Advertisement
उद्योजक Profiles कथा उद्योजकांच्या

१७ वर्षे नोकरी केल्यानंतर योजनाबद्धरीत्या सुरू केला स्वतःचा व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मी भूषण पाटील. माझं बालपण मुंबईमध्येच झाल. मी लहानाचा मोठा इथेच झालो. माझं शिक्षण पहिली ते सातवी महापालिकेच्या शाळेत आणि नंतर दहावीपर्यंत दादरच्या एस. व्ही. नाबर गुरुजी शाळेत झालं. बारावीपर्यंतचं शिक्षण गिरगावात एसजीएम कॉलेजमध्ये झालं.

तेरावीपासून अभ्यास करायची तशी इच्छा झाली नाही, कारण घरी आईवडील दोघेपण रिटायर्ड झाले २००३ ला त्यांना VRS घ्यावी लागली. तेव्हा मी ठरवलं घरच्या परिस्थितीवर मात करायची असेल तर मला लवकर नोकरी करावी लागेल. तेरावी नापास झालो जेटकिंगमधून कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स केला.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

पुढे नोकरी करत शिकत गेलो १५ वर्ष नोकरी केली चांगला पैसा कमवला खूप काही शिकलो. माझी पगाराची सुरुवात पंधराशे रुपयांनी झाली आणि २०१९ ला जेव्हा नोकरी सोडली तेव्हा माझा पगार ८५ हजार रुपये होता, पण कामामध्ये मन रमत नव्हतं. स्वत:साठी काही तरी करायचं आहे.

या एका उद्देशाने व्यवसाय करायचा निर्णय घेतला. नोकरी करत असताना नेहमी एकच प्रश्न पडायचा, जेवढा वेळ मी नोकरीसाठी देतोय तेवढाच वेळ जर मी माझ्या व्यवसायाला दिला तर मी खूप काही करू शकेन.

मी नोकरी सोडण्यापूर्वी माझ्या मित्रासोबत त्यांच्या Internet Business मध्ये काम चालू केलं होतं. मला माहीत होतं स्वत:चा व्यवसाय व्यवस्थित चालायला वेळ लागेल, तोपर्यंत आर्थिक अडचण येऊ नये यासाठी मी ‘पथिक’ या संस्थेशी जोडलो गेलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण प्लॅन करून व्यवसायात उतरलो. पुढची दोन वर्ष पुरेल इतका फंड मी reserve केला आणि सुरुवात केली.

गेली १७ वर्ष आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. जेव्हा माझ्या लक्षात आल सगळे व्हेंडर दिलेल्या requirement पूर्ण करतात आणि बिझनेस मिळवतात. त्याव्यतिरिक्त client च्या अजूनही काही समस्या असू शकतात का? त्या कशा समजून घेऊ शकतो आणि त्यांना कस चांगल्या सेवा देऊ शकतो? एवढ्या खोलवर जाऊन कुठला व्हेंडर विचार करत नाही. ही मार्केटमधली गॅप मला जाणवली.

माझ्यासारखा अनुभवी इंजीनिअर एखाद्या छोट्या कंपनीला परवडण्यासारखा नाही, हे मी ओळखलं. म्हणूनच मी माझी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि BITCONSERV IT CONSULTANCY & SERVICES या नावाने स्वत:ची आयटी फर्म सुरू केली.

माझा मूळ उद्देश हा आहे की प्रत्येक लहान मोठ्या कंपनीच्या समस्या समजून घेणे तसेच त्यांचा टेक्निकल analysis करणे. त्यांना चांगला सोल्युशन देणे, जेणे करून त्यांना त्या गोष्टीचा short term आणि log term मध्ये जास्त फायदा होईल आणि त्यांची उत्पादकता वाढेल. त्याचबरोबर त्यांना माझासारख्या इंजीनिअर payroll वर न ठेवता तज्ज्ञ सल्लासुद्धा मिळेल.

याचबरोबर एकाच वेळी अशा अनेक कंपन्यांसाठी माझ्या सेवा मला पोहचवता येतील. लहानमोठ्या कंपन्यांमध्ये बेसिक अडचणी असतात. डेस्कटॉप, लॅपटॉप बरोबर चालत नाही, इंटरनेट स्पीड कमी किंवा बंद होणे, व्हायरस प्रॉब्लेम, नेटवर्क, बॅकअप, सॉफ्टवेअर, डेटा लॉस, अशा एक ना अनेक समस्या रोजच्या रोज चालू असतात.

