ग्राहकाभिमुखतेमुळे यशस्वी होतेय बिग बास्केट


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


वाढत्या स्पर्धेमुळे आता ‘होम डिलिव्हरी’हा पर्याय आता बरेच जण देऊ लागले आहेत, परंतु कशाची होम डिलिव्हरी हवी हे आपल्यालाच दुकानात जाऊन किंवा फोन करून सांगावे लागते. या गैरसोयीला संधी मानून व्ही.एस. सुधाकर, हरी मेनन, विपुल परेख, अभिनय चौधरी आणि व्ही.एस. रमेश यांनी ‘बिग बास्केट’ची सुरुवात केली. १९९९ मध्येसुद्धा या पाच जणांनी ‘फॅबमार्ट’नावाची वेबसाइट सुरू केली होती, परंतु २००६ मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपला तो उद्योग विकला.

२०११ मध्ये हीच जोडी पुन्हा एकत्र आली आणि त्यांनी ‘बिगबास्केट.कॉम’ हा स्टार्टअप सुरू केला. बिग बास्केट ही कल्पना नवीनच असल्याने ती जास्तीत जास्त कशी लोकांपर्यंत पोहोचवता येईल याचा विचार सुरू झाला. बिग बास्केट वेबसाइटवर जाऊन आपल्याला हवे ते सामान, भाज्या, वस्तू निवडायच्या.

त्यानंतर पैसे भरण्याची पद्धत जसे कॅश ऑन डिलिव्हरी (घरपोच माल मिळाल्यावर पैसे देणे), कार्ड ऑन डिलिव्हरी, नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड बँकिंग निवडायची आणि मग आपला पत्ता देऊन आपल्याला सामान कोणत्या दिवशी व कुठे हवे आहे ते सांगायचे.

बिग बास्केटला हे ठाऊक होते की, आत्ता आपल्याला फार कुणी स्पर्धक नसला तरी भविष्यात नक्कीच कुणी तरी असणार, त्यामुळे आपले वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी बिग बास्केटने नवनवीन युक्त्या शोधून काढल्या. सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी नफ्यासोबत ग्राहकांना सर्वात जास्त महत्त्व दिले.

ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्याने ग्राहकांना दिली जाणारी सेवा याला महत्त्व देऊन विविध प्रकारे बिग बास्केटला विस्तारले. ग्राहक इतर ऑनलाइन दुकानांतून जेव्हा वस्तू मागवतात तेव्हा त्या वस्तू त्यांना एका बंद पाकिटातून मिळतात, परंतु जेव्हा लोक बिग बास्केटवरून वस्तू मागवतात तेव्हा त्या वस्तू त्यांना प्लॅस्टिकच्या मोठ्या कॅरटमधून मिळतात.

यामुळे ग्राहकांना खरोखर बाजारातून सामान मागवल्यासारखे वाटते. शिवाय सामान कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी हवे आहे हेसुद्धा ग्राहकाला ठरवण्याची मुभा दिली. ग्राहकांना त्यांचा पत्ता नीट सांगता येत नसेल किंवा त्यांना वेगवेगळ्या जागी जर सामान हवे असेल, तर बिग बास्केट ग्राहकांना फोन करून त्यांच्या परवानगीनुसार त्यांची लोकेशन गुगल मॅप्सवर शोधते आणि त्या जागेवर सामान पाठवून देते.

वरवर पाहता हा उद्योग खूप सोपा वाटत असला तरी खरे तर हा उद्योग चालवणे, तेही ग्राहकाला कायम खूश ठेवून हे खूप कठीण काम आहे, कारण ताज्या भाज्या, फळं, खाद्यपदार्थ या नाशवंत गोष्टी आहेत. तसेच दुकान वेबसाइटरूपी असले तरी उत्पादने साठवण्यासाठी मोठ्या जागेचीसुद्धा गरज असते. यासाठी कौशल्य आणि अनुभव हे दोघं हातात हात घालून चालण्याची गरज असते.

त्यासाठी बिग बास्केटचे पाच संस्थापक आज बिग बास्केटमधील पाच महत्त्वाची कामे वाटून करतात. हरी मेनन हे बिग बास्केटचे सी.ई.ओ. आहेत आणि ते बिग बास्केटचा व्यापार सांभाळतात. एस.व्ही. सुधाकर त्यांच्या अनुभवाच्या बळावर बिग बास्केटचे व्यवस्थापन सांभाळतात, विपुल पारेख हे बिग बास्केटचे फायनान्स आणि मार्केटिंग बघतात.

बिग बास्केटमध्ये नवनवीन कल्पना आणणे आणि विविध बदल करण्याचे काम अभिनय चौधरी करतात तसेच रमेश चौधरी हे लॉजिस्टिक्स विभाग पाहतात. पाच जणांनी सुरू केलेली बिग बास्केट आज १ हजार कर्मचारी आणि २ लाख ग्राहक असलेली कंपनी आहे. दर महिन्याला साधारणत: २० टक्क्यांनी बिग बास्केटची व्याप्ती वाढत आहे. सध्या मुंबई, पुणे, बंगळूरू, हैदराबाद अशा मोठ्या शहरांत बिग बास्केट कार्यरत आहे.

लवकरच भारताच्या बहुतांश भागांत पोहोचण्याचा बिग बास्केटचा प्रयत्न असेल. हल्लीच बिग बास्केटला २०० करोड रुपयांची गुंतवणूक हेलिऑन, झोडियस, ॲसेट कॅपिटल, लियॉन रॉक कॅपिटल आणि गणेश, मीना कृष्णन् यांकडून मिळाली आहे.

ग्राहकांचे महत्त्व ओळखल्याने तसेच नवनवीन कल्पनांना वाव दिल्याने बिग बास्केट हा स्टार्टअप आज भारतातील प्रमुख ऑनलाइन वेबसाइट्समध्ये धरला जातो. लवकरच हा स्टार्टअप एक विकसित उद्योग बनून जगातील ऑनलाइन उद्योगांच्या यादीत समाविष्ट होईल.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?