ब्रँड चे नाव : Belote’s Chicken (Indian owned, Indian grown)
ब्रँड ची स्थापना : २६/१/२०१८
ब्रँड कशाचा आहे : देशी चिकन आणि अंडी
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)आज आपण मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांची रुग्णसंख्या किती तरी मोठ्या प्रमाणात वाढलेली बघतोय. प्रत्येक घराला यापैकी एका तरी आजाराने ग्रासलं आहे. वैद्यकशास्त्रात या आजारांना जीवनशैलीशी संबंधित आजार (Lifestyle deceases) म्हटलं जातं.
जीवनशैलीशी संबंधित आजारांचं एक प्रमुख कारण आपला आहार हे आहे. आज प्रत्येक मांसाहारी व्यक्तीच्या आहारात ब्रॉयलर किंवा इंग्लिश ब्रीडच्या कोंबडीच मटण व अंडी ही असतातच. Lifestyle deaseses होण्यात या कोंबडीचा व अंड्यांचा मोठा वाटा आहे.
ही गोष्ट लक्षात आल्यामुळे यावर तोडगा वाढण्यासाठी आम्ही फक्त देशी कोंबड्यांचे मटण व अंडी विक्री करणाऱ्या दुकानाची सुरुवात केली. आमच्या दुकानात तुम्हाला ब्रॉयलर किंवा इंग्लिश ब्रीडच्या कोंबड्या व अंडी मिळणार नाहीत. अशाप्रकारचा हा देशातला आतापर्यंतचा पहिला व एकमेव प्रयोग आहे.

आमच्या बेलोटे आडनावावरून दुकानाचे नाव ‘बेलोटेज चिकन’ हे ठेवण्यात आले. याला दुसरं कोणतं नाव असूच शकत नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर भारतभर असा वेगळा प्रयोग बेलोटेंशिवाय दुसरा कुणीही केला नाही.
चिकन शॉप आणि ब्रॉइलर हे समीकरण आहे, परंतु हे समीकरण मोडीत काढून, सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेऊन प्रवाहात उडी न मारता एक आरोग्यदायी अशी वेगळी वाट निवडली. सर्व जग पैशांच्या मागे धावत असताना आपण लोकांच्या आरोग्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज नवी मुंबईतच नाही, तर मुंबईवरून हे आगळे वेगळे दुकान बघायला आणि आपल्या आवडीप्रमाणे चिकन खरेदी करायला लोकं कामोठे येथे येतात.
येथे आपल्याला आमच्या फार्मवर वाढलेल्या गावरान कोंबड्या, नैसर्गिक वातावरणात वाढवलेले कोंबडे मिळते. त्याचप्रमाणे उच्च प्रोटीनयुक्त अशी देशी अंडी मिळतात.
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
देशी कोंबडीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व :
उच्च-गुणवत्तेच्या प्रथिने : देशी कोंबडी ही उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी तसेच शरीराच्या एकूण कार्यासाठी ही प्रथिने आवश्यक आहेत.
कमी चरबी : ब्रॉयलर किंवा इंग्लिश ब्रीडच्या तुलनेत देसी चिकनमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. ज्यांना आहारात फॅट कमी घ्यायचे आहे व वजन नियंत्रणात ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी देशी चिकन हा आरोग्यदायी पर्याय आहे.
अधिक पोषक : देसी कोंबडी अनेकदा फ्री-रेंज किंवा सेमी-फ्री-रेंज परिस्थितीत वाढवली जाते, ज्यामुळे त्यांना विविध खाद्यपदार्थांसाठी चारा मिळू शकतो. याचा परिणाम म्हणजे तिचे मटण व अंडी ही जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात.
Antibiotics किंवा Hormones मुक्त : आम्ही कुक्कुटपालनात Antibiotics किंवा Hormones चा वापर करत नाही. त्यामुळे प्रतिजैविकांच्या प्रतिकाराचा धोका कमी होतो आणि ग्राहकांना अनावश्यक रसायनांच्या संपर्कात येणार नाही याची खात्री होते.
कंपनीचे मालक : शिवाजी नामदेव बेलोटे
संपर्क : 9619428894
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.