Advertisement
बिझनेस लिजेंड्स

प्रवासातील अडचणींमुळे सापडला प्रवास करण्याचा सोपा व सुटसुटीत मार्ग

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


एक तरुण बेंगलुरूहून बांदीपूरला जात होता. तसं तो कामानिमित्त बरेचदा कुठे कुठे जात असे. बांदीपूरला जाण्यासाठी त्याने एक गाडी भाड्याने ठरवली आणि निघाला. तासाभराचा प्रवास झाल्यावर मात्र गाडीच्या ड्रायव्हरने अचानकच अधिक पैशाची मागणी केली. त्या तरुणाने ड्रायव्हरशी बोलून त्याला ठरलेल्या रक्कमेत बांदीपूरला सोडण्यास सांगितले, पण तो ड्रायव्हर अधिक पैशाची मागणी करतच राहिला.

त्याने ड्रायव्हरला अनेक प्रकारे समजावून बघितलं पण व्यर्थ. त्याच्याकडे मोजकेच पैसे असल्यामुळे ड्रायव्हरने त्याला वाटेतच उतरवलं आणि त्या तरुणाला उरलेला प्रवास कसाबसा करावा लागला.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

असाच अनुभव बऱ्याच इतर प्रवाशांनादेखील आला होता हे त्याला नंतर समजलं. वारंवार सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाने एका नव्या कल्पनेला जन्म दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या प्रसंगाच्या फलस्वरूप त्या तरुणाने एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी स्थापन केली. वाईटातून काही तरी चांगलं घडू शकतं ते असं.

‘ओला’, आज जवळजवळ प्रत्येकाच्या ओठावर जे नाव आहे ती एक भारतीय कंपनी आहे आणि तिचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. ओला हे नाव स्पॅनिश शब्द ‘होला’वरून घेतले गेले आहे ज्याचा अर्थ आहे ‘हॅलो’.

भाविश अग्रवाल हे ‘ओला’ कंपनीचे संस्थापक आहेत आणि अंकित भाटी हे सहसंस्थापक. त्यांनी २०१० मध्ये मुंबईत ‘ओला’ कॅब्सची स्थापना केली. २००८ मध्ये भाविशने आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. केल्यानंतर बेंगलुरू येथे मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये दोन वर्षे काम केलं.

या कंपनीत सहसंस्थापक अंकित भाटी नोव्हेंबर २०१० मध्ये सामील झाले. ते तंत्रज्ञान अधिकारी आहेत आणि तांत्रिक बाबी हाताळतात. ते आयआयटीमधून मेकॅनिकल इंजिनीअर आणि एम. टेक पदवीधारक आहेत. भाविश अग्रवाल अगदी लहान वयात भारताचे सर्वात तरुण अब्जाधीश बनले.

मार्च २०१५ मध्ये ‘ओला’ कॅब्सने बंगळुरूमधील टॅक्सी सेवा ‘टॅक्सी फाॅर शुअर’ विकत घेतली. नंतर ओलाने ‘जिओ टॅग’ ही ट्रिप-प्लॅनिंग ॲप्लिकेशन कंपनी एका अज्ञात रकमेत विकत घेतली. एप्रिल २०१८ मध्ये ‘ओला’ कॅब्सने सार्वजनिक वाहतूक टिकेटिंग ॲप ‘रिडलर’ विकत घेतले. नंतर ऑगस्ट २०१८ मध्ये ओला कॅब्सने स्कूटर रेंट स्टार्टअप ‘व्होगो’ या कंपनीला वित्तपुरवठा केला आणि पुन्हा डिसेंबरमध्ये आणखी १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवणूक केली.

२०१९ मध्ये ओला कॅब्सने लंडनमध्ये आपली टॅक्सी सेवा सुरू केली आणि १० हजारहून अधिक ड्रायव्हर्सनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले. फेब्रुवारी २०२० मध्ये २५ हजारपेक्षा जास्त ड्रायव्हर्सची नोंदणी करून सेवा सुरू केली.

‘ओला’ कॅब्स विविध सेवा प्रदान करतात ज्यामध्ये स्वस्त तसेच आलिशान सेवादेखील उपलब्ध आहेत. मोबाईल ॲपद्वारे आणि त्यांच्या वेबसाइटद्वारे टॅक्सी आरक्षित केल्या जातात. रोख आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने पेमेंट स्वीकारले जाते. दररोज सरासरी दीड लाखांपेक्षा जास्त बुकिंग मिळवत कंपनीने २५० शहरांमध्ये १.५ दशलक्षाहून अधिक ड्रायव्हर्सचे नेटवर्क तयार केले आहे. ‘ओला’ कॅब्सने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ₹९० कोटी नफ्याची नोंद केली.

नोव्हेंबर २०१४ मध्ये ‘ओला’ कॅब्सने बेंगलुरूमध्ये चाचणी तत्त्वावर ऑटो रिक्षांना आपल्या कंपनीद्वारे बुकिंग घेण्यास सुरुवात केली. चाचणी टप्प्यानंतर ‘ओला’ ऑटोने डिसेंबरपासून दिल्ली, पुणे, चेन्नई आणि हैदराबादसारख्या इतर शहरांमध्ये विस्तार केला.

‘ओला’ने मार्च २०१५ मध्ये ओला कॅफे या नावाने फूड डिस्ट्रिब्यूशन क्षेत्रात प्रवेश केला, परंतु मार्च २०१६ मध्ये ही सेवा बंद केली. टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायाशिवाय इतर क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि वाढत्या ऑनलाईन फूड ऑर्डरिंग व्यवसायाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने ‘ओला’ने डिसेंबर २०१७ मध्ये डबघाईस आलेली फूडटेक कंपनी ‘फूडपांडा इंडिया’ ताब्यात घेतली. ओला फूड्स सहा शहरांमध्ये ५० पेक्षा जास्त क्लाउड किचन चालवते, ज्यात ‘खिचडी एक्सपरिमेंट’ नावाचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये ओलाने आपले मोबाईल पेमेंट आणि वॉलेट उत्पादन ‘ओला मनी’ लाँच केले. ओला मनी ही कंपनी ओला फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मालकीची आहे, जिच्याकडे विमा, क्रेडिट कार्ड आणि वाहन कर्ज यासारखी आर्थिक उत्पादनेदेखील आहेत.

‘ओला’ने आगामी इलेक्ट्रिक वाहननिर्मिती सुविधा तयार करण्यासाठी सिमेन्ससोबत भागीदारी केली आहे. ही सुविधा उभारण्यासाठी सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी तामिळनाडू सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.

ही फॅक्टरीची प्रारंभिक क्षमता वर्षाला २ दशलक्ष युनिट्स असेल. ती जगातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादन सुविधा बनेल आणि सुमारे १० हजार नोकऱ्या निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. ही फॅक्टरी भारतातील आणि संपूर्ण युरोप, यूके, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमधील ग्राहकांसाठी ओलाचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करेल.

– चंद्रशेखर मराठे

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!