संगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर

व्यवसाय छोटा-मोठा कसाही असला तरी त्या व्यवसायाचा भूतकाळ कधी डिलीट होऊ शकत नाही. म्हणूनच तो कधी कधी डोळ्यासमोर येतो आणि त्याची कथा बनते. आमच्या समकालीन कमर्शिअल आर्टिस्टचा भूतकाळ तर खूपच इंटरेस्टिंग होता. तो आठवताना तर आपण सध्या कुठे आहोत हेच विसरून जातो.

आज एखादा जुना मित्र भेटतो आणि बसून चर्चा रंगते तेंव्हा सारी उजळणी होते. स्केचिंग, रफ डिझाईन डमीमधील डबल आय ओ, टाईपसेटिंग ऑर्डर पुण्याला, रोटरिंग पेनने आर्ट पेपरवर फायनल आर्टवर्क, डायरेक्ट फोटोप्रिंटवर रिटचिंग, मॅटर कटिंग पेस्टिंग, रेडी आर्टवर्कवर ट्रेसिंग, त्यावर कलर्स सूचना, शेवटी कलर सेपरेशनसाठी थेट मुंबईला. तिथेच चांगल्या प्रेसमध्ये प्रिंटिंग करून परत कोल्हापूर.

फोटोग्राफीचंही तसंच, कॅमेऱ्यामध्ये रोल घाला, फोटो काढा, रोल धुवा, निगेटिव्हमधून फोटो निवडा, प्रिंट काढा, स्कॅनिंग करा आणि शेवटी तो डिझाईनमध्ये वापरा. किती उठाठेव, उपदव्याप, तारांबळ आणि कष्ट. पण ती मजा काही वेगळीच होती. हाताच्या बोटावर मोजण्याइतके आर्टिस्ट आणि फोटोग्राफर. डिझाईनसाठी कस्टमर वेटिंगवर असायचे. कारण डिझाईन / आर्टवर्क बनवायला तेंव्हा खूप वेळ लागायचा.

पुढे १९९४-९५ ला कॉम्प्युटरचे वारे वाहू लागले. डिझाईन कॉम्प्युटरवर होऊ शकते आणि तेही कमी वेळात हे कानावर येऊ लागले. कोरल ड्रॉ, फोटोशॉप अशा काही सॉफ्टवेअर्सची नावे कळू लागली. कॉम्प्युटरवर केलेली डिझाईन्स पाहण्यात येऊ लागली. तसे आपणही आता डिझाईनसाठी कॉम्प्युटर घेतलाच पाहिजे असे प्रकर्षाने जाणवू लागले.

कॉम्प्युटरमधील ओ कि ठो माहीत नाही, पण काळाची गरज ओळखून त्या वेळचा अॅडव्हान्स (486, 8MB Ram, 256 MB हार्डडिस्क किंमत 95 हजार.) कॉम्प्युटर घेतला, पण कॉम्प्युटर घेण्यापासून ते त्यावर पहिले डिझाईन करेपर्यंतचा प्रवास खूपच खडतर आणि मन:स्ताप देणारा ठरला. काही असो पण शिर्केंचे १९९६ चे श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेचे डिझाईन मी कॉम्प्युटरवर बनवले.

‘महालक्ष्मी’ दिनदर्शिका हे कॉम्प्युटरवरील माझे पहिले डिझाईन. कॉम्प्युटरवर डिझाईन करणे म्हणजे त्यावेळी अडथळ्यांची शर्यत होती. कॉम्प्युटर शिकण्याच्या नादात खूप डोकेदुखी आणि नुकसानही झाले, तरीही नाद सोडला नाही. प्रमोशनल प्रिंटिंग, प्रिंट-पॅकॅजिंग, प्रिंट-पब्लिकेशन, डिजिटल प्रिंटिंगसाठी जरा कुठे डिजिटल डिझाईनमध्ये स्थिरस्थावर होतोय न होतोय तोच १९९८ मध्ये इंटरनेटचे आगमन झाले आणि वेब डिझाईनशी झुंज सुरू झाली.

वेबसाईट डिझाईन ही उद्योगाची नवी गरज निर्माण झाली. एक्झिस्टिंग कस्टमर टिकवण्यासाठी पुन्हा वेब डिझाईनचा अभ्यास सुरू झाला. त्यात गुगल, नंतर फेसबुक, युट्युब, सोशल नेटवर्किंग, ऑनलाईन अॅडव्हर्टायझिंग, डिजिटल मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग पाय पसरू लागले.

तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलत होते की दर दोन-तीन वर्षांनी जुने कॉम्प्युटर फेकून नवे घ्यावे लागत होते. सॉफ्टवेअर्सची नवी व्हर्जन्स येत होती. नवीन नवीन शिकण्यातच बराच वेळ जात होता. पण टिकण्यासाठी शिकण्याची गरज होती. म्हणून शिकत गेलो. पुढे व्हाटसॲप आले आणि मेसेजिंगचे नवे पर्व सुरू झाले. इंटरनेट पूर्वी महाग होते, पण आज-काल ते स्वस्त झाल्याने जो तो इंटरनेट वापरू लागला.

सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर सुरू झाल्याने एका ठिकाणी बसून कामे होऊ लागली. इंटरनेटची आर्टिस्टवर तर खूप मोठी कृपा झाली. धावाधाव संपली. कॉम्प्युटरमुळे कामात परफेक्शन आले. इंटरनेट जेंव्हापासून मोबाईलवर आले तेंव्हापासून तर उद्योगाचे सारे चित्रच पालटले. गोष्ट खूप मोठी आहे, पण भुतकाळात जास्त वेळ रमणे बरे नाही.

बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे प्रिंट आणि वे॒ब डिझाईनमधील जी स्किल्स शिकायला मला कित्येक वर्षे लागली. त्याच ग्राफिक डिझाईन स्किल्सवर आधारित मी नवीन अभ्यासक्रम तयार केला. तोच ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ मराठी कोर्स.

यामध्ये प्रिंट आणि वेब मिडियामधील ग्राफिक डिझाईन स्किल्स विद्यार्थी फक्त एकाच वर्षात शिकतो. थिअरी शून्य टक्के आणि १०० टक्के प्रॅक्टिकल असलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स पूर्ण करून विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. ग्राफिक डिझाईनविषयक शैक्षणिक लेख मी ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत असतो.

भागवत पवार

जन्म दिनांक : १ जुलै, १९६५
जन्म ठिकाण : सांगली
ई-मेल : gd@artekdigital.in
भ्रमणध्वनी : ९९७५७६९२९९

विद्यमान जिल्हा : पुणे
शिक्षण : B.A., A.T.D., G.D. Art
कंपनीचे नाव : आर्टेक डिजिटल
उत्पादने/सेवा : ग्राफिक डिजाईन ट्रेंनिंग अँड सर्व्हिसेस

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?