उद्योगसंधी

ब्रँड पोझिशनिंग उद्योग

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

माणसाचे नाव व चेहरा ही त्याची ओळख असते. कामामुळे नाव होते का? का चांगले नाव ठेवल्यामुळे काम होते? खरे म्हणजे ज्या कामामुळे नाव होते, ते सगळ्यात मोठे असते; पण जेव्हा तुम्ही मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करता तेव्हा त्याचे नाव मात्र विचारपूर्वकच ठेवले पाहिजे.

आज उद्योग क्षेत्रात जगभर जेथे जेथे लाखो, कोटी रुपयांची गुंतवणूक करून एखादा प्रॉडक्ट, ब्रँड लाँच केला जातो तेव्हा ती कंपनी मार्केटिंग क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रँड पोझिशनिंग या तंत्राचा वापर करणे व अनुभवी, तज्ज्ञ, ज्ञानी तज्ज्ञांना त्याचे नाव ठरविणे, जेणेकरून ते त्या ब्रँड उत्पादनांशी परफेक्ट मॅच असेल तसेच त्याला साजेशी टॅगलाइन जी कॅची व चांगला रीकॉल व्हॅल्यू असणारी असावी.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


त्याचप्रमाणे लोगोसुद्धा पटकन नजरेस भरणारा व आपल्या व्यवसायाची ओळख सांगणारा असा असावा. चांगले व परफेक्ट नाव, टॅगलाइन, लोगोमुळे छोटासा ब्रँडसुद्धा ग्राहकांना मोठा वाटतो व खप वाढण्यात खूप मोठी मदत होते.

आपण काही प्रसिद्ध नावे व स्लोगन पाहू.
  • नाय की- जस्ट डु इट,
  • अ‍ॅपल – थिंक डिफरंट,
  • लोरेल -बी कॉज यु आर बर्थ इट,
  • बी एम डब्ल्यू-द अल्टिनेट ड्रायव्हिंग मशीन,
  • अमुल- अटरली बटरली डिलिशिअस,
  • कोको कोला- ठंडा मतलब कोका कोला,
  • किंगफिशर – किंग ऑफ गुड टाइम्स,
  • मेंटोस- दिमाग की बत्ती जला दे,
  • रेमंड- द कम्प्लीट मॅन,
  • सर्फ एक्सल- दाग अच्छे है.

फक्त बिझनेस नव्हे तर अशा अनेक सुपीक डोक्यांतून आलेल्या स्लोगनमुळे आपला देश स्वतंत्र झाला आहे. जनतेत व जवानांना जोश आणण्यासाठी तयार केल्या गेल्या.

शिवाजी महाराज – हर हर महादेव, भगतसिंग-इनकलाब जिंदाबाद, सुभाषचंद्र बोस – तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा, मदनमोहन- सत्यमेव जयते, लालबहादूर शास्त्री – जय जवान जय किसान, बकीमचंद्र चटर्जी – वंदे मातरम, इंदिरा गांधी – गरिबी हटाव (अजून तरी हटली नाही), प्रमोद महाजन – शायनिंग इंडिया (काय झाले माहीत नाही), अच्छे दिन आयेंगे (बघू या वाट पाहू) असे नाव ठेवण्याचा, स्लोगन बनविण्याचा, लोगो बनवण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता.

यासाठी कोणत्याही पदवी, शिक्षणाची गरज नाही.
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

बस्स तुम्ही क्रिएटिव्ह आहात यावर तुमचा स्वत:चा विश्वास पाहिजे. छोटी कंपनी, एक प्रॉडक्टचे स्लोगन, लोगो बनविण्यासाठी अंदाजे 30 ते 40 हजार रुपये देते. मध्यम ब्रँड तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत फी देऊ शकतो, तर मोठे ब्रँड व आंतरराष्ट्रीय कंपन्या 2 ते 3 लाखांपर्यंत मोजण्याची तयारी दर्शवतात. बघा, खाजवा डोके, आहे तुमच्यात अशी क्रिएटिव्हिटी.

तुम्हाला किमान 3 लाखांपासून 10 लाखांपर्यंत भांडवल लागेल. छोटासा सेटअप लागेल. काम तुम्हाला जगभरातून मिळू शकेल. काही तरी नाव सुचवून कोणी लाख रुपये देत नाही. एवढे हलके व सोपे समजू नका. एक नाव, स्लोगन, लोगो बनवायला महिनाभर डोक्याचा कीस पडतो.

– प्रा. प्रकाश भोसले

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!