एकूणच त्यांचा आयटी सेटअप, त्यांचा infrastructure यावर प्रॉपर कोणी काम करत नाही त्यामुळेच त्यांना या साऱ्या समस्या येत असतात. ते यावर तात्पुरत्या उपाययोजना करून घेतात. परत मग तेच चक्र चालू राहतं. यामुळे होत असं की जे काम खूप महत्त्वाचं आहे नेमका अशाच वेळी लॅपटॉप चालत नाही किंवा इंटरनेट, कधी व्हायरस, कधी सॉफ्टवेअर कधी अजून काही अशा अनेक समस्या येत असतात. त्यामुळे महत्त्वाचा वेळ खूप वाया जातो.

ग्राहकही नाराज होतात आणि मोठं नुकसान होऊ शकतं. हातातल्या डील रद्द होतात, क्लायंटचे ई-मेल येतात, दिलेल्या वेळेत काम पूर्ण होत नाही, चांगले फीडबॅकसुद्धा चांगले मिळत नाहीत. या सगळ्यांची मुख्य करणे शोधण्यासाठी तुमच्या ऑफिसचं टेक्निकल analysis करणं खूप आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या सेटअपमधील मूळ त्रुटी आम्हाला शोधता येतील आणि त्यावर तुम्हाला चांगले उपाय सुचवता येतील.

मित्रांनो, त्याचसाठी आम्ही तुमच्या समोर माझं प्रॉडक्ट घेऊन आलो आहे. BITCONSERV Complete IT Solutions. तुमच्या गरजा ओळखून तुम्हाला खूप effective आणि long term solution देणे हेच आमचे पुढे काम असणार आहे. यातून तुम्हाला रोजच्या रोज येणाऱ्या सर्व अडचणी सोडवल्या जातील. तुमच्या कामाची उत्पादकता वाढेल आणि त्याचबरोबर कंपनीच्या नफ्यात वाढ होईल. या सेवेसाठी कोणी ईच्छुक असेल तर whatsapp किंवा फोने करून अपॉइंटमेंट घेऊ शकता.

व्यवसाय सुरू करून पाच महिन्यांनंतर कोरोनामुळे सगळं ठप्प झालं. त्या काळात इंटरनेटच्या कामाचे पैसे येत होते, पण आयटीचं काहीच काम येत नव्हतं. ऑक्टोबर २०२१ पासून परत कामाची सुरुवात झाली. स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. जे आपण करतोय त्यात यश नक्की मिळणार त्यासाठी ज्वलंत इच्छाशक्ती हवी. मी जी सेवा देतोय ती कशी चांगली आहे हे मला माझ्या client ला मला पटवून देता आला पाहिजे.

तेवढं स्वत:चं Knowledge Update करत राहणं, ग्राहकांसोबत विश्वास निर्माण करणं, Client चा Business साठी Value add करणं, पुढचा ५ वर्षाचा बिझनेस प्लॅन रेडी करून त्यावर काम करणं आणि चांगली टीम उभी करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाटून देणं या गोष्टी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत.

भूषण अविनाश पाटील

कंपनीचे नाव : BITCONSERV
आपला हुद्दा : proprietor
व्यवसायातील अनुभव : 2
तुमची उत्पादने व सेवा : Computer IT Services & Support.
व्यवसायाचा पत्ता : 14, Baneshwar Sadan Sasmira Marg, Worli Mumbai – 400030.
विद्यमान जिल्हा : मुंबई

ई-मेल : bhushanpatil.01@gmail.com
मोबाइल : 9930444175
संकेतस्थळ : www.bitconserv.com
Facebook Account URL : https://www.facebook.com/bhushan.patil.7798/
फेसबुक बिझनेस पेज URL
LinkedIn Account URL : https://www.linkedin.com/in/bhushan-patil-3b73a215

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

  • Computer IT Services & Support.
  • We are dealing into Computer AMC & IT Engineer Contracts (Desktop & Laptop)
  • We are also fulfil day to day IT related requirements, service, support & procurement.
  • I am giving IT Consultation, Freelance Services also.

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!