, लोणचे असे पदार्थ
• चॉकलेट, केक
• छोटे कपडे शिवून बनवणे
• सणावारी लागणाऱ्या वस्तू
• बॅग, पर्सेस, सौंदर्य प्रसाधने, पिशव्या, पेपर बॅग
• फिनेल, सॅनिटायझर, साबण वगैरे रासायनिक उत्पादने
• उदबत्ती, परफ्यूम, अत्तरे वगैरे
• आयुर्वेदिक औषधे, पावडरी, टॉनिक वगैरे
• मुखवास, सुपारी, औषधी किंवा केसाची तेले
• कॉम्प्युटर टायपिंग, प्रिंटिंग, स्कॅनिंग

✅ ह्या विषयावर बरीच माहिती, माहितीतील उद्योजक आणि इंटरनेटवर मिळू शकते. गरज आहे ती तुमच्या अढळ उद्दिष्टांची, सखोल अभ्यास, विश्लेषण, निर्णय क्षमता आणि कृतीची! विचार करा, कृती करा.

– सतीश रानडे

(काही प्रश्न, शंका, अभिप्राय, असेल तर ते लिहून 9820344725 ह्या नंबरवर तुमचं नाव आणि शहराच नाव यासह व्हॉटसअप चॅट पाठवा.)

या सदरातील इतर सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!