ब्रॅण्डचे नाव : बीके असोसिएट
ब्रॅण्डची स्थापना : २० मार्च २०१३
ब्रॅण्ड कशाचा आहे?
कर सल्लागार व लेखापालन सेवा, वैधानिक नोंदणी सेवा
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)‘बीके असोसिएट’ची स्थापना मार्च २०१३ ला झाली. संस्थेने आपला प्रवास एक ध्येय ठेवुन सुरू केला. ध्येय असे की, येणाऱ्या आव्हानांना संधीमध्ये रुपांतरीत करणे व आकांक्षाना साध्य करणे. आम्ही आमची वाटचाल अत्यंत निर्धाराने, उत्साहाने, निष्ठेने व उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेने केली आहे आणि आज आम्ही एक यशस्वी कर सल्लागार म्हणून अभिमानाने उभे आहोत व आजपर्यंत १,०००+ समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे.
आम्ही छोट्याने सुरुवात केली, पण कालानुरूप वचनबद्धतेने आणि कठोर परिश्रमाने एक एक विट रचत भक्कम पाया तयार केला आहे. प्रत्येक ग्राहकाला सेवा देताना आलेल्या समस्यांना तोंड देत त्यांचे निराकरण करत आणि मिळालेल्या प्रत्येक यशाने आम्हाला बरेच काही शिकवले. हे एक उत्तम उदाहरण आहे आमच्या विश्वासू व कुशल सेवेचं.
आम्ही केवळ टिकलो नाही तर भरभराटही केली. कालांतराने ‘बीके असोसिएट’ एक बहुआयामी फर्ममध्ये विकसित झाली आहे, जी वित्तीय सेवांपासून, वैधानिक सेवांपर्यंत, सल्लागार सेवांपासून, व्यवसाय सल्लामसलतीपर्यंत, कर्ज सुविधा ते अजून विविध सेवापर्यंत कार्यान्वित आहे.
आमची नैतिकता, तत्त्वे आणि श्रद्धा :
‘बीके असोसिएट’चा खरोखरच धोरणात्मक नियोजन आणि त्याची योग्य अंमलबजावणी करण्यावर विश्वास आहे. आम्ही फक्त संख्यांबद्दल विचार करत नाही तर आम्ही ‘बीके असोसिएट’मध्ये प्रामाणिकपणा, नैतिकता आणि अचूकतेला महत्त्व देतो. आमचा त्यावर ठाम विश्वास आहे आणि आज आम्ही याच पायावर उभे आहोत.
आमचा ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद पारदर्शक, व्यावसायिक आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करून आम्हाला आमच्या मूल्यांचा, आमच्या कामाच्या नैतिकतेचा अभिमान वाटतो.
फायनानशियल सर्व्हिसेस
- अकाउंटिंग
- फायलींग ऑफ इनकम टॅक्स रिटर्न
- टीडीएस रिटर्न फायलिंग
- जीएसटी रिटर्न फायलिंग
- पीएफ, ईएसआयसी रिटर्न फायलिंग
- प्रोफेशनल टॅक्स रिटर्न फायलिंग
स्टॅटयूटरी सर्व्हिसेस
- शॉप अॅक्ट रजिस्ट्रेशन
- उद्यम आधार रजिस्ट्रेशन
- जीएसटी रजिस्ट्रेशन
- पार्टनरशिप डीड बनवणे व नोंदणी करणे
- प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन
- प्रॉव्हिडन्ट फंड व ई.एस.आय.सी. रजिस्ट्रेशन
कंपनीचे मालक : भगवान मधुकर खसे

‘बीके असोसिएट’च्या यशोगाथेच्या केंद्रस्थानी एक दुरदर्शी व्यक्ती फर्मचे संस्थापक भगवान मधुकर खसे आहेत. खसे यांनी महाविद्यालयीन शिक्षण संपवून लगेचच या क्षेत्रात आपला प्रवास सुरू केला. अत्यंत प्रेरित, नव्या जोमाने आणि दृढ निश्चयाने या कर सल्लागार क्षेत्रात पाऊल ठेवले. लोकांना आर्थिक साक्षरता मिळवून देण्याच्या ध्यासाने त्यांनी सुरुवातीपासून काम केले.
आतापर्यंत सुमारे पंधरा वर्षांहून अधिक कालावधीमध्ये खसे यांनी अनेक व्यक्तींना विविध व्यावसायिकांना अर्थसाक्षर बनवून त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनात मार्गदर्शन केले आहे. कालांतराने त्यांनी एक अतिशय अनुभवी टीम बनवली जी ग्राहकांना मदत करते आणि त्यांना आलेल्या समस्यांचे निराकरण करते.
खसे हे सुनिश्चित करतात की प्रत्येक ग्राहकांच्या केवळ तात्पुरत्या समस्यांचे समाधान न करता, आर्थिक जगामध्ये आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्येदेखील आत्मसात करतात. त्यांच्या ग्राहकांच्या शिक्षणाप्रति असलेल्या वचनबद्धतेमुळे ग्राहकांचे जीवन बदलायला मदत झाली आहे. आर्थिकदृष्टया सक्षम आणि शिक्षित लोकांचा समुदाय तयार झाला आहे.
Email: contact@bkassociatefs.com
Website: https://www.bkassociatefs.com/
Mobile: 9730767222 / 9561689778
Office Address: Office No.1, First Floor, Royal House, Near Shital Hotel, Karve Putala Chowk, Kothrud, Pune-411038
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.